Personal Loan Information In Marathi: आपणास अचानक वैयक्तिक कारणांसाठी पैशांची गरज भासते. अशावेळी इतर कर्ज पर्यायांपेक्षा सोपे व सुलभतेने पर्सनल लोन उपलब्ध होते. तुम्ही तुमच्या वैयक्तिक गरजेसाठी कर्ज घेऊ इच्छित असाल. तर, त्यासाठी पर्सनल लोन हा उत्तम पर्याय आहे.
तुम्ही पर्सनल लोन घेऊ इच्छित असाल; तर त्याची लाभ, पात्रता व अर्ज करण्याची प्रक्रिया या लेखातून जाणून घेऊयात.
Personal Loan Information In Marathi | पर्सनल लोण इन्फॉर्मशन इन मराठी

कर्जाचे नाव | वैयक्तिक कर्ज |
उद्देश | ग्राहकांना कर्जाच्या माध्यमातून वैयक्तिक गरजांसाठी आर्थिक सहाय्य करणे |
पर्सनल लोन म्हणजे काय ? | Personal Loan Meaning In Marathi
आपली कोणत्याही प्रकारची गरज पुर्ण करण्यासाठी जे लोन आपण घेतो त्याला ‘पर्सनल लोन’ म्हणतात. पर्सनल लोन हे असे आहे की त्यातून येणारे पैसे हे आपण कोणत्याही कामासाठी वापरु शकतो. आपण हे पैसे घरखर्चासाठी, मालमत्ता खरेदीसाठी, वाहन खरेदीसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, वैद्यकीय आपत्तीसाठी, इत्यादी गोष्टी करीता आपण पर्सनल लोनचा उपयोग करू शकतो.
पर्सनल लोन मध्ये आपल्याला कोणतीही गोष्ट तारण ठेवावी लागत नाही.
पर्सनल लोनलाच ‘ वैयक्तिक कर्ज ‘ असेही म्हणतात.
पर्सनल लोन म्हणजे असे कर्ज जे बँक किंवा वित्तीय संस्था ही ग्राहकास त्याच्या वैयक्तिक कामासाठी देते.
ग्राहक अगदी दोन ते पाच लाखांचेही वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात.
होम लोन आणि पर्सनल लोन मधील फरक :
होम लोन (Home Loan) | पर्सनल लोन (Personal Loan) | |
---|---|---|
व्याज | होम लोन मधे व्याजाची सरासरी ही ८-१० टक्क्यांपर्यंत असू शकते. | तेच वैयक्तिक कर्जमध्ये व्याजाची सरासरी ही १० ते १५ टक्क्यांपर्यंत असू शकते. |
कर्जाचे कारण | त्यामध्ये होम लोन हे आपण घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी तसेच जमीन खरेदी करण्यासाठी वापरु शकतो. | पर्सनल लोन हे आपण कोणत्याही कामासाठी वापरु शकतो. कसे की घरखर्चासाठी, मालमत्ता खरेदीसाठी, वाहन खरेदीसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, वैद्यकीय आपत्तीसाठी, इत्यादी गोष्टी करीता आपण पर्सनल लोन चा उपयोग करू शकतो. |
लोन मिळण्याची कमाल व किमान मर्यादा | होम लोन मिळण्याची मर्यादा ही घराच्या मूळ किमतीच्या ८०% असते. | तसेच पर्सनल लोन मधे लोन मिळण्याची किमान मर्यादा ही २५ हजार रुपये पर्यंत आहे आणि कमाल मर्यादा ही ४० लाखा पर्यंत आहे. |
सहअर्जदार | सहअर्जदाराचा मदतीने आपण आपल्या होम लोन मधे थोडी जास्त लोन ची रक्कम बँकेकडून मिळवू शकतो किंवा जर आपला पगार कमी आहे किंवा आपल्या उद्योगाची उलाढाल ही कमी असेल तरी सहअर्जदाराच्या सही मुळे आपणास होम लोन मिळु शकते. | पर्सनल लोन मधे असे करता येत नाही. पर्सनल लोन मधे आपल्याला पगारानुसार किंवा आपल्या उद्योगाच्या उलाढालीनुसारच आपल्याला किती लोन द्यायचे हे बँक निश्चित करते. |
कालावधी | होम लोनची परतफेड करण्यासाठी आपल्याला जवळपास २० वर्षाचा कालावधी भेटू शकतो. | पर्सनल लोन मधे आपल्याला कर्ज परतफेडीसाठी ५ ते ७ वर्षाचा कालावधी भेटू शकतो. |
ई.एम.आय ( कर्जाचा हप्ता ) | होम लोन मधे लोन परत फेडीचा कालावधी हा जास्त असतो. त्यामुळे, दर महिन्याला आपल्या पगारातून थोडीच रक्कम वजा होते. | पर्सनल लोन मधे लोन फेडण्याचा कालावधी हा कमी असल्यामुळे दर महिन्याला आपल्या पगारातून थोडी जास्त रक्कम ही ई.एम.आय स्वरुपात वजा होते. |
पर्सनल लोनचे प्रकार | Types Of Personal Loan In Marathi
- लग्न कार्यासाठी कर्ज
- प्रवासासाठी कर्ज
- वैदकिय कारणासाठी / चिकित्सा साठी कर्ज
- ग्राहक म्हणून किंवा खरेदी साठी कर्ज
- शिक्षणासाठी कर्ज
- पेंशन कर्ज
अशा वेगवेगळ्या वैयक्तिक गरजांसाठी वैयक्तिक कर्ज दिले जाते.
पर्सनल लोनचे फायदे | Personal Loan Benefits In Marathi
- आपल्याला वैयक्तिक कर्ज हे तात्काळ कारणांसाठी किंवा लगेच पाहिजे असेल. तर ते मिळु शकते. इतर लोन च्या तुलनेत पर्सनल लोनची प्रक्रिया ही खुप जलद होते.
- कमी कागदपत्रांची आवश्यकता असते.
- बँकेला कोणत्याही प्रकारची मालमत्ता दाखवण्याची गरज नसते. तसेच, तारण ठेवण्याची ही गरज नसते.
- आपण कोणत्याही कारणांसाठी पर्सनल लोन घेऊ शकतो.
पर्सनल लोनचे तोटे | Personal Loan Disadvantage In Marathi
- पर्सनल लोन हे असुरक्षित असल्यामुळे सर्व बँकांचे व्याजदर हे इतर लोन च्या तुलनेत जास्त असतात.
- जर आपण आपले लोन हे वेळेच्या आधी फेडले. तर आपल्याला १ ते ५ टक्क्यांपर्यंत दंड बसु शकतो.
- आपला सिबिल (CIBIL) स्कोअर हा चांगला लागतो. जर सिबिल स्कोअर चांगला नसेल. तर, बँक पर्सनल लोन पास करीत नाही. [सिबिल स्कोअर ७५० किंवा त्यापेक्षा जास्त असावा]
- पर्सनल लोन फेडण्यासाठी चा कालावधी हा कमी असल्यामुळे आपल्या पगारातून थोडी जास्त रक्कम ही इ.एम.आय च्या स्वरुपात वजा होते.
पर्सनल लोन मिळवण्यासाठी पात्रता | Criteria For Personal Loan In Marathi
पर्सनल लोन साठी प्रत्येक बँक किंवा वित्तीय संस्था आपापले वेगवेगळे निकष लावते. परंतु, अर्जदाराची सामान्य पात्रता असावी.
- अर्जदार भारतीय नागरिक असावा.
- कोणतीही व्यक्ती ज्याचे वय २१ ते ६० असेल ते या लोनकरिता पात्र ठरू शकतात. काही कर्ज प्रकारामध्ये बँक ६५ वर्षाचा व्यक्तींना सुद्धा पर्सनल लोन देऊ शकतात.
- Multiplier Theory पद्धतीने तुमच्या उत्पन्ना नुसार/ मासिक पगार पाहून, तुम्हाला कर्जाची किती रक्कम द्यावयाची हे ठरवले जाते.
पर्सनल लोनसाठी महत्वाची कागदपत्रे / दस्तावेज | Documents Required For Personal Loan
पर्सनल लोन घेण्यासाठी आपणास खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.
- पुर्णपणे भरलेला वैयक्तिक कर्जाचा अर्ज आणि पासपोर्ट आकाराचे फोटो
- ओळखपत्रासाठी : पॅनकार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, वोटरआयडी. (यातील कोणतीही १ कागदपत्र चालेल)
- ओळख पुरावा : आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स / बॅंक पासबुक / पासपोर्ट / जन्म प्रमाणपत्र (यापैकी कोणतेही एक चालेल)
- रहिवासी पुरावा : वीजबिल / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स / बँक पासबुक इत्यादी. )
- मागील एका वर्षाचे बॅंक विवरण ( Bank Statement )
- जर तुम्ही नोकरी करीत असाल. तर, ३ वर्षाचा १६ नंबर फॉर्म
- जर उद्योग व्यवसाय करीत असाल. तर, ३ वर्षाचा आयकर परतावा (ITR) लागेल.
- जर तुम्ही सरकारी किंवा खाजगी ठिकाणी नोकरी करत असाल, तर मागील ३ महिन्याची वेतन पावती.
टीप – वरील कागदपत्रांची यादी व्यतिरिक्त कर्ज देणारी बँक व वित्तीय संस्था इतर कागदपत्रांची मागणी करू शकते.
पर्सनल लोन साठी अर्ज कसा करावा | How To Apply For Personal Loan In Marathi
सध्याच्या काळात पर्सनल लोन घेणे हे खुपच सोपे आणि सोयिस्कर झाले आहे. सध्याच्या तंत्रज्ञानामुळे आणि बरेचशा माध्यमांमुळे हे शक्य झाले आहे. आपण वैयक्तिक कर्जासाठी सरळ बॅंकेत जाऊन आणि चौकशी करून तसेच आपण आँनलाईन पद्धतीने सुद्धा पर्सनल लोनसाठी अर्ज करु शकतो.
ऑफलाईन प्रक्रिया :
१. तुम्ही लोन घेऊ इच्छित असलेल्या बँकेच्या शाखेला भेट द्या.
२. त्यांच्याकडून वैयक्तिक कर्जासाठीचा अर्ज घ्यावा. अर्ज करताना बँक आपल्याकडुन आवश्यक ते कागदपत्रे जमा करुन घेते. त्यानुसार तुमची पर्सनल लोन ची प्रक्रिया सुरू होते.
२. सर्व कागदपत्रांचे मुल्यमापन आणि पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला पर्सनल लोन दिले जाते.
अधिक माहितीसाठी जवळच्या बँकेशी संपर्क साधावा.
ऑनलाईन प्रक्रिया :
१. कर्ज घेऊ इच्छित असलेल्या बँकेच्या संकेतस्थळावर पर्सनल लोन साठी अप्लाय करावे. ( काही बँका ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देतात. )
२. अर्जदाराने आपली माहिती भरावी आणि आपला मोबाईल नंबर OTP साहाय्याने व्हेरिफाय करावा.
३. आपली KYC पूर्ण करावी.
४. कर्ज रक्कम समाविष्ट करावी व अर्ज सबमिट करावा.
५. बँक कर्मचाऱ्यांच्या व्दारे अर्ज पडताळणी केली जाते.
भारतातील वैयक्तिक कर्ज देणाऱ्या महत्त्वाच्या बँका | पर्सनल लोन बैंक लिस्ट
पर्सनल लोन साठी खाजगी बँका | पर्सनल लोन साठी सरकारी बँका |
---|---|
1. आयडीएफसी बँक (IDFC Bank) | 1. बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) |
2. कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) | 2. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) |
3. एचडीएफसी बँक (HDFC Bank) | 3. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) |
4. Axis बँक (Axis Bank) | 4. इंडियन बँक (Indian Bank) |
5. आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) | 5. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) |
6. इंडसइंड बँक (Indusind bank) | 6. युनियन बँक (Union Bank) |
पर्सनल लोन साठी खाजगी बँका
1. आयडीएफसी बँक (IDFC Bank)
कमाल लोन मर्यादा | ४० लाख |
परत फेडीचा कालावधी | ५ वर्ष |
व्याज | १०.७५ टक्के |
प्रोसेसिग फी | मुळ लोन रक्कमेचा २.५ टक्के |
फोरक्लोस चार्ज | ५ टक्के |
2. कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)
कमाल लोन मर्यादा | 20 लाख |
परत फेडीचा कालावधी | ५ वर्ष |
व्याज | १०.७५ टक्के |
प्रोसेसिग फी | मुळ लोन रक्कमेचा २.५ टक्के |
फोरक्लोस चार्ज | ५ टक्के |
3. एचडीएफसी बँक (HDFC Bank)
कमाल लोन मर्यादा | ४० लाख |
परत फेडीचा कालावधी | ५ वर्ष |
व्याज | १०.७५ टक्के |
प्रोसेसिग फी | मुळ लोन रक्कमेचा २.५ टक्के |
फोरक्लोस चार्ज | २-४ टक्के |
4. Axis बँक (Axis Bank)
कमाल लोन मर्यादा | १५ लाख |
परत फेडीचा कालावधी | ५ वर्ष |
व्याज | १०.४९ टक्के |
प्रोसेसिग फी | मुळ लोन रक्कमेचा १.५ ते २ टक्के |
फोरक्लोस चार्ज | २-५ टक्के |
5. आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)
कमाल लोन मर्यादा | 20 लाख |
परत फेडीचा कालावधी | ५ वर्ष |
व्याज | १०.५० टक्के |
प्रोसेसिग फी | मुळ लोन रक्कमेचा २.२५ टक्के |
फोरक्लोस चार्ज | ५ टक्के |
6. इंडसइंड बँक (Indusind bank)
कमाल लोन मर्यादा | १५ लाख |
परत फेडीचा कालावधी | ५ वर्ष |
व्याज | १०.४९ टक्के |
प्रोसेसिग फी | मुळ लोन रक्कमेचा २.५० टक्के |
फोरक्लोस चार्ज | ४ टक्के |
पर्सनल लोन साठी सरकारी बँका
1. बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda)
कमाल लोन मर्यादा | १० लाख |
परत फेडीचा कालावधी | ५ वर्ष |
व्याज | १०.५० टक्के |
प्रोसेसिग फी | मुळ लोन रक्कमेचा २ टक्के |
फोरक्लोस चार्ज | नाही |
2. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India)
कमाल लोन मर्यादा | २० लाख |
परत फेडीचा कालावधी | ६ वर्ष |
व्याज | ९.६० टक्के |
प्रोसेसिग फी | मुळ लोन रक्कमेचा १.५ टक्के |
फोरक्लोस चार्ज | ३ टक्के |
3. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra)
कमाल लोन मर्यादा | २० लाख |
परत फेडीचा कालावधी | ७ वर्ष |
व्याज | ९.५५ टक्के |
प्रोसेसिग फी | मुळ लोन रक्कमेचा १ टक्के |
फोरक्लोस चार्ज | नाही |
4. इंडियन बँक (Indian Bank)
कमाल लोन मर्यादा | २० लाख |
परत फेडीचा कालावधी | ७ वर्ष |
व्याज | ९.०५ टक्के |
प्रोसेसिग फी | मुळ लोन रक्कमेचा १ टक्के |
फोरक्लोस चार्ज | नाही |
5. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank)
कमाल लोन मर्यादा | १० लाख |
परत फेडीचा कालावधी | ५ वर्ष |
व्याज | ८.९५ टक्के |
प्रोसेसिग फी | मुळ लोन रक्कमेचा १ टक्के |
फोरक्लोस चार्ज | नाही |
6. युनियन बँक (Union Bank)
कमाल लोन मर्यादा | १५ लाख |
परत फेडीचा कालावधी | ५ वर्ष |
व्याज | ८.९० टक्के |
प्रोसेसिग फी | मुळ लोन रक्कमेचा १ टक्के |
फोरक्लोस चार्ज | नाही |
[ टीप : प्रत्येक बँक त्यांचे व्याजदर, परतफेड कालावधी, प्रोसेसींग फी आणि फोरक्लोस चार्जेस मध्ये बदल करू शकतात. कर्ज घेण्यापूर्वी बँकेच्या शाखेला अवश्य भेट देऊन पडताळणी करावी. ]
FAQ On Personal Loan Information In Marathi
पर्सनल लोन मिळण्यासाठी साधारणतः १-२ दिवस लागतात.
पर्सनल लोन घेणाऱ्या व्यक्तीचे वय १८ ते ७० असावे.
पर्सनल लोन करीता परतफेड कालावधी हा १ वर्ष ते ५ वर्ष पर्यंत असतो.
पर्सनल लोन साठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी या लेखात दिली आहे.
वैयक्तिक कर्जासाठी फी चार्जेस प्रत्येक बँक आणि वित्तीय संस्थेसाठी वेगवेगळे असते. साधारणतः प्रक्रिया शुल्क हे आकारले जाते.
आशा आहे की आम्ही दिलेल्या पर्सनल लोण इन्फॉर्मशन इन मराठी विषयी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.
आपल्याला या Personal Loan Information In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
अधिक वाचा:
Loan close केल्या नंतर amount refund hote na
loan close झालं म्हणजे सर्व इंस्टालमेंट with interest pay केलं आहेत. मग यात refund काही नसते.