Plastic Shap Ki Vardan Essay In Marathi म्हणजे प्लास्टिक शाप की वरदान वर मराठी निबंध येथे मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.
भारतात प्लास्टिक मुळेच सर्वात जास्ती कचरा निर्माण होतो आणि याचाच परिणाम म्हणजे अस्वच्छ भारत. या बाबत आपल्या देशात स्वच्छ भारत अभियान (Swachh Bharat Abhyan) सुध्दा राबवले आहे. प्लास्टिक वापरण्यावर भारतात जी बंदी आणली आहे ती स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत पार पढण्यात आली आहे.
प्लास्टिक शाप की वरदान वर मराठी निबंध Plastic Shap Ki Vardan Essay (Nbandh) In Marathi
रसायने वापरून केलेले, हलके, टिकाऊ असे अनेक प्रकारच्या वस्तू तयार करण्यासाठी वापरले जाणारे एक द्रव्य, म्हणजे प्लास्टिक होय.
प्लास्टिक हे एक अधातू आहे ज्यामध्ये कार्बन (Carbon) हा त्याचा मुख्य घटक आहे. प्लास्टिक बनवण्यासाठी प्रथम जमिनीच्या पोटातून किंवा समुद्राच्या बुडातून काही खनिजे काढावी लागतात आणि त्याला वेगवेगळ्या तापमानात उकळून ती खनिजे बाजूला करतात. त्यानंतर मग प्लास्टिक तयार होते.
शाप (Shap):
प्लास्टिक हा एक कृत्रिम अधातु आहे. तो वजनाने खूप हलका असल्याने आपण त्याचा वापर करतो. पण प्लास्टिक चा वापर झाल्यावर त्याची विल्हेवाट लावणे खूप कठीण आहे. शास्त्रज्ञांनी पण प्लास्टिक ला न गंजनारा अधातु म्हटले आहे. त्यामुळे प्रदूषण होते. जगभरात प्लास्टिकची विल्हेवाट लावण्या वरून खूप समस्या होत आहेत. प्लास्टिकचे जितके फायदे आहेत त्यापेक्षा लाख पटीने त्याचे तोटे पण आहेत.
पृथ्वी वरील जीवांच्या वस्तुमनापेक्षा दुपटीने प्लास्टिकचे वस्तुमान झाले आहे आणि त्याची विल्हेवाट लावणे जवळ जवळ अशक्यच झाले आहे. तसेच भारतात दररोज हजारो टन कचरा तयार होतो त्यात सगळ्यात जास्त प्रमाणात प्लास्टिक असते जसे की, प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिक वेष्टन इत्यादी.
प्लास्टिक सारखा विघटनशील कचरा नष्ट होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. पावसाळ्याच्या दिवसात नद्या नाले तुंबून महापुरसारखे संकटे येतात.तसेच गुरे ढोरे हा कचरा खाऊन मृत्युमुखी पडतात.इतकेच नव्हे तर संपूर्ण जलाशये प्रदूषित होत फक्त आणि फक्त प्लास्टिक मुळे…..
प्लास्टिक मधील विषारी धातुमुळे समुद्री जीव तरफडून मरत आहेत.काही संशोधनामुळे हे पण सिद्ध झाले आहे की प्लास्टिकचे सुक्षम बारीक बारीक कण आपल्या पिण्याच्या पाण्यात व अन्न पदार्थात मिसळू लागले आहेत.
सरकारने पर्यावरण संरक्षण अधिनियम 1966 अन्वये 40 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातलेली आहे, पण आज आपण पाहतो की कुठेही या नियमांचे पालन होताना दिसत नाही. यासाठी शासनाने प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध घातले पाहिजेत.
प्लास्टिक वापराच्या फायद्यांपेक्षा तोटे जास्त प्रमाणात सहन करावे लागत आहेत. प्लास्टिक प्रदूषण हे आपल्या पर्यावरणाला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवत आहे.
पर्यावरणात राहिलेले हे प्लास्टिक मनुष्याच्या जीवनासाठी हानिकारक आहेच तसेच ते प्राणी, पक्षी, झाडेझुडपे, जलचर प्राणी यांच्यासाठी सुद्धा घातक आहे.
पर्यावरणाचा समतोल राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्लास्टिकचा अतिवापर टाळून पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.
आपण सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याचे ठरवले तर भरपूर प्रमाणात प्लास्टिक प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
वरदान (Vardan):
प्लास्टिक हा वरदान फक्त आणि फक्त एक गोष्टीमुळे ठरतो, ते म्हणजे रोजगारनिर्मिती…………पण का या एका वरदनामुळे का आपण इतके शाप निसर्गाकडून घेऊ शकतो ……? नाही ना मित्रांनो…..
तर चला सगळे मिळून म्हणुया………..
‘प्लास्टिक टाळा, प्रदूषण टाळा’
निष्कर्ष:
आजच्या काळात प्लास्टिक हा मानव आणि प्राण्यांसाठी सुध्दा शाप असेच ठरते. भारतात जास्तीत जास्ती राज्यात प्लास्टिक वापरण्यास बंदी आणली आहे. त्यामुळे भरपूर लोकांनी आपले रोजगार सुध्दा गमावले. तरी एक रोजगार जरी गेले पण त्यामुळे दुसरे रोजगार तयार झाले आहे जसे कि प्लास्टिक च्या ऐवजी कापडी आणि जूट च्या पिशव्या तयार करण्यासाठी रोजगार निर्माण झाले आहे.
प्लास्टिक हा आज पण शाप आहे आणि भविष्यात सुद्धा शापच राहील ….
तर मित्रांनो Plastic Shap Ki Vardan Essay (Nbandh) In Marathi हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर अवश्य शेयर करा.
thank you so much
most welcome