Home » Government Schemes » Central Government Schemes » Pradhan Mantri Yojana » प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-kisan) माहिती मराठी मध्ये | पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजना | PM Kisan Samman Nidhi Yojana Information in Marathi

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-kisan) माहिती मराठी मध्ये | पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजना | PM Kisan Samman Nidhi Yojana Information in Marathi

शासनाने एक नवीन केंद्रीय क्षेत्र योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) सुरू केली आहे ज्यामुळे सर्व लहान आणि सीमांत जमीनधारक शेतकरी कुटुंबांना शेती आणि संबंधित उपक्रम तसेच घरगुती संबंधित विविध निविष्ठा खरेदी करण्यासाठी त्यांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी उत्पन्न सहाय्य प्रदान करण्यात येईल. योजनेअंतर्गत, लक्ष्यित लाभार्थ्यांना लाभ हस्तांतरित करण्यासाठी संपूर्ण आर्थिक दायित्व भारत सरकारद्वारे उचलले जाईल.

Contents hide
2. प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना (PM-KISAN)

पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजनेचे नवीन अपडेट काय आले आहे? (Pradhan Mantri (PM) Kisan Yojana New Update 2021)

2021 मध्ये केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी योजनेमध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत. ते महत्वाचे बदल कोणते आहेत हे जाणुन घेणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. 

आतापर्यत सर्व शेतकरी बांधवांना जमिनीसंबंधी आपला मालकी हक्क असण्याचे कागदपत्र जमा करणे बंधनकारक केले गेले नव्हते पण आता ही सर्व कागदपत्रे जमा करणे सर्व शेतकरी बांधवांसाठी बंधनकारक केले गेले आहे.

बहुतेक कुटुंबांमध्ये घरची जमीन ही घरातील जी व्यक्ती सगळयात प्रौढ तसेच प्रमुख असते तिच्या नावावर असते. ह्यात जमिनीची वाटणी तर केली जाते परंतु ज्या घरातील प्रमुख व्यक्तीच्या नावावर सदर जमीन असते. त्याच्याच नावाने ती जमीन राहत असते. ह्यामुळे जमिनीचा मालकी हक्क हा घरातील प्रमुख व्यक्तीकडेच राहत असतो. परंतु जमिनीची वाटणी ही सर्व नातेसंबंधींमध्ये समान पदधतीने केली जात होती. अशा पदधतीने आपणा सर्वाना ह्या योजनेचा लाभ आत्तापर्यत उठवता येत होता.

परंतु आता जो कोणी नवीन नोंदणी आता करणार असेल त्याला filing rejected प्रमाणपत्र जमा करणे आता केंद्र शासनाकडुन बंधनकारक केले गेले आहे. आणि केंद्र सरकारकडुन स्पष्ट देखील केले गेले आहे की सदर योजनेअंतर्गत ज्यांची नोंदणी झाली आहे. सध्या अशा व्यक्तींना कोणतेही कागदपत्र जमा करण्याची मुळीच आवश्यकता नाही. आणि त्यांचे नाव हे लाभार्थी सुचीमधुन देखील कोणत्याही परिस्थितीत काढण्यात येणार नाही. परंतु सरकारने स्पष्टपणे हे देखील सांगितले आहे की सदर योजनेत ज्यालाही आगामी वर्षात आपली नावनोंदणी करायची असेल त्यांच्याकडे filing rejected प्रमाणपत्र असणे अत्यंत अनिवार्य केले गेले आहे.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना (PM-KISAN)

योजनेचे नावPM किसान सन्मान निधी योजना | पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजना | प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना (PM-KISAN)
कार्य अंतर्गतभारताचे केंद्र सरकार
घोषितपियूष गोयल
योजनेचा लाभवार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत देणे
लाभार्थीशेतकरी
लाँच केलेसामान्य बजेट 2019
रक्कम6 हजार दर वर्षी
पेमेंट मोडडायरेक्ट बैंक ट्रांसफर
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेवटची तारीख31 जुलै दरवर्षी
स्थितीनववा इंस्टॉलमेंट आता रिलीज झाला आहे
अधिकृत संकेतस्थळ (ऑनलाइन पोर्टल)https://pmkisan.gov.in/
PM किसान हेल्पलाईन क्रमांक011-24300606 किंवा 155261

पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजना

  • आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकरी बांधवांच्या मिळकतीत वाढ व्हावी म्हणुन 2014 पासुन प्रयत्न करीत आहे. शेतकरी बांधवांना थोडया प्रमाणात का होईना आधार मिळण्यासाठी सदर योजनेअंतर्गत त्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा देखील सरकारने केली आहे.
  • सदर योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी पात्र असतील त्यांना 6 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा देखील केंद्र सरकारने केली आहे.
  • सदर योजनेच्या अंतर्गत आपणास तीन टप्पयांमध्ये पैसे वाटप केले जाणार आहे. प्रत्येक टप्पयामध्ये 2 हजार रुपये आपणास सरकारकडुन दिले जाणार आहे. आणि पहिल्या टप्पयामध्ये सर्व पात्र शेतकरी बांधवांना त्यांची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये दिली जाणार आहे.
  • आणि सदर योजनेमध्ये जो काही खर्च होणार आहे त्याचा संपुर्ण खर्च केंद्र सरकारतर्फे केला जाणार आहे.
  • केंद्र सरकारच्या वतीने सदर योजनेसाठी 75 करोड बजेट तयार करण्यात आले आहे. आणि ह्या योजनेचा लाभ हा तब्बल 11 ते 12 करोड शेतकरी बांधवांना घेता येणार आहे.
  • सरकारकडुन घोषित करण्यात आले आहे की सदर योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकरी बांधवांना तीन टप्पयांमध्ये पैसे दिले जाणार आहे. आणि सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना आधार कार्ड बंधनकारक केले गेले नाहीये. परंतु 2 आणि 3 टप्पयात आधार कार्ड असणे बंधनकारक केले गेले आहे. याशिवाय शेतकरी बांधवांना सदर योजनेचा लाभ उठविता येणार नाही. असे देखील सरकारकडुन स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

PM किसान सम्मान निधी योजनेसाठी काय पात्रता आवश्यक आहे? (PM (Pradhan Mantri Kisan) Samman Nidhi Yojana Eligibility Criteria Marathi)

  • सदर योजनेचा लाभ हा फक्त भारतातील शेतकरीच उठवू शकतो. संपुर्ण भारतातील कोणत्याही शेतकरी बांधवाला सदर योजनेचा लाभ प्राप्त करता येणार आहे.
  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांकडे आपले स्वताचे एक बँक खाते असणे फार गरजेचे आहे. कारण हे पैसे त्यांच्या सरळ बँक खात्यात सरकार टाकणार आहे. कोणत्याही प्रकारची रोख रक्कम दिली शेतकरी बांधवांना दिली जाणार नाही.
  • पहिले ह्या योजनेचा लाभ त्यांनाच मिळत होता ज्यांच्याकडे स्वताची 2 हेक्टर जमीन होती. पण सरकारने आता ही सीमा मोडुन काढली आहे जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना ह्या योजनेचा समानतेने लाभ घेता यावा. आणि सदर पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजनेच्या 2 टप्पयात सर्व शेतकरी बांधवांना देखील समाविष्ट केले जाणार आहे.

PM किसान सम्मान निधी योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? | PM (Pradhan Mantri) Kisan Samman Nidhi Yojana Documents List)

1) खसरा खतौनी आणि जमिनीची कागदपत्रे:

आपण शेतकरीच आहोत हे सिदध करण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या कागदपत्रांच्या प्रती तसेच खसरा खतौनी दाखवणे आवश्यक असते. खसरा खतौनी म्हणजे सध्या आपली जमीन कोणत्या परिस्थितीत आहे? तिच्यावर आपण शेती करण्यायोग्य अजुनही ती आहे का नाही? याचसोबत जमिनीची जी कागदपत्रे असतात त्यामध्ये सदर जमिन ही कोणाच्या नावावर आहे हे दिलेले असते.

2) शेतकरी क्रेडिट कार्ड :

सरकारने शेतकरी बांधवांना ओळख म्हणुन तसेच त्यांना योजनेचा लाभ प्राप्त व्हावा यासाठी एक शेतकरी क्रेडिट कार्ड देखील बनवलेले आहे. म्हणुन सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकरींकडे ह्या शेतकरी क्रेडिट कार्डची प्रत असणे खुप आवश्यक आहे.

3) बँकेचे खाते पासबुक :

सर्व शेतकरी बांधवांना सम्मान स्वरूप दिला जाणारा हा निधी त्यांना त्यांच्या बँक खात्यात दिला जातो असतो. त्यामुळे प्रत्येक शेतकरी बंधुंने आपले बँक खाते पासबुकची प्रत आपल्याजवळ बाळगायलाच हवी.

4) आधार कार्ड :

आता सरकारने आपल्या नियमांमध्ये कठोर बदल केले आहेत आता पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजनेचा फायदा त्याच शेतकरीला घेता येईल ज्याचे आधार कार्ड त्याने आपल्या बँक खात्याशी लिंक केलेले असेल.

PM किसान सम्मान निधी योजनेसाठी आँनलाईन फाँर्म कसा भरायचा? | PM (Pradhan Mantri) Kisan Yojana Apply Form In Marathi

  • जर आपल्याला सदर पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजनेचा फायदा उठवायचा असेल तर आपण पंतप्रधान शेतकरी पोर्टल (PM Kisan Portal) ह्या सरकारच्या मुख्य संकेतस्थळावर जाऊन तिथे सदर योजनेसाठी अर्ज देखील करू शकतो.
pm kisan official portal
  • संकेतस्थळाला भेट दिल्यावर पोर्टलच्या Farmers Corner मध्ये आपल्याला New Formar Regitration किंवा नवीन शेतकरी नोंदणी चे आँप्शन दिसुन येते ज्याच्यावर क्लीक करून आपल्याला आपली इन्फॉर्मशन fill करायची असते.
PM Kisan Yojana Apply step 1
  • Select language किंवा भाषा निवडा या आँप्शन मधून तुम्ही तुमची भाषा select करू शकता.
pm kisan yojana appy step 2
  • Aadhaar No. या आँप्शन मध्ये आपल्याला आपलं आधार कार्डनंबर टाकायचे असते.
  • Select State या आँप्शन मधून आपल्या राज्याची निवळ करा.
  • Image Text या आँप्शन मध्ये खाली दिलेला text टाकायचा असतो.
  • सर्व इन्फॉर्मशन फील करून झाल्यावर Search किंवा शोध या आँप्शन वर क्लिक करा.
  • आणि समजा जर आपले नाव सदर योजनेत समाविष्ट नसेल तर आपण ह्या योजनेत आपले नाव देखील समाविष्ट करू शकतो. आपल्यासाठी एक नवीन फाँर्म ओपन होत असतो. मग तो फाँर्म नीट व्यवस्थित भरून सबमिट करायचा असतो यानंतर आपली अर्जाची प्रक्रिया पुर्ण होत असते.

प्रधानमंत्री (PM) किसान सन्मान योजना लाभार्थी यादी मध्ये आपले नाव आहे का नाही कसे तपासायचे? | How to Check PM (Pradhan Mantri) Kisan Samman Nidhi Yojana Beneficiary List In Marathi

जर आपल्याला पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना लाभार्थी यादी मध्ये आपले नाव आहे का नाही याची पडताळणी करायची असेल तर पुढील पदधतीने आपण ती करू शकता:

  • यासाठी आपल्याला सगळयात आधी pm kisan च्या आँफिशिअल वेबसाईटवर जावे लागेल. 
  • वेबसाईटवर गेल्यावर आपल्याला एक फाँमर्र काँर्नरचे आँप्शन दिसेल त्यामध्ये आपल्याला beneficiery list किंवा लाभार्थी यादी हे आँप्शन दिसत असते. त्याच्यावर क्लीक करायचे त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होत असते.
Check PM Kisan Samman Nidhi Yojana Beneficiary List step 1
  • मग तिथे एक फाँर्म येत असतो जो आपल्याला ड्राँप डाऊन ह्या आँप्शनच्या आधारे भरायचा असतो.
  • सगळयात पहिले आपल्या राज्याची निवड करायची मग आपला जिल्हा, गाव याची निवड करून तो तिथे व्यवस्थित भरायचा. 
  • त्यानंतर मग आपण गेट रिपोर्ट (Get Report) या आँप्शनवर क्लीक करून आपले नाव लाभार्थीच्या यादीत आहे का नाही ते बघु शकतो. 

PM किसान सम्मान निधी योजनेच्या Application स्टेटस ची तपासणी कशी करायची? | PM (Pradhan Mantri) Kisan Yojana Beneficiary Status Check In Marathi

  • Kisan portal वर जाऊन फाँर्मर काँर्नर मध्ये Beneficiery Status किंवा लाभार्थी सध्यस्थिती या वर क्लिक करायचे.
PM Kisan Yojana beneficiary Status Checking process
  • आणि मग त्यानंतर आपण आपला आधार नंबर,मोबाईल नंबर तसेच अकाऊंट नंबर टाकुन Get Data या वर क्लिक करून आपले अँप्लीकेशन स्टेटस बघू शकतो.

पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजनेमध्ये मिळणारा हप्ता किती असतो?

  • पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजने अंतर्गत दुसरा आणि तिसरा हप्ता installment सदर योजनेत नाव असलेल्या सर्व शेतकरी बांधवांना सरकारतर्फे ट्रान्सफर केली गेली आहे.
  • 2020 मध्ये जानेवारी महिन्यापासुन ते एप्रिल महिन्यापर्यत चौथी installment देखील सरकारने सर्व लाभार्थीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली आहे.
  • यानंतर पाचवी installment देखील एप्रिल महिन्यापासुन जुन महिन्यापर्यत सर्व लाभार्थींना आत्तापर्यत पाठविली गेली आहे.
  • आता केंद्र सरकारने शेतकरी सम्मान।निधी योजनेची सहावी installment आँगस्ट महिन्यापासुन सर्व लाभार्थीं शेतकरी बांधवांना देणे सुरू देखील केले आहे.

PM किसान सन्मान निधी योजना शासन निर्णय PDF डाउनलोड

  • PM किसान सन्मान निधी योजना शासन निर्णय-2 – Download
  • PM किसान सन्मान निधी योजना शासन निर्णय-2 – Download

वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न (FAQ)

Q: PM किसान सन्मान निधी योजना हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क न झाल्यास तक्रार कोठे करावी?

जर तुमच्या तक्रारीचे समाधान PM किसान सन्मान निधीच्या हेल्पलाईन क्रमांकावर होत नसेल, तर तुम्ही राज्याच्या कृषी विभागाला किंवा मुख्यमंत्री हेल्पलाईनवर फोन करूनही तक्रार करू शकता.

Q: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे काय?

शासनाने एक नवीन केंद्रीय क्षेत्र योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) सुरू केली आहे ज्यामुळे सर्व लहान आणि सीमांत जमीनधारक शेतकरी कुटुंबांना शेती आणि संबंधित उपक्रम तसेच घरगुती संबंधित विविध निविष्ठा खरेदी करण्यासाठी त्यांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी उत्पन्न सहाय्य प्रदान करण्यात येईल.

आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *