Home » Government Schemes » Central Government Schemes » Pradhan Mantri Yojana » प्रधानमंत्री गती शक्ती योजना 2022 संपूर्ण माहिती | Pradhan Mantri Gati Shakti Yojana 2022 Information In Marathi

प्रधानमंत्री गती शक्ती योजना 2022 संपूर्ण माहिती | Pradhan Mantri Gati Shakti Yojana 2022 Information In Marathi

आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी हे आपल्या देशाची अर्व्यवस्था अधिक मजबुत आणि कणखर बनवण्यासाठी नेहमी काहीतरी नवीन प्रकल्प राबवत असतात.आणि असाच एक नवीन प्रकल्प राबविण्याची घोषणा 15 आँगस्टच्या शुभ दिनी लाल किल्लयावर झेंडा वंदनाचा कार्यक्रम पार पाडुन झाल्यानंतर आपल्या सर्वासाठी मोदी सरकारने केली आहे.

आपल्या देशाच्या 75 व्या स्वतंत्रता दिनी 15 आँगस्टच्या दिवशी झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ह्या योजनेची घोषणा केली होती.जिचे एकुण बजेट हे 100 लाख करोड असे निर्धारीत करण्यात आले आहे.ही योजना लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे.आणि सदर योजनेचा लाभ हा आपल्या देशातील युवा पिढीला रोजगार मिळण्यासाठी देखील होणार आहे.

आणि आजच्या ह्या लेखातुन आपण प्रधानमंत्री गती शक्ती योजनेविषयी अधिक सविस्तरपणे जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जसे की प्रधानमंत्री गती शक्ती योजना काय आहे? ही योजना राबवण्यामागचे सरकारचे उददिष्ट काय आहे? प्रधानमंत्री गती शक्ती योजनेचे वैशिष्टय काय आहे? प्रधानमंत्री गती शक्ती योजनेसाठी काय पात्रता आवश्यक आहे? प्रधानमंत्री गती शक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे कोणकोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे?प्रधानमंत्री गती शक्ती योजनेसाठी अर्ज कसा करायचा?प्रधानमंत्री गती शक्ती योजनेचे फायदे कोणकोणते आहेत? प्रधानमंत्री गती शक्ती योजनेसाठी किती बजेट निर्धारीत करण्यात आले आहे? प्रधानमंत्री गती शक्ती योजनेची घोषणा केव्हा आणि कधी करण्यात आली?

वरील अशा सर्व महत्वाच्या बाबी ज्या ह्या योजनेविषयी आपण जाणुन घेणे गरजेचे आहे. त्या सगळयांचा आजच्या लेखातुन आपण सविस्तर आढावा घेणार आहोत.

Contents hide
1. प्रधानमंत्री गती शक्ती योजना 2022 संपूर्ण माहिती

प्रधानमंत्री गती शक्ती योजना 2022 संपूर्ण माहिती

योजनेचे नावप्रधानमंत्री गति शक्ति योजना (PM Gati-Shakti Yojana)
योजनेची घोषणा कोणी केलीपंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारा
घोषणा तारीख15 ऑगस्ट 2021 स्वातंत्र्य दिवशी
योजनेची सुरुवात (लाँच तारीख)लवकरच
उद्दिष्टरोजगाराच्या संधी निर्माण करणे
लाभार्थीभारताचे बेरोजगार युवा गट
योजना चा बजेट100 लाख कोटी रुपये
अधिकृत वेबसाइट लवकरच
टोल फ्री नंबर लवकरच

प्रधानमंत्री गती शक्ती योजना काय आहे?

प्रधानमंत्री गती शक्ती योजना ही एक अशी योजना आहे जिच्यामुळे आपल्या देशाच्या गती आणि पायाभुत सुविधांमध्ये वाढ होणार आहे.आणि सदर योजनेमुळे आपल्या भारत देशातील नागरीकांमध्ये एक नवीन उर्जेचा संचार होईल.जी आपल्याला भविष्यात खुप पुढे जाण्यासाठी तसेच स्वताचा विकास घडवून आणण्यासाठी खुप साहाय्यक ठरणार आहे.

प्रधानमंत्री गती शक्ती योजनेदवारे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या देशातील युवा पिढीसाठी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करू इच्छित आहे.ज्याचे परिणाम स्वरूप आपल्या देशात स्वदेशी वस्तुंच्या वापरामध्ये वाढ होईल आणि आपल्या देशातील पायाभुत सुविधा देखील वाढत जातील.

प्रधानमंत्री गती शक्ती योजना राबविण्यामागचे मोदी सरकारचे मुख्य उददिष्ट काय आहे?

  • ही योजना सुरू करण्यामागचे मोदी सरकारचे मुख्य उददिष्ट हे आहे की आपल्या देशातील तरुण वर्गाला अधिकाधिक रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात जेणेकरून आपल्या देशातील बेरोजगारी संपुष्टात येऊन आपल्या देशाचा विकास होईल आणि आपला देश अधिकाधिक पुढे जाईल.आणि आपल्या देशातील प्रत्येक युवा तरूण तरुणी आत्मनिर्भर होईल.
  • प्रधानमंत्री गती शक्ती योजना अंमलात आणल्यानंतर आपल्या देशातील अर्थव्यवस्थेमध्ये चांगला बदल घडुन येईल आणि ह्या योजनेच्या अंमलबजावणीनंतर आपला भारत देश हा जगभर एक विकसित देश म्हणुन ओळखला जाईल.

प्रधानमंत्री गती शक्ती योजनेची वैशिष्टये कोणकोणती आहेत?

  • ह्या योजनेचे पहिले वैशिष्टय हे आहे की ही योजना अंमलात आणल्यानंतर आपला भारत देश हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरूवात होईल.जेणेकरून आपला देश सुदधा इतर विकसित देशांच्या यादीमध्ये लवकरच दिसुन येईल.
  • ह्या योजनेचे दुसरे वैशिष्टय हे आहे की ह्या योजनेचा लाभ हा जास्तीत जास्त तरुण वर्गाला होणार आहे.कारण ही योजना अंमलात आल्यानंतर तरूणवर्गाला रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत.ज्याच्यासाठी तरूण वर्ग प्रयत्न करू शकतो.
  • ह्या योजनेचे तिसरे वैशिष्ट हे आहे की ह्या योजनेमुळे भारत देशाच्या आर्थिक पायाभुत सुविधांमध्ये देखील वाढ होणार आहे.
  • ह्या योजनेचे चौथे वैशिष्टय हे आहे की ह्या योजनेमुळे कोरोना काळात नोकरी गमावून बसुन बेरोजगार झालेल्या तरूण,तरूणींना देखील रोजगाराची एक संधी प्राप्त होणार आहे.

प्रधानमंत्री गती शक्ती योजनेची घोषणा कोणी केली? आणि ही घोषणा केव्हा आणि कधी करण्यात आली?

प्रधानमंत्री गती शक्ती योजना ह्या योजनेची घोषणा आपल्या देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 

15 आँगस्ट रोजी लाल किल्ला येथे करण्यात आली.झेंडावंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या योजनेची घोषणा केली होती.

प्रधानमंत्री गती शक्ती योजनेचा लाभार्थी होण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे?

  • भारतातील रहिवासी असणारे भारतातील युवा तरुण तसेच तरुणी ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • आणि ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण कोणत्या क्षेत्रात निपुण आहे याची माहीती देखील आपल्याला देणे गरजेचे आहे.

प्रधानमंत्री गती शक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे कोणकोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे?

नुकतीच सदर योजनेची घोषणा करण्यात आल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे याची माहीती लवकरच सरकारकडुन आपल्याला देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर आपण सदर योजनेच्या आँफिशिअल वेबसाईटवर जाऊन देखील सदर योजनेचा लाभार्थी होण्यासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागतील हे बघू शकतो.याने आपल्याला ऐनवेळी कागदपत्रांसाठी धावपळ करण्याची गरज देखील पडणार नाही. तरी देखील खालील कागदपत्रे आपण सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळ बाळगायला हवीत:

  • आधार कार्ड 
  • रहिवासी दाखला 
  • मिळकतीचे प्रमाण 
  • राशन कार्ड 
  • जातीचा दाखला 
  • बँक खाते 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 
  • पासपोर्ट साईज फोटो

ह्यापेक्षा अधिक कागदपत्रे ह्या योजनेसाठी आपल्याला लागु शकतात.

प्रधानमंत्री गती शक्ती योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

  • सरकारद्वारे प्रधानमंत्री गती शक्ती योजना अंमलात आणल्यानंतर ह्या योजनेचा सगळयात पहिला होणार आहे आपल्या देशातील तरूण पिढीला.
  • कारण ह्या योजनेमुळे देशातील कोरोना काळात नोकरी गमविलेल्या तरूण तरुणींना तसेच तरूण बेरोजगारांना रोजगाराच्या विविध संधी प्राप्त होणार आहेत.
  • आणि ह्यामुळे आपल्या देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास देखील मदत होईल.
  • गती शक्ती योजना सुरू झाल्यानंतर आपल्या देशामध्ये स्वदेशी वस्तुंच्या निर्मितीत आमुलाग्र वाढ होईल.
  • ह्या योजनेमुळे देशाचा जीडीपी देखील वाढण्यास मदत होईल.
  • गती शक्ती योजनेनंतर एक उत्तम आणि सृदृढ अशी देशाची अर्थव्यवस्था निर्माण होईल.
  • ह्या योजनेचा लाभ फक्त आपल्या देशातील नागरीकांना होणार आहे.
  • ह्या योजनेमुळे छोटछोटया लघुउद्योगांना देखील महत्व प्राप्त होणार आहे.

 प्रधानमंत्री गती शक्ती योजनेसाठी किती बजेट निर्धारीत करण्यात आले आहे?

प्रधानमंत्री गती शक्ती योजनेकरीता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंभर लाख करोडपेक्षा अधिक बजेट निर्धारीत केले गेले आहे.

प्रधानमंत्री गती शक्ती योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

लवकरच भारत सरकारद्वारे आपल्याला हे कळविण्यात येईल की आपण सदर योजनेचा लाभ कसा उठवू शकतो?आणि सदर योजनेची एक आँफिशिअल वेबसाईट देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे.जिथे जाऊन आपण ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज देखील करू शकतो.आपल्याला हा फाँर्म कसा भरायचा आहे?कोठे जमा करायचा आहे?आणि त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत हे देखील आपल्याला येथे सांगण्यात येईल.

प्रधानमंत्री गती शक्ती योजनेद्वारे कोणकोणती कार्ये पार पाडली जाणार आहेत? 

प्रधानमंत्री गती शक्ती योजने अंतर्गत विविध कार्ये आपले भारत सरकार पार पाडणार आहे आणि ती पुढीलप्रमाणे आहेत:

  1. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होणार आहे
  2. स्वदेशीचा प्रचार-प्रसार,अवलंब पुरस्कार केला जाणार आहे
  3. छोटछोटया उद्योगांना देखील अधिक महत्व प्राप्त होणार आहे
  4. शेतकरी वर्गाला अधिक सक्षम तसेच सशक्त केले जाणार आहे
  5. देशामध्ये नवीन उद्योगांची सुरूवात होणार आहे
  6. प्रवास करणे सोयीस्कर बनविले जाणार आहे
  7. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होणार आहे

1. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होणार आहे

प्रधानमंत्री गती शक्ती योजनेच्या अंतर्गत आपल्या भारत देशातील प्रत्येक गटातील बेरोजगार तसेच कोव्हिडच्या काळात नोकरी गमावलेल्या नोकरदारांना रोजगाराच्या विविध संधी प्राप्त होणार आहे.आणि सदर योजनेतुन आपल्या देशाला अशा उच्च स्थितीवर पोहचविले जाईल जिथे पोहचल्यानंतर आपल्या देशातील युवा पिढी स्वता तर रोजगार करेलच त्याचसोबत इतरांना देखील रोजगाराची संधी उपलब्ध करून देईन. 

2. स्वदेशीचा प्रचार-प्रसार,अवलंब पुरस्कार केला जाणार आहे:

प्रधानमंत्री गती शक्ती योजनेच्या अंतर्गत देशामध्येच बनवलेल्या वस्तुंना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे.आणि असे झाले तर एक दिवस असा येईल की आपल्या भारतात बनवलेल्या वस्तु परदेशात देखील विकल्या जातील.परदेशातील लोक देखील त्यांचा सर्वाधिक वापर करतील.आणि असे झाल्याने आपल्या देशातील वस्तु परदेशात विकल्या गेल्यामुळे आपल्या देशाची आवक देखील वाढणार आहे.आणि आंतरराष्टीय बाजारपेठेत आपल्या देशातील बनलेल्या वस्तुंची अधिक प्रमाणात विक्री होईल.हा फायदा स्वदेशीचा पुरस्कार केल्यामुळे आपल्या देशाला होणार आहे.

3. छोटछोटया उद्योगांना देखील अधिक महत्व प्राप्त होणार आहे:

आज आपल्या देशात प्रत्येक गावाण तसेच शहरामध्ये सुदधा छोटछोटे उद्योग हे विपुल प्रमाणात केले जातात. पण ह्या उद्योगांमध्ये असे देखील काही उद्योग आहेत ज्यांना चालना तसेच प्रेरणा दिली गेली नाहीये ज्यामुळे बंद तसेच ठप्प पडले आहेत.

पण आता गती शक्ती योजना आल्यामुळे आता हे बंद पडलेले सर्व छोटेछोटे उद्योग आपल्याला पुन्हा जोमाने सुरू करता येतील.आणि ह्या छोटया उद्योगांना अधिक चालना देण्यासाठी,विकसित करण्यासाठी आपल्याला पुरेशा प्रमाणात सरकारकडुन आर्थिक मदत देखील प्राप्त होणार आहे. आणि ह्याच उद्योगांमधुन बनविलेल्या वस्तु आपण परदेशात विक्रीस ठेवल्यावर आपल्या देशातील वस्तुंची आंतरराष्टीय पातळीवर देखील मागणी वाढेल.ज्याचा फायदा आपल्याला खुप वेगाने प्रगती करण्यासाठी होणार आहे.

4. शेतकरी वर्गाला अधिक सक्षम तसेच सशक्त केले जाणार आहे:

आपल्या देशातील एकुण लोकसंख्येपैकी पन्नास टक्के लोकसंख्या ही शेतीवर आपला उदरनिर्वाह करते.ज्यामुळे आपला देश हा शेतीप्रधान देश म्हणुन ओळखला जातो.म्हणुन आपण देशाची अर्थव्यवस्था मजबुत करण्याचा विचार करत असताना शेतीकडे तसेच शेतकरी वर्गाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही.

गती शक्ती योजना आल्यामुळे शेतकरींना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतीतील उत्पन्न वाढवता येणार आहे.ज्याच्याने शेतकरींच्या मिळकतीत देखील वाढ होईल. आणि आपल्या देशात आत्तापर्यत ज्या ही शेतीविषयक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत त्या फक्त मोठया शेतकरी वर्गालाच पुरविण्यात आल्या आहेत.पण गती शक्ती योजना आल्यामुळे आता ही दरी कायमची संपुष्टात येणार आहे.ह्या योजने अंतर्गत सर्व शेतकरींना कमी किंमतीमध्ये लोन,खत,बीज,सबसिडी तसेच इतर सुविधा प्राप्त करून दिल्या जाणार आहे.

5. देशामध्ये नवीन उद्योगांची सुरूवात होणार आहे:

प्रधानमंत्री गती शक्ती योजने अंतर्गत देशातील कानाकोपरामध्ये नवनवीन उद्योगांची सुरुवात केली जाणार आहे.ज्याच्यामुळे देशातील गरीब बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

आणि नवीन उद्योगांच्या मार्फत ज्या काही वस्तुंची निर्मिती केली जाणार आहे.आणि त्याच वस्तुंना आंतरराष्टीय बाजारपेठेत देखील विक्रिस ठेवले जाणार आहे.ज्याने देशाची आवक वाढणार आहे.

आज आपल्या भारत देशामध्ये रोज नवनवीन स्टार्ट अप उद्योग तसेच व्यवसाय सुरू केले जाता आहे.आणि अशाच उद्योग व्यवसायांना अनुदान देऊन प्रधानमंत्री गती शक्ती योजना त्यांना विकसित करण्यासाठी तसेच चालना मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

6. प्रवास करणे सोयीस्कर बनविले जाणार आहे:

कोणत्याही देशातील प्रवासाची साधने आपण जर सोयीस्कर तसेच सुरळीत बनवली नाहीत तर त्या देशाचा विकास होणे खुप अवघड असते.कारण आज प्रत्येक देश आपल्या देशातील निर्माण केलेल्या वस्तुंची विक्री आपल्या देशातील वस्तुंची आंतरराष्टीय बाजारपेठेत निर्यात करून विक्री करून आपल्या देशाची अर्थव्यवस्थेत तसेच आवक मध्ये वाढ करत असते आणि ही वस्तुंची निर्यात परदेशात प्रवासांची साधने वापरूनच केली जाते. आणि हीच बाब लक्षात घेऊन आपल्या देशातून प्रवास करणे, प्रवासाची साधने सोपी तसेच सोयीस्कर करणे हे कार्य प्रधानमंत्री गती शक्ती योजनेमार्फत केले जाणार आहे.

आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *