Home » Government Schemes » Central Government Schemes » Pradhan Mantri Yojana » प्रधानमंत्री उज्वला योजना 2022 मराठी माहिती: ऑनलाईन अर्ज, कागदपत्रे, पात्रता व नवीन यादी । Pradhan Mantri Ujjwala Yojana in Marathi

प्रधानमंत्री उज्वला योजना 2022 मराठी माहिती: ऑनलाईन अर्ज, कागदपत्रे, पात्रता व नवीन यादी । Pradhan Mantri Ujjwala Yojana in Marathi

प्रधानमंत्री उज्वला योजना (Pradhan Mantri Ujjwala Yojana) ही केंद्र सरकारची योजना आहे. प्रधानमंत्री उज्वला ह्या योजनेची स्थापणा 2016 मध्ये करण्यात आली होती. आणि ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती.

सर्व आर्थिक दृष्टया कमकुवत कुटुंबांना स्वच्छ इंधनाचा पुरवठा करणे ह्या हेतुने सुरू केलेली ही योजना समस्त महिला वर्गासाठी एक खुप उत्तम योजना आहे.कारण ह्या योजनेचे मुख्य उददिष्टच गरीब घरातील स्त्रियांना विनामुल्य एलपीजी कनेक्शन प्राप्त करून देणे.

ह्या योजनेच्या अंतर्गत सर्व घरगृहिणींना एक गँस सिलेंडर मोफत वाटप करण्यात आले आहे.आणि नुकतेच ह्या योजनेचे नवीन version आले आहे. ज्याच्यामध्ये असे दिले गेले आहे की सदर योजनेत अशा गरीब परिवारातील महिलांना देखील सहभागी केले जाईल ज्यांना ह्या योजनेचा आतापर्यत कधीच लाभ उठवता आला नाहीये.

चला तर मग जाणुन घेऊयात सविस्तरपणे की प्रधानमंत्री उज्वला योजना काय आहे?प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी काय पात्रता आवश्यक आहे? प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागत असतात? प्रधानमंत्री उज्वला योजनेची official site कोणती आहे? प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी आँनलाईन अर्ज कसा करायचा? प्रधानमंत्री उज्वला योजनेचे स्टेटस कसे चेक करायचे? प्रधानमंत्री उज्वला योजनेची यादी? प्रधानमंत्री उज्वला योजनेचा हेल्पलाईन नंबर काय आहे?

Contents hide
1. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना माहिती मराठी मध्ये । Pradhan Mantri Ujjwala Yojana in Marathi

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना माहिती मराठी मध्ये । Pradhan Mantri Ujjwala Yojana in Marathi

योजनेचे नाव प्रधानमंत्री उज्वला योजना (PMUY), प्रधानमंत्री गॅस योजना, Pradhan Mantri Ujjwala Yojana
कार्य अंतर्गत भारताचे केंद्र सरकार
योजनेचा लाभ बीपीएल कुटुंबातील महिलांना एलपीजी कनेक्शन देणे
लाभार्थी बीपीएल कुटुंबातील महिला
लाँच केले 01 मे 2016
अधिकृत संकेतस्थळ (ऑनलाइन पोर्टल) https://www.pmuy.gov.in/
प्रधानमंत्री उज्वला योजना (PMUY) हेल्पलाईन क्रमांक 1906
प्रधानमंत्री उज्वला योजना (PMUY) Toll Free Number18002666696

प्रधानमंत्री उज्वला योजना काय आहे?

प्रधानमंत्री उज्वला योजना ही एक अशी योजना आहे.जिचे प्रमुख उददिष्ट हे भारतातील अशुदध इंधन बंद करून स्वच्छ एलपीजी इंधन प्रदान करणे.ह्या योजनेच्या अंतर्गत अशा गरीब कुटुंबियांना मोफत सिलेंडर दिले जात असते ज्यांचे नाव दारिद्रयरेषेमध्ये समाविष्ट आहे.आणि ह्या योजनेचा मुळ हेतु महिला सशक्तिकरण हा देखील असलेला आपणास दिसुन येतो.आणि ह्या योजनेच्या अंतर्गत गँसची सबसिडी ही लाभार्थीच्या खात्यामध्ये दिली जात असते.

प्रधानमंत्री उज्वला योजना 1.0

  • प्रधानमंत्री उज्वला योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये केली होती.ह्या योजनेत पाच करोड बीपीएल फँमिलीला एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून देण्याचे ध्येय डोळयासमोर ठेवण्यात आले होते.
  • ह्यानंतर ह्या योजनेचा विस्तार हा सात वेगवेगळया गटातील महिलांना ह्या योजनेत समाविष्ट करण्यासाठी केला गेला होता.ज्या गटामध्ये मागासवर्गीय जाती जमातींचा देखील समावेश होता.
  • नंतरून ह्याच ध्येयामध्ये वाढ करून 8 करोड एलपीजी कनेक्शन केले गेले होते.आणि हे ध्येय भारत सरकारने 2019 मधील आँगस्ट महिन्यातच पुर्णत्वास आणले होते.

प्रधानमंत्री उज्वला योजना 2.0

  • प्रधानमंत्री उज्वला योजना 2.0 मध्ये अशा कुटुंबियांना देखील लाभ प्राप्त होणार आहे ज्यांचे दारिद्रयरेषेमध्ये नावच नाहीये.आणि ते ह्या योजनेच्या पहिल्या टप्पयात समाविष्ट देखील नव्हते.
  • प्रधानमंत्री उज्वला योजना 2.0 मध्ये पात्र आहे अशा महिलांना कोणत्याही प्रकारचे डिपाँझिट न भरता एलपीजी गँस कनेक्शन दिले जाणार आहे.आणि ह्या योजनेअंतर्गत त्यांना जे पहिले सिलेंडर दिले जाणार आहे ते कोणतेही मुल्य न आकारता निशुल्क दिले जाणार आहे.
  • ह्या योजनेचे उददिष्ट आहे की अशा गरीब लोकांना एलपीजी गँस कनेक्शन द्यायचे ज्यांची महिन्याची आर्थिक कमाई देखील खुपच कमी आहे आणि ज्यांच्याकडे आजच्या चालु वर्तमान काळात देखील एलपीजी कनेक्शन उपलब्ध नाहीये.

प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी काय पात्रता आवश्यक आहे?

  • सदर योजनेचा लाभ फक्त महिला घेऊ शकतात पुरूषवर्ग ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • आधीपासुनच आपल्या कुटुंबाकडे एलपीजी कनेक्शन नसावे.
  • सदर योजनेच्या लाभार्थीचे वय 18 किंवा 18 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती?

  • आधार कार्ड 
  • राशन कार्ड 
  • बँक खाते क्रमांक आणि आय एफसी कोड 
  • ई केवायसी 

प्रधानमंत्री उज्वला योजनेची Official Website कोणती आहे?

प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ उठविण्यासाठी आपण ह्या योजनेच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊन ह्या योजनेविषयी सविस्तर माहीती प्राप्त करू शकतो. आणि ह्या योजनेसाठी आँनलाईन अर्ज देखील करू शकतो. pmuy.gov.in ही ह्या योजनेची आँफिशिअल साईट आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

  • सगळयात आधी आपण प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या Official साईट https://www.pmuy.gov.in वर जायचे.
pradhan mantri ujjwala yojana official website
pmuy.gov.in
  • साईट ओपन झाल्यावर आपल्याला तिथे तीन पर्याय दिसतील इंडियन, भारत गँस आणि एचपी गँस. 
pmuy online application
  • ह्यामध्ये आपल्याला जो पर्याय निवडायचा असेल आपण तो निवडु शकतो.
  • मग हवा तो एक पर्याय निवडल्यानंतर आपल्याला तिथे Ujjwala Connection Select करून Declaration Submit करावा लागतो.
  • त्यानंतर जी काही माहीती विचारली जाईल ती आपल्याला तिथे भरावी लागते.
  • मग सर्व माहीती व्यवस्थित भरून झाल्यावर आपण आपली सदर योजनेसाठी लागणारी सर्व महत्वाची कागदपत्रे अपलोड करायची असतात.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आपली सर्व कागदपत्रे आधी व्हेरीफाय होत असतात. आणि त्यानंतरच आपल्याला सरकारकडुन एलपीजी गँस कनेक्शनची सुविधा प्राप्त होत असते.

प्रधानमंत्री उज्वला योजनेचे स्टेटस कसे चेक करायचे?

  • सगळयात आधी आपण प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या वेबसाईटवर जायचे apply for new ujjwala 2.0 connection ह्या आँप्शनवर क्लीक करायचे.
  • मग स्क्रोल करून थोडे खाली आल्यानंतर आपल्याला एक आँनलाईन पोर्टलची लिंक दिसत असते.मग आपल्याला ज्या कंंपनीचे गँस कनेक्शन वापरायचे असेल आपल्याला ती कंपनी निवडायची असते.
  • याच्यानंतर पुढच्या पेजवर आल्यानंतर आपल्याला buy and check हे आँप्शन दिसत असते.आपल्याला मग त्यावर क्लीक करायचे असते.
  • यानंतर आपल्याला उज्वला योजनेच्या पर्यायावर ओके करून सर्व माहीती भरायची असते.आणि एक कँप्चा कोड तिथे येत असतो तो जसाच्या तसा तिथे भरून चेक स्टेटस ह्या बटणवर क्लिक करायचे असते.
  • यानंतर आपण आपल्या अर्जाचे स्टेटस काय आहे ते चेक करू शकतो.

प्रधानमंत्री उज्वला योजनेची नवीन यादी कशी बघायची?

  • ज्या व्यक्तींनी सदर उज्वला योजनेत भाग घेतला असेल ते आपले आपले नाव यादीत आहे का नाही ते ह्या योजनेच्या वेबसाईटवर जाऊन आपले नाव यादीत आहे का नाही हे बघु शकता.
  • ह्यासाठी होमपेज वर गेल्यावर आपल्याला न्यु लिस्टचे आँप्शन दिसुन येत असते.त्याच्यावर मग आपण क्लिक करायचे आणि आपल्याला काही माहीती विचारली जात असते ती आपण तिथे व्यवस्थित भरायची.त्यानंतर आपल्यासमोर प्रधानमंत्री उज्वला योजनेची यादी येत असते.जिच्यात आपले नाव आहे का नाही आपण चेक करू शकतो.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हेल्पलाइन नंबर (Helpline Number) काय आहे?

आपल्याला कधीही सदर योजनेत काहीही समस्या उदभवली तर आपण प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या Helpline number वर काँल करून मदत घेऊ शकतो.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हेल्पलाइन नंबर (Helpline Number) 1906

अंतिम निष्कर्ष :

अशा पद्धतीने आज आपण प्रधानमंत्री उज्वला योजना 2022 बद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे. आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Pradhan Mantri Ujjwala Yojana in Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-kisan)

प्रधानमंत्री गती शक्ती योजना 2022

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2022

महाराष्ट्र विधवा पेंशन योजना 2022

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *