प्रदुषण एक समस्या (Pradushan Ek Samasya): आज पाहायला गेले तर प्रदुषण ही एक फार गंभीर समस्या बनत चालली आहे.आणि हे प्रदुषण नावाचे संकट फक्त आपल्या मानवजातीसाठी नव्हे तर संपुर्ण पृथ्वीसाठी एक मोठे संकट बनलेले आहे.तरी सुदधा हे प्रदुषण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे तरी त्याकडे आपण एवढया गांभीर्याने लक्ष देत नाहीये ही एक खुप चिंतेची बाब आहे.
चला तर मग जाणुन घेऊयात प्रदुषणाविषयी सविस्तर माहीती प्रदुषण म्हणजे काय असते?प्रदुषणाचे प्रकार किती आणि कोणकोणते असतात?प्रदुषणाची कारणे कोणकोणती असतात?प्रदुषणाचे दुष्परिणाम कोणकोणते?प्रदुषण नियंत्रणात येण्यासाठी करावयाची उपाययोजना?प्रदुषणाच्या समस्येमुळे पर्यावरणाचे होणारे कोणकोणते नुकसान होते?
प्रदूषण म्हणजे काय?
आपल्या आजुबाजुच्या पर्यावरणामध्ये दुषित पदार्थांनी प्रवेश केल्यामुळे प्रकृतीचे तसेच पर्यावरणाचे बिघडणारे संतुलन तसेच पर्यावरणाचा होणारा असमतोल म्हणजेच प्रदुषण होय.प्रदुषण हे केवळ पर्यावरणालाच धोका पोहचवत नसते.तर या पर्याव रणातील इतर जीव जंतुंना देखील इजा पोहचवत असते.
प्रदुषणाची सोप्पी व्याख्या करावयास गेले तर ती आपणास अशी करता येईल. हवा,पाणी,माती इत्यादींचे पर्यावरणात दुषित पदार्थाचा शिरकाव झाल्यामुळे दुषित होणे अशी सोप्पी व्याख्या आपण पर्यावरणातील प्रदुषणाची मांडु शकतो.
प्रदूषणाचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?
प्रदुषणाचे मुख्य प्रकार पुढील प्रमाणे आहेत :
- वायू प्रदुषण (Air Pollution)
- जल प्रदुषण (Water Pollution)
- ध्वनी प्रदुषण (Noise Pollution)
- मृदा प्रदुषण (Soil Pollution)
1. वायू प्रदूषण (Air Pollution) म्हणजे काय?
जेव्हा हवेमध्ये असे काही द्रवपदार्थ तसेच विषारी वायु मिसळत असतात जे वायुला दुषित करण्याचे काम करत असतात.तेव्हा जे हवेचे प्रदुषण होत असते त्यालाच वायु प्रदुषण असे म्हटले जाते.
हवेमध्ये आँक्सिजन,नायट्रोजन तसेच कार्बन डाय आँक्साईड हे तीन प्रकारचे वायु असतात.पण हवेमध्ये अचानक कार्बन डाय आँक्साईडचे प्रमाणात वाढ झाल्याने जी परिस्थिती उदभवत असते त्याला आपण वायु प्रदुषण असे म्हणत असतो.
2. जल प्रदूषण (Water Pollution) म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या समुद्रात तसेच नदीमध्ये रासायनिक विषारी पदार्थाचा प्रवेश होत असतो तेव्हा हे पदार्थ नदीच्या समुद्राच्या पाण्यामध्ये मिसळत असतात किंवा खाली त्यांचा गाळ साचत असतो.ज्यामुळे नदीचे तसेच समुद्राचे पाणी हे दुषित होत असते.आणि त्या पाण्याची गुणवत्ता देखील दिवसेंदिवस कमी कमी होत जात असते.यालाच जल प्रदुषण असे म्हणतात.
3. ध्वनी प्रदुषण (Noise Pollution) म्हणजे काय?
वातावरणामध्ये होत असलेला अनपेक्षित ध्वनींचा गोंगाट कलकलाट जो आपल्या कर्णेद्रियांना देखील घातक ठरत असतो.अशा प्रकारच्या ध्वनीच्या कलहामुळे तसेच गोंगाटामुळे जे प्रदुषण निर्माण होते त्या प्रदुषणाला ध्वनी प्रदुषण असे म्हटले जाते.
4. मृदा प्रदुषण (Soil Pollution) म्हणजे काय?
वेगवेगळया घरांमधुन खरगटे अन्न जुने सामान प्लास्टिक चामडे इत्यादी प्रकारचा कचरा तसेच औद्योगिक व्यवसायातुन जो रासायनिक पदार्थांचा कचरा निर्माण होत असतो जसे की कारखान्याचे सांडपाणी सारखा कचरा जेव्हा जमिनीवर टाकला जात असतो. तेव्हा ते रासायनिक पदार्थ जमिनीत मिसळल्यामुळे मृदा दुषित होऊन मृदा प्रदुषण (माती प्रदूषण) होत असते.
प्रदूषणाची कारणे कोणती आहेत?
प्रदूषणाची कारणे पुढील प्रमाणे आहेत :
वायू प्रदूषणाची कारणे :
- वाढती लोकसंख्या
- वाढते औद्योगिक व्यवसाय
- जंगलातील वृक्षतोड
- वाढते शहरीकरण
- वाहनांतुन निघणारा धुर
- वादळादरम्यान उडणारी धूळ
जल प्रदूषणाची कारणे :
- कारखान्यातील रासायनिक पदार्थ नदीमध्ये टाकल्याने जलप्रदुषण होते.
- वाढते औद्योगीकरण
- दिवसेंदिवस लोकसंख्येत होणारी वाढ
- पाण्याचा अतिवापर
- खनन कार्य
- पाण्यामध्ये प्लास्टिक टाकणे
ध्वनी प्रदूषणाची कारणे :
- अतिगोंगाट
- रेडिओ,टिव्ही,मोटारसायकल,कारचा हाँर्न,टेप डिजे तसेच स्पीकर इत्यादींचा होणारा जोरात आवाज
- फटाक्यांचा होणारा आवाज
मृदा प्रदूषणाची कारणे :
- रासायनिक खत तसेच किटकनाशकांचा वापर
- सिंचन मशागत
- घरगुती कचरा
- कारखान्यातील रासायनिक पदार्थाचे सांडपाणी
प्रदूषणाचे दुष्परिणाम कोणकोणते?
प्रदूषणाचे दुष्परिणाम पुढील प्रमाणे आहेत :
वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम :
- वातावरणामध्ये कार्बन डाय आँक्साईड ह्या वायुचे प्रमाण अधिक वाढते.
- आम्ल वर्षा होते
- वायु प्रदुषणामुळे श्वसनासंबधी आजार होण्याची दाट शक्यता असते.
- कर्करोग होण्याची शक्यता असते.
- शरीरात आँक्सिजनची कमतरता जाणवते.
जल प्रदूषणाचे दुष्परिणाम:
- प्रदुषित पाण्याने पिकांचे सिचन केले तर पिकांचे नासाडी देखील होत असते.
- दुषित पाण्यापासुन होणारे निरनिराळे विकार उदभवू शकतात.
- हदय, डोके इत्यादी संबंधित रोग देखील होण्याची संभावना असते.
ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम :
- ध्वनी प्रदुषणामुळे एखाद्या व्यक्तीला न्युरोटोल मेंटल डिसाँर्डरची समस्या देखील उदभवु शकते.
- अति आवाजामुळे एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाब,हदयाचा आजार देखील होण्याची संभावना असते.
मृदा प्रदूषणाचे दुष्परिणाम :
- जमिनीच्या उपजाऊ शक्तीत घट होत असते.
- पिकांची वृदधी कमी होत असते.
प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आपण केल्या पाहिजे?
प्रदूषण नियंत्रणात येण्यासाठी उपाय पुढील प्रमाणे आहेत :
वायू प्रदूषण नियंत्रणात येण्यासाठी उपाय:
- जंगलतोड थांबवायला हवी.
- वाहनांतुन निघणारा धुर नाका तोंडात जाऊ नये म्हणुन तोंडाला मास्क तसेच रूमाल बांधायला हवा.
- रस्ताच्या बाजुला तसेच घराच्या अवतीभोवती जास्तीत जास्त झाडे लावायला हवीत.
- जेवण बनवण्यासाठी लाकडाचा उपयोग न करता इंधनाचा वापर आपण करायला हवा.
- उद्योगांमध्ये ज्या फिल्टरयुक्त चिमण्या असतात त्यांना आपण उंच ठिकाणी लावायला हवे.
जल प्रदूषण नियंत्रणात येण्यासाठी उपाय:
- रासायनिक उद्योग ज्यांच्यामुळे नदीचे पाणी दुषित होते त्यांना नदी पासुन दुर ठेवायला हवे.
- कारखान्यातुन तसेच उद्योग व्यवसायातील सांडपाणी नदीच्या पाण्यात टाकु नये.
- प्रदुषित पाण्याने पिकांचे सिंचन अजिबात करू नये.
ध्वनी प्रदूषण नियंत्रणात येण्यासाठी उपाय:
- जास्त आवाजाचे फटाके लावणे टाळावे
- विनाकारण गाडीचा मोटारसायकलचा जोरजोरात हाँर्न वाजवू नये.
- जास्त आवाजात डिजे स्पीकर तसेच टेप वाजवु नये.
मृदा प्रदूषण थांबवण्यासाठी उपाय:
- औद्योगिक संसाधनामधील निघणारे रासायनिक पदार्थ जमीनीवर विसर्जित करणे टाळायला हवे.
- अधिकाधिक वृक्षांची लागवड करून मृदा प्रदुषणाला आपण आळा घालू शकतो.
- जनावरांनी कुठे चरावे कुठे नही चरावे याची काळजी आपण घ्यायला हवी.
- रासायनिक खते तसेच किटकनाशकांचा वापर करणे टाळावे.
अंतिम निष्कर्ष:
अशा प्रकारे आज आपण प्रदूषण एक गंभीर समस्या विषयी मराठी मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.
आपल्याला या Pradushan Ek Samasya In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
अधिक वाचा :