Home » Jobs & Education » Marathi Grammar » मराठी विरामचिन्हे व त्यांची नावे | Viram Chinh In Marathi | Punctuation Marks In Marathi

मराठी विरामचिन्हे व त्यांची नावे | Viram Chinh In Marathi | Punctuation Marks In Marathi

मराठी भाषेमध्ये उपयोग होणारे Viram Chinh In Marathi म्हणजे मराठी विरामचिन्हे व त्यांची नावे जाला English मध्ये Punctuation Marks असे म्हणतात ते इथे मी आपल्याला उपलब्ध करून देत आहे.

आपण जेव्हाही कधी एखाद्या विषयावर लेखन करत असतो. तेव्हा अधुन मधुन आपण वाक्य कुठुन सुरु झाले आणि कुठे संपले हे आपल्याला समजण्यासाठी विरामचिन्हे वापरत असतो.आणि जेव्हाही आपण लेखन करत असतो कुठेतरी विराम आपण घेतच असतो. आणि ह्या विराम तसेच विश्रांतीसाठी आपण एक चिन्ह वापरत असतो. हे चिन्ह म्हणजे विरामचिन्ह असते. आणि आजच्या लेखातुन आपण ह्याच विरामचिन्हांविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

Contents hide
1. मराठी विरामचिन्हे व त्यांची नावे | Viram Chinh In Marathi | Punctuation Marks In marathi
1.2. विरामचिन्हांचे प्रकार किती व कोणकोणते आहेत?

मराठी विरामचिन्हे व त्यांची नावे | Viram Chinh In Marathi | Punctuation Marks In marathi

विरामचिन्हांची नावे (Punctuation Marks Names) विरामचिन्हे (Punctuation Marks)
पुर्णविराम .
अर्धविराम ;
अपुर्णविराम :
स्वल्पविराम ,
उदगारवाचक चिन्ह !
प्रश्नार्थक चिन्ह ?
संयोग चिन्ह 
अवतरणचिन्ह [‘ ‘] [” “]
अपसारण चिन्ह
लोप चिन्ह 
दंड  |
अवग्रह §
काकपद ^
विकल्प चिन्ह/
परिच्छेद चिन्ह
Viram Chinh In Marathi List

विरामचिन्हे म्हणजे काय?

एखादे वाक्य लिहित असताना कुठेतरी आपण थांबत असतो म्हणजेच विश्रांती तसेच विराम घेत असतो.आणि हा विराम कुठे घ्यायचा?आणि किती वेळासाठी घ्यायचा हे दर्शवण्यासाठी आपण एक खुण निश्चित करतो ह्या खुणेलाच विरामचिन्ह असे म्हटले जाते.

विरामचिन्हांचे प्रकार किती व कोणकोणते आहेत?

विरामचिन्हांचे तसे पाहायला गेले अकरा ते बारा प्रकार असलेले आपणा सर्वाना माहीत आहे. पण जे अकरा प्रकार आपण नेहमी लेखन करत असताना वापरत असतो ते पुढीलप्रमाणे आहेत.

  1. पुर्णविराम
  2. अर्धविराम
  3. अपुर्णविराम
  4. स्वल्पविराम
  5. उदगारवाचक चिन्ह
  6. प्रश्नार्थक चिन्ह
  7. संयोग चिन्ह 
  8. अवतरणचिन्ह
  9. अपसारण चिन्ह
  10. लोप चिन्ह 
  11. दंड 
  12. अवग्रह
  13. काकपद

1. पुर्णविराम [.]

जेव्हा आपण लेखन करत असतो तेव्हा जे वाक्य आपण लिहु राहिलो ते वाक्य पुर्ण झाले आहे ते समजण्यासाठी आपण तिथे एक चिन्ह वापरत असतो.ज्याच्या द्वारे आपले वाक्य पुर्ण झाले आहे हे दर्शवले जात असते.अशा (.) चिन्ह तसेच खूणेलाच आपण पुर्णविराम असे म्हणत असतो.ह्या विराम चिन्हाचा उपयोग दोन वाक्यांमधील संक्षेप दाखवण्यासाठी देखील केला जात असतो.

पुर्णविराम [.] उदाहरणे (Example)
  • माझे जेवण करून झाले.
  • वि.स.खांडेकर (वाक्याचा संक्षेप दाखवण्यासाठी)

2. अर्धविराम [;]

जेव्हा आपण एखादे वाक्य लिहित असताना आपण अधिकवेळ थांबत असतो.पण आपले वाक्य मात्र पुर्ण होत नसते.अशा वेळेस आपण अर्धविराम (;) सेमिकोलन हे चिन्ह वापरत असतो.

अर्धविराम [;] उदाहरणे (Example)
  • धवल खुप हुशार आहे; पण तो अभ्यासाकडे लक्ष देत नाही. 

3. अपुर्णविराम [:]

जेव्हा आपण एखादे वाक्य लिहित असतो तेव्हा ते वाक्य लिहित असताना त्या वाक्याच्या अखेरीस आपल्याला जर एखाद्या वस्तुची,नावांची इत्यादी यादी तसेच तपशील द्यायचा असेल तेव्हा आपण त्या तपशीलाच्या यादीअगोदर (:) हे अपुर्णविराम चिन्ह वापरत असतो.

अपुर्णविराम [:] उदाहरणे (Example)
  • माझ्या आवडते विषय पुढीलप्रमाणे :

4. स्वल्पविराम [,]

जे वाक्य लिहित असताना मध्येच आपल्याला कुठेतरी थोडया कालावधीसाठी थांबावे लागत असते.तिथे स्वल्पविराम हे (,) चिन्ह वापरले जात असते.एकाच जातीचे दोन शब्द वाक्यात लिहिताना जर आले तर तिथेसुदधा आपण स्वल्पविराम हे चिन्ह वापरत असतो.आणि जेव्हा आपण एखाद्याला आवाज देत असतो किंवा संबोधुन बोलत असतो तेव्हा देखील हे चिन्ह वापरले जाते.

स्वल्पविराम [ , ] उदाहरणे (Example)
  • मी इतिहास,भुगोल आणि गणित ह्या सर्व विषयांचा अभ्यास केला.
  • नितीन,इकडे बघ (एखाद्याला संबोधण्यासाठी)

5. उदगारवाचक चिन्ह [!]

जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये आपण आपल्या मनातील भावना राग,आनंद,दुख इत्यादी व्यक्त करत असतो.तेव्हा तिथे आपण (!) असे चिन्ह वापरत असतो.त्यालाच उदगारवाचक चिन्ह असे म्हणतात.

उदगारवाचक चिन्ह [ ! ] उदाहरणे (Example)
  • अरे वा ! किती छान अक्षर आहे !

6. प्रश्नार्थक चिन्ह [?]

वाक्यामध्ये जर एखादा प्रश्न विचारला गेलेला असेल तेव्हा अशावेळी वाक्याच्या शेवटी आपण प्रश्नार्थक (?) चिन्हाचा वापर करत असतो.

प्रश्नार्थक चिन्ह [ ? ] उदाहरणे (Example)
  • तु माझी उधारी कधी देणार आहे?
  • तुझं नाव काय आहे?

7. संयोगचिन्ह [-]

जेव्हा आपल्याला दोन वाक्यांमध्ये संबंध दर्शवायचा असतो तेव्हा आपण तिथे संयोगचिन्हाचा (-) वापर करत असतो.

संयोगचिन्ह [ – ] उदाहरणे (Example)
  • नवरा-बायको
  • आई-वडील

8. अवतरणचिन्ह [‘ ‘] [” “]

जेव्हा आपण एखादा महत्वाचा शब्द किंवा शब्दसमुहाचा उल्लेख करत असतो तसेच एखाद्या दुसरी व्यक्तीचे म्हणने सांगत असतो तेव्हा आपण एकेरी (“) तसेच दुहेरी (” “) अवतरण चिन्हाचा वापर करत असतो.

एकेरी अवतरणचिन्ह [‘ ‘]

जेव्हा आपल्याला वाक्यात एखाद्या एका विशिष्ट शब्दावर जोर द्यायचा असेल तेव्हा आपण एकेरी अवतरणचिन्हाचा वापर करत असतो.

एकेरी अवतरणचिन्ह [‘ ‘] उदाहरणे (Example)
  • पुणे हे ‘विद्येचे’ माहेरघर आहे.
दुहेरी अवतरणचिन्ह [” “]

जेव्हा आपण वाक्यामध्ये बोलत असलेल्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द दाखवत असतो तेव्हा तिथे आपण दुहेरी अवतरणचिन्हाचा वापर करत असतो.

दुहेरी अवतरणचिन्ह [” “] उदाहरणे (Example)
  • तो म्हणत होता,” मी उद्या घरी जाईन”

9. अपसारण चिन्ह [ — ]

वाक्यात जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टी बाबतीत स्पष्टीकरण द्यायचे असेल तेव्हा आपण तिथे अपसारण चिन्हाचा ( — ) वापर करत असतो.

अपसारण चिन्ह [ — ] उदाहरणे (Example)
  • प्रभू श्री राम चंद्राचे पुत्र दोन — लव व कुश

10. लोप चिन्ह […]

एखादे वाक्य बोलता बोलता जेव्हा आपण अचानक थांबत असतो तेव्हा तिथे एक खंड पडत असतो त्या खंडालाच दाखवण्यासाठी आपण लोप चिन्ह (…) वापरत असतो.

लोप चिन्ह […] उदाहरणे (Example)
  • मला ते पाहिजे होते, पण…

11. दंड [।] [॥]

दंड हे आपण मराठी व्याकरणात एखाद्या अभंग, श्लोक इत्यादी यांचा शेवट दाखवण्यासाठी नेहमी वापरत असतो. दंड हे दोन प्रकारचे असतात एकेरी दंड (। ) आणि दुहेरी दंड (॥) .

एकेरी दंड [।] उदाहरणे (Example)
  • श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि ।
दुहेरी दंड [ ॥ ] उदाहरणे (Example)
  • ॥ ॐ नमः शिवाय ॥
  • ॥ ॐ श्री गणेशाय नमः॥

12. अवग्रह [ § ]

वाक्यात जर एखाद्या शब्दाचा दिर्घ उच्चार करायला असेल तर त्यासाठी आपण तिथे अवग्रह (§) हे चिन्ह वापरत असतो.

13. काकपद [^]

लेखन करत असताना जर आपला एखादा शब्द लिहायचा राहुन गेला असेल तर तो शब्द राहिला आहे हे दाखवण्यासाठी आपण (^) हे चिन्ह वापरत असतो.

काकपद [^] उदाहरणे (Example)

सर्व
हे ^ विरामचिन्हांची उदाहरणे होती

14. विकल्प चिन्ह [ / ]

लेखन करत असतांना जर एखाद्या शब्दाचा सामान अर्थ असेल तर किंवा या शब्दा ऐवजी विकल्प चिन्ह (/) वापरल्या जात असतो.

विकल्प चिन्ह [ / ] उदाहरणे (Example)
  • इथे वडील/पालक यांची सही पाहिजे

15. परिच्छेद चिन्ह [ ¶ ]

वाक्यात परिच्छेद चिन्ह [ ¶ ] परिच्छेद दाखवण्यासाठी वापरला जात असतो.

मराठीतील विरामचिन्हांचा इंग्रजी भाषेतील अर्थ :

मराठी विरामचिन्हे इंग्रजी (English) भाषेतील अर्थ
पुर्णविराम [ . ]फुल स्टाँप (Full Stop)
अर्धविराम [ ; ]सेमी कोलन (Semicolon)
अपुर्णविराम [ : ]कोलन (Colon)
स्वल्पविराम [ , ]काँमा (Comma)
उदगारवाचक चिन्ह [ ! ]एक्सलेमेशन मार्क (Exclamation mark)
प्रश्नार्थक चिन्ह [ ? ]क्वेशन मार्क (Question Mark)
संयोग चिन्ह [ – ] हायफन (Hyphen)
अवतरण चिन्ह [“]Quatation Mark
अपसारण चिन्ह [—]एम डँश (Em Dash)
लोप चिन्ह [ … ]ellipsis
दंड [।] [॥] Pipe
अवग्रह [ § ] Section sign
काकपद [^] Cone
विकल्प चिन्ह [ / ] Or Mark
परिच्छेद चिन्ह [ ¶ ] पिलक्रो (Pilcrow)
Viram Chinh in Marathi and English

आशा आहे की आम्ही दिलेल्या मराठी विरामचिन्हे व त्यांची नावे या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Viram Chinh In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

मुख्य पृष्ठ (Home Page) येथे क्लिक करा

2 thoughts on “मराठी विरामचिन्हे व त्यांची नावे | Viram Chinh In Marathi | Punctuation Marks In Marathi”

  1. rajen sonawane

    मला मराठी भाषेचे अलंकारांची संपूर्ण माहिती पाहिजे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *