Home » People & Society » Recipes » [3 Types] Puran Poli Recipe In Marathi-लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची रेसिपी मराठी

[3 Types] Puran Poli Recipe In Marathi-लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची रेसिपी मराठी

पुरण पोळी (Puran Poli) ही एक अस्सल पारंपारिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. जी महाराष्ट्रा मध्ये होळी असो व दसरा प्रत्येक सणाला बनवल्या जाते. तर आज मी तुम्हाला Puran Poli Recipe In Marathi म्हणजे लुसलुशीत पुरणपोळी रेसिपी मराठी मध्ये पुलब्ध करून देत आहे.

होळी असो वा दसरा कोणताही सण माझ्याशिवाय पूर्ण होत नाही,
मी नसलेले पान कुठेही आजूबाजूला शोधूनसुद्धा दिसत नाही,
जरी मला बनवण्यासाठी तुम्हाला लागते खूप मेहनत,
समाधान मिळते तेव्हा जेव्हा बसते सारी पंगत, 
लहान असो वा मोठे सर्वांचीच लाडकी मी, 
कोण आहे बरे मी.. अहो मी तर पुरणपोळी…!

Puran Poli Quotes in Marathi

ही मी एक छोटीशी कविता केलेली आहे. अगदी लहान मुलांपासून ये मोठ्या माणसांपर्यंत पुरणपोळी सर्वानाच आवडते. पुरणपोळी न आवडणारे लोक तसे क्वचितच असतील.

या मध्ये मी तुम्हाला सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहे. Generally पुरणपोळी ही मैद्यापासून बनवली जाते. पण जर तुम्ही Health Conscious असाल तर मैद्याऐवजी गव्हाचे पीठ देखील वापरता येते. किंवा तुम्ही समप्रमाणात मैदा आणि गव्हाचे पीठ देखील घेऊ शकता. मला Personally मैद्याची पुरणपोळी आवडते.

Puran Poli Recipe In Marathi । लुसलुशीत पुरणपोळी रेसिपी मराठी

Puranpoli
लुसलुशीत पुरणपोळी

इथे आपण पुरण पोळी चे 3 प्रकार बघू. तुम्हाला जी Method Suitable वाटेल त्या पद्धतीने पुरण पोळी तयार करा. चला तर मग Puran Poli ची Recipe बघू या.

1. गुळाची पुरणपोळी रेसिपी (Gulachi Puran Poli Recipe In Marathi)

  • तयारीसाठी वेळ: 2 तास
  • शिजवण्यासाठी वेळ : 1 तास
  • किती बनतील: 12-15
  • पुरण आणि भिजवलेले पीठ तयार असल्यास वेळ: 25 मिनिटे

गुळाची पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Jaggery Puran Poli Ingredients  In Marathi):

  • 1 कप चणाडाळ=250 gm, छान स्वच्छ धुऊन , किमान 1 तास पाण्यात भिजवून ठेवावी
  • 1 कप किसलेला गूळ=250 gm
  • पाऊण कप मैदा =150 gm
  • 1/2 कप गव्हाचे पिठ = 100 gm
  • 3-4 हिरव्या वेलच्या ची पूड किंवा 1 छोटा जायफळाचा तुकडा च पावडर
  • थोडे केशराचे धागे
  • 1 मोठा चमचे तेल
  • 1/4 टीस्पून मीठ
  • तूप
  • तांदुळाचे पीठ 

गुळाच्या पुराणासाठी कृती :

  1. सर्वात प्रथम चण्याची डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुऊन , किमान 1 तास पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या करून घ्याव्यात. इथे मी 1 कप चण्याची डाळ घेतली आहे. तिच्या ५ पट पाणी घ्यावे.
  2. नंतर कुकर गार झाल्यावर डाळ एका मोठ्या कढई किंवा पातेल्यामध्ये काढून घ्यावी. यामध्ये डाळ ही पूर्णपणे शिजलेली असली पाहिजे. आणि गाळणीच्या साहाय्याने जास्तीचे पाणी काढून टाकावे. हे पाणी वापरून कटाची आमटी करता येते.
  3. नंतर त्या पातेल्यामध्ये बारीक किसलेला गुळ घालावा. 1 कप डाळीसाठी 1 कप गुळ घालावा.
  4. त्यानंतर डाळ आणि गुळ एकत्र करून मंद किंवा मध्यम आचेवर आटण्यासाठी ठेवावे. नंतर पूर्ण व्यवस्थित एकजीव व घट्ट होईपर्यंत गॅस चालू ठेवावा.
  5. पुरण व्यवस्थित झाले की नाही हे चेक करण्यासाठी एक ट्रिक आहे ती म्हणजे पुरणाच्या पातेल्यात झारा किंवा कालथा उभा राहिला म्हणजे पुरण तयार झाले.
  6. लगेचच ते पुरण यंत्रातून काढून घ्यावे. नंतर त्यात थोडे केशराचे धागे आणि वेलचीची किंवा जायफळाची पावडर साधारण 1/2 ते 1 चमचा घालून चांगले मिक्स करून घ्या. 

कृती पिठासाठी:

  1. एका पातेल्यात पाऊण कप मैदा, 1/2 कप गव्हाचे पिठ घेऊन त्यात थोडे चवीपुरते मीठ घालावे. त्यानंतर त्यात पाणी घालून हे मिश्रण थोडे सैलसर भिजवावे. त्यात 1 ते 2 चमचे तेल घालून भिजवलेले पिठ व्यवस्थित तिंबत ठेवावा. हे मिश्रण साधारण 20 ते 25 मिनिटे झाकून ठेवावे. 
  2. त्यानंतर भिजवलेले पिठा ची एक छोटी पोळी तयार करून त्याचा पारीसारखा आकार करून त्यात पुरणाचा एक गोळा टाकावा.
  3. त्यानंतर हाताने सर्व बाजूने पारीचे तोंड बंद करावे. त्यानंतर हलक्या हाताने तांदुळाच्या पिठावर पुरणपोळी लाटून घ्यावी.
  4. पोळी करून झाल्यावर हलक्या हाताने तव्यावर टाकावी. व मंद गॅसवर दोन्ही बाजूने तूप घालून शेकवून टाकावी.
  5. पुरणपोळी तयार झाल्यावर प्लेट मध्ये काढून घ्यावी. व नंतर तूप किंवा दूध सोबत सर्व्ह करावी.
Puran Poli Recipe In Marathi By Madura

2. साखरेची पुरणपोळी रेसिपी (Sugar Puran Poli Recipe In Marathi)

  • तयारीसाठी वेळ: 2 तास
  • शिजवण्यासाठी वेळ : 1 तास
  • किती बनतील: 12-15
  • पुरण आणि भिजवलेले पीठ तयार असल्यास वेळ: 25 मिनिटे

साखरेची पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Sugar Puran Poli Ingredients In Marathi):

  • 1 कप चणाडाळ=250 gm, छान स्वच्छ धुऊन , किमान 1 तास पाण्यात भिजवून ठेवावी
  • 1 कप साखर=250 gm
  • पाऊण कप मैदा =150 gm
  • 1/2 कप गव्हाचे पिठ = 100 gm
  • 3-4 हिरव्या वेलच्या ची पूड किंवा 1 छोटा जायफळाचा तुकडा च पावडर
  • थोडे केशराचे धागे
  • 1 मोठा चमचे तेल
  • 1/4 टीस्पून मीठ
  • तूप
  • तांदुळाचे पीठ 

साखरेच्या पुराणासाठी कृती:

  1. सर्वात प्रथम चण्याची डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुऊन , किमान 1 तास पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या करून घ्याव्यात. इथे मी 1 कप चण्याची डाळ घेतली आहे. तिच्या 5 पट पाणी घ्यावे.
  2. नंतर कुकर गार झाल्यावर डाळ एका मोठ्या कढई किंवा पातेल्यामध्ये काढून घ्यावी आणि गाळणीच्या साहाय्याने जास्तीचे पाणी काढून टाकावे. यामध्ये डाळ ही पूर्णपणे शिजलेली असली पाहिजे.
  3. नंतर त्या पातेल्यामध्ये साखर घाला. 1 कप डाळीसाठी 1 कप साखर घालावी.
  4. त्यानंतर डाळ आणि साखर एकत्र करून मंद किंवा मध्यम आचेवर आटण्यासाठी ठेवावे. नंतर पूर्ण व्यवस्थित एकजीव व घट्ट होईपर्यंत गॅस चालू ठेवावा.
  5. पुरण व्यवस्थित झाले की नाही हे Check करण्यासाठी एक Trick आहे ती म्हणजे पुरणाच्या पातेल्यात झारा किंवा कालथा उभा राहिला म्हणजे पुरण तयार झाले.
  6. लगेचच ते पुरण यंत्रातून काढून घ्यावे. नंतर त्यात थोडे केशराचे धागे आणि वेलचीची किंवा जायफळाची पावडर साधारण 1/2 ते 1 चमचा घालून चांगले मिक्स करून घ्या. 

कृती पिठासाठी:

  1. एका पातेल्यात पाऊण कप मैदा, 1/2 कप गव्हाचे पिठ घेऊन त्यात थोडे चवीपुरते मीठ घालावे. त्यानंतर त्यात पाणी घालून हे मिश्रण थोडे सैलसर भिजवावे. त्यात 1 ते 2 चमचे तेल घालून भिजवलेले पिठ व्यवस्थित तिंबत ठेवावा. हे मिश्रण साधारण 20 ते 25 मिनिटे झाकून ठेवावे. 
  2. त्यानंतर भिजवलेले पिठा ची एक छोटी पोळी तयार करून त्याचा पारीसारखा आकार करून त्यात पुरणाचा एक गोळा टाकावा.
  3. त्यानंतर हाताने सर्व बाजूने पारीचे तोंड बंद करावे. त्यानंतर हलक्या हाताने तांदुळाच्या पिठावर पुरणपोळी लाटून घ्यावी.
  4. पोळी करून झाल्यावर हलक्या हाताने तव्यावर टाकावी. व मंद गॅसवर दोन्ही बाजूने तूप घालून शेकवून टाकावी.
  5. पुरणपोळी तयार झाल्यावर प्लेट मध्ये काढून घ्यावी. व नंतर तूप किंवा दूध सोबत सर्व्ह करावी.

3. आरोग्याला पोषक गव्हाचे पिठाची पुरणपोळी रेसिपी (Healthy WholeWheat Puran Poli Recipe In Marathi)

  • तयारीसाठी वेळ: 2 तास
  • शिजवण्यासाठी वेळ : 1 तास
  • किती बनतील: 12-15
  • पुरण आणि भिजवलेले पीठ तयार असल्यास वेळ: 25 मिनिटे

आरोग्याला पोषक गव्हाचे पिठाची पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Healthy WholeWheat Puran Poli Ingredients In Marathi):

  • 1 कप चणाडाळ=250 gm, छान स्वच्छ धुऊन , किमान 1 तास पाण्यात भिजवून ठेवावी
  • 1 कप गूळ =250 gm
  • 1 कप गव्हाचे पिठ = 250 gm
  • 3-4 हिरव्या वेलच्या ची पूड किंवा 1 छोटा जायफळाचा तुकडा च पावडर
  • थोडे केशराचे धागे
  • 1 मोठा चमचे तेल
  • 1/4 टीस्पून मीठ
  • तूप
  • तांदुळाचे पीठ 

कृती पुराणासाठी:

  1. सर्वात प्रथम चण्याची डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुऊन , किमान 1 तास पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या करून घ्याव्यात. इथे मी 1 कप चण्याची डाळ घेतली आहे. तिच्या 5 पट पाणी घ्यावे.
  2. नंतर कुकर गार झाल्यावर डाळ एका मोठ्या कढई किंवा पातेल्यामध्ये काढून घ्यावी. आणि गाळणीच्या साहाय्याने जास्तीचे पाणी काढून टाकावे. यामध्ये डाळ ही पूर्णपणे शिजलेली असली पाहिजे.
  3. नंतर त्या पातेल्यामध्ये बारीक किसलेला गुळ घाला. 1 कप डाळीसाठी 1 कप गूळ घालावा.
  4. त्यानंतर डाळ आणि गूळ एकत्र करून मंद किंवा मध्यम आचेवर आटण्यासाठी ठेवावे. नंतर पूर्ण व्यवस्थित एकजीव व घट्ट होईपर्यंत गॅस चालू ठेवावा.
  5. पुरण व्यवस्थित झाले की नाही हे Check करण्यासाठी एक Trick आहे ती म्हणजे पुरणाच्या पातेल्यात झारा किंवा कालथा उभा राहिला म्हणजे पुरण तयार झाले.
  6. लगेचच ते पुरण यंत्रातून काढून घ्यावे. नंतर त्यात थोडे केशराचे धागे आणि वेलचीची किंवा जायफळाची पावडर साधारण 1/2 ते 1 चमचा घालून चांगले मिक्स करून घ्या. 

कृती पिठासाठी:

  1. एका पातेल्यात 1 कप गव्हाचे पिठ घेऊन त्यात थोडे चवीपुरते मीठ घालावे. त्यानंतर त्यात पाणी घालून हे मिश्रण थोडे सैलसर भिजवावे. त्यात 1 ते 2 चमचे तेल घालून भिजवलेले व्यवस्थित तिंबत ठेवावा. हे मिश्रण साधारण 20 ते 25 मिनिटे झाकून ठेवावे. 
  2. त्यानंतर भिजवलेले पिठा ची एक छोटी पोळी तयार करून त्याचा पारीसारखा आकार करून त्यात पुरणाचा एक गोळा टाकावा.
  3. त्यानंतर हाताने सर्व बाजूने पारीचे तोंड बंद करावे. त्यानंतर हलक्या हाताने तांदुळाच्या पिठावर पुरणपोळी लाटून घ्यावी.
  4. पोळी करून झाल्यावर हलक्या हाताने तव्यावर टाकावी. व मंद गॅसवर दोन्ही बाजूने तूप घालून शेकवून टाकावी.
  5. पुरणपोळी तयार झाल्यावर प्लेट मध्ये काढून घ्यावी. व नंतर तूप किंवा दूध सोबत सर्व्ह करावी.

अंतिम निष्कर्ष :

अशा पदधतीने आज आपण Puranpoli Recipe In Marathi म्हणजे लुसलुशीत पुरणपोळी रेसिपी मराठी मध्ये बघितलं आहे. आशा आहे की आम्ही दिलेल्या रेसिपी चा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली Recipe आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Puran Poli Recipe In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *