Purgrastachi Atmakatha Essay In Marathi म्हणजे पूरग्रस्तांची आत्मकथा किंवा मी पाहिलेला महापूर या विषयावर मराठी निबंध येथे मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :
पूरग्रस्तांची आत्मकथा मराठी निबंध | मी पाहिलेला महापूर निबंध मराठी | Purgrastachi Atmakatha Essay In Marathi
आपण येथे मी पाहिलेला महापूर या विषयावर मराठी निबंध तीन प्रकारे बघणार आहोत, १००, २०० आणि ३०० शब्दांत.
पूरग्रस्तांची आत्मकथा मराठी निबंध [१०० शब्दांत]
नमस्कार मित्रांनो, मी एक महाप्रुरग्रस्त बोलत आहे. माझ्यासोबत मागच्या महिन्यात असे काही घडले की माझे जगच कोलमोडून गेल्यासारखे वाटत होते.मी राहणार सांगलीचा…….माझे नाव राघव मोहिते.
माझे घर पंचगंगेच्या किनाऱ्याजवळ आहे…….मी त्या दिवशी माझ्या परिवारासोबत झोपलो होतो. अस तर माझं घर इतके पक्यापणाने बांधलेले नव्हते, पावसाळ्यात माझे घर थोडे थोडे गळायचे.
त्या दिवशी पाऊस खूप होता म्हणायचे झाले तर गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते.माझ्या घरचा समोरची भिंत कोसळली होती. आम्ही खूप घाबरलो होतो.
जीवनावश्यक वस्तू घेऊन आम्ही घर सोडले आणि उंच ठिकाणी जाऊन थांबलो अन् काय झाले धडाम असा जोरात आवाज आला अन् आमचे घर वाहून गेले.
अश्याप्रकरे आम्ही महापूरग्रस्त झालो……..
मी अनुभवलेला महापूर मराठी निबंध [२०० शब्दांत]
कसे वाटते ना जेव्हा आपल्याच घरातून आपल्या इच्छेविरुद्ध निघावे लागले तर……असच काही तरी माझ्यासोबत घडले….मी इतकं मदतहीन झालो होतो आजी बाजूचे वातावरण पाहून इतकं नैराश्य झालं होत की बस्स………
तर मित्रांनो मी आहे राहुल देशमुख……..मी एक पूरग्रस्त आहे. मला या २-४ आठवड्यामागे इतका त्रास झाला की काय सांगू तुम्हाला. यावर्षी पाऊस इतका होता की,आम्ही सगळे पुरात अडकलो. कुठून मदत येत नव्हती, रोज शे दीडशे लोक या पुरात आपला जीव गमावू लागले.
मला असे वाटायचे की मी पण असेच एके दिवशी मरेन……पण नाही मी हिंमत केली अन् ठरवलं की स्वतःच जीव तर वाचवयचाच आहे पण लोकांना पण हिंमतीने या संकटाचा सामना करायला लावायचा होता.
माझे घर या पुरात बुडाले. सगळ्या किंमती अन् सारे सामान वाहून गेले होते. माझा लहान भाऊ पण यात वाहून गेला. या दुखामुळे माझे आईबाबा जगण्याची उमेद सोडून दिली होती.
आम्ही कसे बसे ठरवले की, मदत घेऊन यायची. मी अन् माझ्या मित्रांनी दोरी लावून पोहून जायचे ठरवले अन् मदत घेऊन यायची ठरवले होते. आम्ही कसेबसे पोहायला सुरुवात केली. पुराच्या पाण्यात गुरेढोरे, प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी जसे मगरी, कासवे, मासे हे सगळे वाहून जात होते. आमच्याशी होईल तितकी मदत आम्ही करत त्या प्राण्याचा जीव वाचवत पुढे जाऊ लागलो.
शेवटी आम्हाला एक किनारा दिसला. आम्ही तिथे जाऊन मदत शोधली अन् मग आमच्या लोकांना वाचवले. सगळ्याच्या डोळ्यात एक चमक पहिली त्यावेळी……….
अशा प्रकारे आम्ही त्या संकटातून वाचलो……….
मी पाहिलेला महापूर मराठी निबंध [३०० शब्दांत]
या वर्षीचा पावसाळा खूपच भीतीदायक होता.इतका पाऊस येत होता की थांबायचं नावच घेत नव्हता.३ दिवस झाले एकसारखा धो धो पाऊस पडतच होता.घरच्या आजूबाजूने नाल्यासारखे पाणी वाहत होते.
आम्ही सगळे भित भित राहत होतो.रात्र होत आली होती आम्ही सगळ्यांनी जेवण केले आणि एका खोलीत सगळे झोपी गेलो.मला खूपच भीती वाटत होती.आईच्या कुशीत दडपून मी झोपी गेलो.
अर्धी रात्र संपली होती की अचानक लाईट गेली.असे वाटत होते की,विजेचे सगळे खांब पडले असावे.तितक्या माझे बाबा उठले अन् एक मोठी सोल घेतली अन् आमच्या घरच्या अंगणात असलेल्या मोठ्या लिंबाच्या झाडाला ती सोल बांधून ठेवली.
असे वाटत होते की आपल्यावर आता मोठे संकट येणार आहे. बाबांनी सगळ्यांना झोपितून उठविले आणि जागी राहण्यास सांगितले.ते नाल्यासारखे जे पाणी वाहत होते त्या पाण्याने आता उग्र रूप धारण केले होते.माझे बाबा घरच्या बाहेर गेले आणि त्या सोलीला धरून त्या उग्र पाण्यातून मार्ग शोधू लागले,तितक्यात बाबांच्या कंबरेच्या वरपर्यंत पाणी चढले.
आम्ही सगळे ते पाहतच होतो.आई रडत होती,ओरडत होती.बाब कसेबसे त्या पाण्यातून बाहेर निघाले अन् एका पठारावर च्या झाडाला त्या सोलीचे दुसरी बाजू घट्ट बांधून टाकली आणि त्याला पकडून वापस आले. बाबांनी मला खाद्यावर घेतली आणि आईचे हाथ धरून पाण्यात उतरले,”राहुल,काहीही झाले तर मला गच्च धरून बस…..”मी बाबांना घट्ट पकडले आई अन् बाबा त्या पाण्यातून बुडत बुडत कसेबसे बाहेर निघू लागले.
आई रडत रडत घराकडे बघू लागली.तितक्यात काय झाले………घर मोडून वाहून गेले.आम्ही त्या पाण्यातून जीव वाचवण्यासाठी बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागलो अन् पाणी वाढू लागले होते.पाण्याचा प्रवाह इतका होता की,मी घाबरु लागलो.
किनाऱ्यावर येताच बाबांनी मला अन् आईला किनाऱ्यावर ढकलून दिले.अचानक त्या दोरीन आमचा साथ सोडला क्षणात वाटलं बाबा वाहून गेले पण थोड्याच दूर जाऊन बाबा झाडाच्या बुंध्याला धरून बाहेर आले.
आईने हंबरडा फोडला……..आणि आम्ही बाबांच्या गळ्याला पडलो अन् रडू लागलो……
आता कळलं की एका पूरग्रस्ताला आपल्या घराला गमवावे लागते,जीवात जीव नसतो……हीच आहे एक माझ्यासारख्या पूरग्रस्ताची आत्मकथा…..
तर मित्रांनो Purgrastachi Atmakatha Essay In Marathi हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर अवश्य शेयर करा.