Home » People & Society » Festival Information » रक्षाबंधन सणा विषयी माहीती | Raksha Bandhan Information In Marathi

रक्षाबंधन सणा विषयी माहीती | Raksha Bandhan Information In Marathi

रक्षाबंधन माहिती मराठी, रक्षाबंधन ची माहिती, रक्षाबंधन कधी आहे, रक्षाबंधन सणा विषयी माहीती (Raksha Bandhan Information In Marathi)

रक्षाबंधन हा एक बहिण भावामधील पवित्र नात्याचा दिवस म्हणुन ओळखला जातो. हा दोघा भावाबहिणीमधील मधील नात्याला अधिक जास्त घटट करणारा सण म्हणुन सर्व जगभर प्रचलित आहे.म्हणुन ह्या सणाला आपल्या भारतीय संस्कृतीत खुप महत्वाचे स्थान आहे.मुख्यतकरुण भारतातील हिंदु धर्मियांत हा सण मोठया आनंदात साजरा केला जातो.कारण रक्षाबंधन हा आपल्या हिंदु धर्मातील लोकांचा एक अत्यंत महत्वाचा आणि एक पवित्र सण आहे. चला तर मग जाणुन घेऊयात रक्षाबंधन ह्या सणाविषयी सविस्तर माहीती.

Raksha Bandhan Information In Marathi । रक्षाबंधन सणा विषयी माहीती

सणाचे नाव (Festival Name)रक्षाबंधन (Raksha Bandhan)
रक्षाबंधन 2022 तारीख (Raksha Bandhan 2022 Date)गुरुवार ११, ऑगस्ट (Thursday, 11 August)

रक्षाबंधन हा सण काय आहे?

रक्षाबंधन हा एक असा सण तसेच उत्सव आहे ज्यादिवशी प्रत्येक बहिण आपल्या भावाला ओवाळत असते आणि राखी बांधुन आपल्या रक्षणाचे वचन देखील मागत असते.आणि भाऊ देखील आपल्या बहिणीला रक्षणाचे वचन देत असतो.सोबतच तिला काहीतरी भेटवस्तु देखील तो देत असतो.म्हणजेच रक्षाबंधन हा एक रक्षेचे बंधन सांगणारा दिवस आहे.

रक्षाबंधन हा सण आपण का साजरा करत असतो?

रक्षाबंधन हा सण आपण का साजरा करतो हे जाणुन घेण्यासाठी आपल्याला आधी जुना इतिहास समजुन घेणे गरजेचे आहे.एकदा देवता आणि राक्षसांमध्ये घमासान युदध घडुन आले आणि ह्या युदधामध्ये राक्षसांची शक्ती ही देवतांपेक्षा अधिक प्रबळ ठरत होती.

अशा परिस्थितीत देवराज इंद्र यांना खुप चिंता लागली होती.आणि त्यांची अवस्था बघुन त्यांची पत्नी देखील चिंतीत झाली.

मग आपल्या कुंकवाच्या म्हणजेच सौभाग्याच्या रक्षणासाठी कठोर तपश्चर्या करते.आणि ह्या तपश्चर्येतुन ती एक असे कवच निर्माण करते.जे देवराज इंद्र यांच्या मनगटावर बांधल्याने देवराज युदधात विजयी होणार होते.मग देवराज इंद्र यांची पत्नी तपश्चर्येतुन निर्माण केलेले कवच आपल्या पतीच्या मनगटावर बांधते.परिणामस्वरुप देवराज युदधामध्ये विजयी होतात.आणि जेव्हा प्रसंग घडुन आला तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता.

आणि देवराज यांच्या पत्नीने निर्माण केलेले कवच हे एका पत्नीने आपल्या पतीच्या रक्षणासाठी निर्माण केलेले कवच होते.पण हळुहळवु ह्याच घटनेला एका प्रथेचे स्वरुप प्राप्त होत गेले.आणि पुढे जाऊन हीच प्रथा बहिण भावाच्या नात्यामध्ये देखील पुढे जाऊन वापरण्यात आली.आणि तेव्हापासुनच रक्षाबंधन हा साजरा केला जाऊ लागला.

आपण रक्षाबंधन ह्या सणाला एवढे महत्व का देत असतो?

आपला भारत देश हा एक असा देश आहे जिथे वेगवेगळया धर्माची लोक एकत्र गुण्यागोविंदाने आणि बंधुभावाने राहतात.आणि आपल्याला सर्वाना माहीत आहे की आपला भारत देश हा एक असा एकमेव देश आहे जिथे प्रत्येक स्त्रीला माता बहिणीचा दर्जा दिला जातो.आणि रक्षाबंधन हा सण ह्या बहिण भावाच्या अतुट आणि निर्मळ नात्याला अजुन भक्कम आणि घटट करण्याचे काम करतो.

कारण हा एक असा दिवस आहे ज्यादिवशी सख्यी बहिण तर आपल्या भावाला राखी बांधतेच त्याचसोबत इतर मानलेल्या बहिणी सुदधा आपल्या मानलेल्या भावाला राखी बांधत असतात.याच्याने सामाजिक सलोखा वाढतो.आपलेपणा तसेच आपुलकीची भावना वाढते.एकमेकांमधले प्रेम वाढते.

रक्षाबंधन हा सण आपण केव्हा आणि कधी साजरा करतो?

रक्षाबंधन ह्या सणालाच नारळी पौर्णिमा देखील संबोधिले जाते. आणि रक्षाबंधन हा सण आपण दरवर्षी श्रावन पौर्णिमेला साजरा करत असतो.

रक्षाबंधन हा सण आपण कसा साजरा करतो?

रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहिण ही बाजारात जाऊन आपल्या भावासाठी राखी खरेदी करत असते.स्वतासाठी त्यादिवशी परिधान करायला नवीन कपडयांची खरेदी देखील करते.

आणि भाऊ देखील ह्या दिवशी बाजारात जाऊन आपल्यासाठी नवीन कपडे खरेदी करत असतो.सोबतच बहिणीला ओवाळणी देण्यासाठी काहीतरी चांगली भेटवस्तु देखील खरेदी करत असतो.

मग बहिण भावाला ओवाळत असते त्यासाठी ती पुजेचे ताट तयार करते.मग आपल्या भावाच्या कपाळावर टिका लावून त्याच्या हातावर रंगीबेरंगी राखी बांधत असते.मग शेवटी ओवाळुन झाल्यावर भाऊ बहिणीला काहीतरी भेटवस्तु देत असतो.

रक्षाबंधन ह्या सणाची कोणकोणती वैशिष्टये आपल्याला पाहायला मिळतात?

  • रक्षाबंधन ह्या सणाचे वैशिष्टय सांगावयाचे म्हटले तर हा सण फक्त भारतामध्ये साजरा केला जात नसुन संपुर्ण जगभर साजरा केला जातो.
  • हा एक असा सण आहे ज्याला कोणत्याही प्रकारच्या जाती तसेच धर्माचे बंधन नाहीये.म्हणुन हा सण हिंदु धर्मातच नाही तर इतर धर्मातील लोकांमध्ये देखील आनंदाने साजरा केला जातो.
  • रक्षाबंधन हा एक असा सण आहे ज्यामुळे आपल्यातील सामाजिक एकतेमध्ये वाढ होते.बंधुभावाची भावना वाढते.

रक्षाबंधन चे गाणे मराठी लिस्ट

  • रक्षाबंधनाचा सण
  • दिपावलीचा सण वर्षाच
  • बंधुराया येइल माहेरला नील
  • जा पाखरा जा
  • ये तो आनी तसाच जातो
  • बंधू धाड तू
  • माझा भाऊराया परदेशीला
  • रक्ताची नाती हाय
  • सोनी मला राखी तू बांधायची नाय
  • आली राखी पुनव ये रे भाऊराया
  • बंधु मोठ्या मनाचा

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा । रक्षाबंधन शुभेच्छा मराठी । रक्षाबंधन मराठी शुभेच्छा

कुठल्याच नात्यात नसेल

एवढी ओढ आहे,

म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,

खूप खूप गोड आहे…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

राखीचे नाते लाखमोलाचे

बंधन आहे बहीण भावाचे

नुसता धागा नाही त्यात

भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात

भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्राला चंदन देवाला वंदन

भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे..रक्षाबंधन

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

क्षाबंधन

निराळ्या मायेचा झरा,

कायम असाच भरलेला.

वाहत राहो निखळपणे,

शुभेच्छ बहिण-भावला..

रक्षाबंधनाच्या

हार्दिक शुभेच्छा.

हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन

जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी राहशील माझ्या जवळ,

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,

बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,

ओवाळीते प्रेमाने,उजळुनी दीप-ज्योती,

रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती,

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

FAQ On Raksha Bandhan Information In Marathi

रक्षाबंधन कधी आहे?

रक्षाबंधन गुरुवार ११, ऑगस्ट ला आहे.

आशा आहे की आम्ही दिलेल्या रक्षाबंधन विषयी माहिती चा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Raksha Bandhan Information In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *