Home » Jobs & Education » Essay Writing » Republic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये

Republic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये

प्रजासत्ताक दिन निबंध, 26 जानेवारी निबंध (Republic Day Essay In Marathi, 26 January Essay In Marathi, Essay On Republic Day In Marathi, Gantantra Diwas In Marathi)

Republic Day Essay In Marathi म्हणजे प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिवस या विषयावर मराठी निबंध येथे मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.

प्रजासत्ताक दिन या विषयावर लिहिलेले हे मराठी निबंध मुलांसाठी १,२,३,४,५,६,७,८,९,१०, आणि ११,१२ वर्ग आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले आहे. Republic Day Essay In Marathi हा निबंध आपल्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वापरू शकता. या वेबसाइटवर आपल्याला इतर विषयांवर मराठीमध्ये निबंध सापडतील, जे आपण वाचू शकता.

प्रजासत्ताक दिन निबंध | Republic Day Essay In Marathi

२६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन, हिंदीमध्ये याला भारतीय गणतंत्र दिवस आणि इंग्रजीत रिपब्लिक डे ऑफ इंडिया असे म्हटले जाते. आपण वर्षभरामध्ये अनेक राष्ट्रीय सण साजरे करतो त्यांपैकी महत्वाचे तीन राष्ट्रीय सण म्हणजे स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), गांधी जयंती (२ ऑक्टोबर) आणि प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी). खरं पाहायला गेलं तर अनेक जणांना स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) आणि प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) यातील फरकच कळत नाही.

आज आपण पाहुयात कि प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमकं काय? आणि आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो? सर्व भारतीयांसाठी हा राष्ट्रीय सण खूप महत्वाचा आणि अभिमानाचा आहे. खरतर २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनालाच स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायला पाहिजे. कारण १५ ऑगस्ट १९४७ ला आपला भारत देश स्वतंत्र झाला खरं परंतु आपण अजूनही इंग्रजांचे कायदे कानून पाळत होतो. २६ जानेवारी १९५० ला संविधान समितीने आपलं स्वतःचं संविधान बनवून संपूर्ण भारतात लागू केलं. २६ जानेवारी १९५० लाच भारतातील सर्व राज्यांनी भरतीय राज्यघटना स्वीकारली आणि अंमलात आणली. 

प्रजासत्ताक चा अर्थ म्हणजे प्रजेने, प्रजेचे, प्रजेसाठी चालवलेले राज्य. १५ ऑगस्ट १९५० ला जरी भारत स्वतंत्र झाला असला तरी २६ जानेवारी १९५० ला खरं प्रजेचं राज्य आलं असं म्हणता येईल. या दिवसापासूनच प्रजेची सत्ता सुरु झाली. म्हणून २६ जानेवारी हा महत्वाचा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.

प्रजासत्ताक दिनाचा आपण थोडक्यात इतिहास पाहुयात

इ.स. १६०० मध्ये इंग्रज भारतात आले. सुरुवातीला इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून व्यापार करण्यासाठी आले होते. त्यांच्याकडे फक्त व्यापार करण्याचा अधिकार होता. व्यापार करत असतानाच इ.स. १७६५ मध्ये इंग्रजांनी बंगाल, बिहार, आणि ओरिसा या क्षेत्रांचे महसूल व दिवाणी न्यायाचा अधिकार मिळवले. तेव्हापासून इंग्रजांना सत्ता करण्याची लालसा वाढू लागली. हळूहळू इंग्रजांनी संपूर्ण भारतावर त्यांची सत्ता प्रस्थापित केली. इ.स. १८५७ च्या उठावामुळे ब्रिटिश राजघराण्याने भारतातील सत्तेची जबाबदारी त्यांच्याकडे घेतली. ब्रिटिश राजघराण्याची हि सत्ता भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत चालू राहिली. भारत स्वतंत्र झाला परंतु भारतीयांना राज्यव्यवस्था चालवण्यासाठी राज्यघटनेची गरज भासू लागली. त्यामुळे संविधान सभा स्थापन करण्यात आली. सुमारे २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना अस्तित्वात आली आणि सर्वांच्या संमतीने ती अमलात आणली गेली. या दिवसालाच आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.

हा महत्वाचा राष्ट्रीय सण कसा साजरा केला जातो किंवा याच स्वरूप कसं असतं ते आपण पाहुयात

प्रजासत्ताक दिन हा सण २६ जानेवारी या दिवशी संपूर्ण भारत देशात विशेषतः देशातील सर्व राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करून आणि राष्ट्रगीत गाऊन साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी शाळा, महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालये यांची सजावट केली जाते. या दिवशी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. शाळा महाविद्यालयामध्ये सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, परेड्स, कवायती असे अनेक कार्यक्रम घेतले जातात. एनसीसी आणि स्काऊट चे विद्यार्थी सुंदर कवायती आणि कसरती करून दाखवतात. तसेच या दिवशी अनेक विशेष कामगिरी करणाऱ्या लोकांना सन्मान, पदके आणि बक्षिसे वितरित केली जातात. अनेक शाळांमध्ये लहान मुलांना खाऊ वाटप केले जाते. 

शाळा आणि महाविद्यालयातील मुलांना या सणाचं विशेष आकर्षण असतं. कारण प्रजासत्ताक दिन जवळ आला म्हणजे आठवडा भर आधीपासूनच तय्यारी सुरु होते. शाळा स्वच्छ करणे आणि सजवणे, आपापले वर्ग सजवणे याची मजाच वेगळी असते. अनेक खेळ आणि स्पर्धा यांचं आयोजन केलं जातं. सांस्कृतिक कार्यक्रम असतील तर त्यांचीही तयारी आठवडा भर आधीपासूनच केली जाते. प्रजासत्ताक दिना दिवशी अनेक ठिकाणी तर सकाळी सकाळीच प्रभात फेऱ्या काढल्या जातात. सर्व लहान मोठी मुलं तिरंगा ध्वज हातात घेऊन मोठ्या उत्साहात या प्रभात फेरीत सहभागी होतात आणि भारत मातेचा जयघोष करतात. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्यांनी खूप कष्ट घेतले, ज्यांनी प्राणांची आहुती दिली त्यांच्या नावाचे नारे लावले जातात. जनजागृती विषयक नारेसुद्धा या प्रभातफेरीमध्ये लावले जातात. 

प्रजासत्ताक दिन म्हटलं कि प्रमुख आकर्षण असतं ते म्हणजे देशाची राजधानी दिल्ली मध्ये साजरा होणारा प्रजासत्ताक दिन. दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. संपूर्ण देशातून महत्वाचे मंत्री, अनेक दिग्गज व्यक्ती, मान्यवर लोक तिथे उपस्थित होतात. जर वर्षी या दिवशी परदेशातील कोणत्याही एका राष्ट्रप्रमुखाला किंवा अतिमहत्वाच्या मंत्र्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविले जाते. दिल्लीतील प्रजासत्ताक दिन आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला जातो. लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं. त्यानंतर पंतप्रधान लाल किल्ल्यावरूनच देशाला संबोधित करत भाषण करतात. या भाषणात पंतप्रधान वर्षभर घडलेल्या घटना, पार पडलेली कामे, तसेच भविष्यात काय करणार आहोत याबद्दल सांगतात. त्याचबरोबर काही योजना आणायच्या असतील तर त्याही पंतप्रधान याच दिवशी घोषित करतात. त्यामुळे प्रजासत्ताक दिनादिवशी होणाऱ्या पंतप्रधानांच्या या भाषणाला खूपच महत्व आहे. भाषणानंतर अनेक सन्मान, पारितोषके, विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींना पदके वितरित केली जातात. 

हे सगळं झाल्यावर मग येतो तो महत्वाचा भाग ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो. देशाच्या तिन्ही दलातील जवानांच्या परेड्स आणि कवायती. खरतर हे पाहण्यासाठीच तर आपण सर्व जण टीव्हीला अक्षरशः डोळे लावून बसलेलो असतो. तिन्ही दलातील जवान एका मागोमाग रांगेत अतिशय शिस्तीत परेड्स करत येतात. प्रत्येक टीमचं नेतृत्व त्यांचे प्रमुख करत असतात. प्रत्येक टीम पंतप्रधानांच्या समोर येऊन त्यांना सलाम करून पुढे निघून जाते. खरतर हे एक प्रकारचं शक्तिप्रदर्शनच असतं. या जवानांची शिस्त आणि त्यांचा जोश, उत्साह बघून आपल्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. आता तर महिला जवानांची टीम सुद्धा या परेड्स मध्ये सहभागी होत आहे त्यांचं नेतृत्व सुद्धा महिला अधिकारिच करत असतात. हि आपल्यासाठी खूपच सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. 

आर्मीतील जवान अनेक कसरती करतात मोटारसायकल वरील कसरती , घोड्यावरील कसरती करतात. या कसरतीमध्येसुद्धा महिला जवान मागे राहिल्या नाहीत त्यासुद्धा पुरुष जवानांच्या खांद्याला खांदा लावून श्वास रोखून पाहावं अश्या कसरती करतात. त्यानंतर वेळ येते ती देशाकडे असणाऱ्या युद्धसामग्रीच प्रदर्शन. यामध्ये अनेक प्रकारचे रणगाडे, तोफा, मिसाईल्स, युद्धामध्ये वापरल्या जाणाऱ्या गाड्या, शस्त्रे, क्षेपणास्त्रे यांचं प्रदर्शन केलं जातं. वेगवेगळ्या प्रकारची विमाने, हेलिकॉप्टर्स, कमी पल्ल्याची, लांब पल्ल्याची मिसाईल्स दाखवले जातात. विमानांनी सादर केलेल्या कसरती खूपच मनमोहक असतात.

यात आणखी एक महत्वाचं मनमोहक दृश्य असतं ते म्हणजे वेगवेगळ्या राज्यांनी प्रदर्शित केलेले देखावे. प्रत्येक राज्य यादिवशी दिल्लीत एक देखावा सादर करत असतो. या देखाव्यामध्ये आपापल्या राज्याची संस्कृती दाखवली जाते. या देखाव्यांना इतक्या सुंदर प्रकारे सजवलेले असते कि ते इतके मनमोहक आणि जिवंत असल्यासारखे  दिसतात. या सर्व राज्यांच्या देखाव्यामधून सर्वात चांगल्या देखाव्याचा पहिला नंबर देखील काढला जातो आणि त्यांना बक्षीस दिल जातं. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीमध्ये अक्षरशः भारताच्या सर्व क्षेत्रातील आणि विविध राज्यातील सांस्कृतिक वैभवाचे दर्शनच घडवले जाते.

अशा प्रकारचे राष्ट्रीय सण साजरे केल्यामुळे जनतेच्या मनातील राष्ट्र भावना उसळून आणि उजळून निघते आणि आपलं आपल्या देशावरचं प्रेम वाढत जातं. पण फक्त आनंदात आणि उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला म्हणजे आपण देशावर खूप प्रेम करतो असं नाही, इथेच आपली जबाबदारी संपत नाही. खरंतर या दिवशी आपण देशहितकारक कार्ये करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे आणि संविधानामध्ये सांगिल्याप्रमाणे नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचं पालन केलं पाहिजे.

भारताच्या संविधानात नागरिकांसाठी दिलेले मूलभूत कर्तव्ये खालीलप्रमाणे:

मूलभूत कर्तव्ये – प्रत्येक भारतीय नागरिकाचे हे कर्तव्य असेल कि त्याने – 

  • प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शांचा, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा. 
  • स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करावे 
  • देशाचे सार्वभौमत्व, एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे          
  • आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी 
  • सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा 
  • आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे 
  • नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी 
  • वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासूवृत्ती अंगी बाळगावी 
  • सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे. हिंसेचा त्याग करावा 
  • देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा 
  • ६ ते १४ वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनीशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात

अशा पदधतीने आज आपण प्रजासत्ताक दिन या विषयावर मराठी निबंध बघितला आहे. आशा आहे की आम्ही दिलेल्या निबंधाचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली मराठी निबंध आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला Republic Day Essay In Marathi या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी निबंध हवा असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *