Facebook Twitter Instagram
    Facebook Twitter Instagram
    Read In Marathi – वाचा मराठी मध्ये
    • Jobs & Education
      • Marathi Alphabet
      • Advertisement Writing
      • Essay Writing
      • Letter Writing
      • Stories
        • Moral Stories
    • Business & Finance
      • Business
      • Finance
    • People & Society
      • Health
      • Information
      • Biography
      • Festival Information
      • Devotional
        • Hanuman Chalisa
      • Quotes
      • Meaning
      • Names
      • Wishes
    • Schemes
      • Central Government Schemes
        • Pradhan Mantri Yojana
      • Maharashtra Government Schemes
    • Sports & Entertainment
      • Sports
      • Entertainment
      • Web Stories
    • Download
    • News
    • About
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
      • Terms Of Use
      • DMCA Copyright
    Read In Marathi – वाचा मराठी मध्ये
    Home » Quotes & Wishes » Quotes » [अगदी सोप्या भाषेत] Share Market Information In Marathi । शेअर मार्केट बद्दल माहीती मराठीत
    Share Market

    [अगदी सोप्या भाषेत] Share Market Information In Marathi । शेअर मार्केट बद्दल माहीती मराठीत

    Sammiksha PawarBy Sammiksha PawarDecember 23, 2021Updated:December 23, 2021No Comments10 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share Market Information In Marathi
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शेअर मार्केट बद्दल माहीती, शेअर म्हणजे काय, शेअर होल्डर कोणाला म्हणतात, शेअर मार्केट म्हणजे काय असते, शेअर मार्केट चे प्रकार, IPO म्हणजे काय, डिमॅट अकाउंट म्हणजे काय, शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक कशी करावी, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असते व इन्व्हेस्टमेंट चे प्रकार, ट्रेडिंग म्हणजे काय असते व  ट्रेडिंग चे प्रकार, Stock Exchanges काय असते (share market information in marathi, share market knowledge in marathi, stock market in marathi, share market basics in marathi, share market marathi mahiti)

    आज आपल्याला प्रत्येकाला आपल्या पैशांची अशा योग्य ठिकाणी गुंतवणुक करायची असते. जिथे आपले पैसे गुंतवल्याने आपल्या पैशांमध्ये वाढ होईल. अशा वेळी आपल्या कडे गुंतवणुकीचा सर्वात पहिला पर्याय भेटतो तो म्हणजे शेअर मार्केट.

    पण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यात खुप जास्त जोखिम असते. असे प्रत्येक व्यक्तीकडुन ऐकु आल्याने तसेच सोशल मिडियावर शेअर मार्केटविषयी माहीती शोधल्यावर आपणास सर्वप्रथम निदर्शनास येत असते.

    म्हणुन सर्वसामान्य व्यक्ती शेअर मार्केटमध्ये आपले पैसे गुंतवायला फार घाबरत असते. कारण आपल्याला आपले पैसे डुबण्याची भीती लागुन असते. सर्वसामान्य माणसाच्या मनातील शेअर मार्केट विषयीची भीती कमी व्हावी आणि त्याला आपल्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणुक करता यावी. म्हणुन आजच्या लेखात आपण शेअर मार्केट विषयी काही बेसिक तसेच महत्वपुर्ण माहीती जाणुन घेणार आहोत.

    Contents hide
    1. Share Market Information In Marathi | शेअर मार्केट मराठी माहिती
    1.1. शेअर मार्केट (शेअर बाजार) म्हणजे काय ?
    1.2. शेअर मार्केट चा इतिहास (Share Market History In Marathi)
    1.3. शेअर मार्केट चे प्रकार (Types Of Share Market In Marathi)
    1.3.1. 1. Primary Market
    1.3.2. 2. Secondary Market
    1.4. IPO म्हणजे काय ?
    1.5. डिमॅट अकाउंट म्हणजे काय ?
    1.6. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी?
    1.7. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असते व इन्व्हेस्टमेंट चे प्रकार ?
    1.7.1. Investment (गुंतवणुक) म्हणजे काय ?
    1.7.2. इन्व्हेस्टमेंट चे प्रकार
    1.8. ट्रेडिंग म्हणजे काय असते व ट्रेडिंग चे प्रकार ?
    1.8.1. ट्रेडिंग म्हणजे काय ?
    1.8.2. ट्रेडिंग चे प्रकार ?
    1.9. इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग मध्ये काय फरक आहे ?
    1.10. डिमॅट अकाउंट कसे उघडायचे?
    1.10.1. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे (Document)
    1.11. Stock Exchanges काय असते?
    1.12. भारताचे स्टॉक एक्सचेंजस
    1.12.1. 1. NSE – (National Stock Exchange)
    1.12.2. 2. BSE (Bombay Stock Exchange)
    1.12.3. 3. MCX (Multi Commodity Exchange)
    1.13. SEBI (Security And Exchange Board Of India)
    1.14. स्टॉक मार्केटचे सर्व प्रकार
    1.14.1. 1. Equity Market:
    1.14.2. 2. Currency Market
    1.14.3. 3. Commodity Market
    1.14.4. 4. Derivatives Market
    1.15. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचे फायदे कोणकोणते असतात?
    1.16. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचे तोटे कोणकोणते असतात?
    2. FAQ On Share Market In Marathi

    Share Market Information In Marathi | शेअर मार्केट मराठी माहिती

    गुंतवणूकीचा प्रकार (Investment Type)शेअर मार्केट (Share Market), शेअर बाजार, Stock Market
    शेअर मार्केट नियामक संस्था (Stock Market Regulatory Body)भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) [Securities and Exchange Board of India (SEBI)]
    Share Market Timing Monday To Friday (9 AM To 4 PM)

    शेअर मार्केट (शेअर बाजार) म्हणजे काय ?

    जसे कि आपल्याला माहित असेल की शेअर बाजाराला शेअर मार्केट किंवा Stock Market या नावाने देखील ओळखले जाते, Share चा अर्थ थेट “भाग” असतो, तर शेअर बाजाराच्या कंपनीत असलेल्या आपल्या भागाला आपण Share म्हणू शकतो. 

    उदाहरणार्थ, समजा एखाद्या कंपनीने एक लाख शेअर्स जारी केले आहते . आता जर एखाद्या व्यक्तीने त्या कंपनीतील काही Share विकत घेत असेल तर तो त्या शेअर्सचा मालक बनतो. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीचे 1 लाख पैकी 40,000 शेअर्स खरेदी केल्यास त्या कंपनीत त्याचा हिस्सा 40% असेल. आणि तो 40% वाटा त्याच्या मालकीचा असेल. 

    Stocks कोणत्याही कंपनीतील व्यक्तीचा हिस्सा दाखवतात आणि जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीस पाहिजे असेल तेव्हा तो आपले शेअर्स इतरांना विकू शकतो किंवा दसुर्या व्यक्तीचे शेअर्स खरेदी करू शकतो. कंपन्यांच्या share चे किंवा  Stock चे मूल्य BSE मध्ये नोंदविले जाते. कंपनीच्या नफानुसार सर्व कंपन्यांच्या Share चे मूल्य कमी होते किंवा वाढत जाते. संपूर्ण बाजारावर नियंत्रण ठेवण्याचे काम भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) करते. 

    जेव्हा SEBI एखाद्या कंपनीला परवानगी देते तेव्हाच ती कंपनी आपली Initial public offering जाहीर करू शकते. कोणतीही कंपनी सेबीच्या परवानगीशि वाय IPO देऊ शकत नाही. 

    शेअर मार्केट चा इतिहास (Share Market History In Marathi)

    भारतीय शेअर बाजारची सुरवात १८७५ ला Bombay Stock Exchange (BSE) द्वारे प्रेमचंद रॉयचंद यांच्याकडून झाली आणि NSE (National Stock Exchange) ची सुरवात १९९२ ला झाली अणि त्याच वेळी १२ एप्रिल १९९२ ला SEBI (Security & Exchange Board Of India)  ही सुरवात झाली आणि अशा रितीने भारतात शेअर मार्केट म्हणजेच स्टॉक मार्केट ची सुरवात झाली.

    शेअर मार्केट चे प्रकार (Types Of Share Market In Marathi)

    1. Primary Market 

    कंपन्या या बाजार मध्ये (Public issue) सारखे मुद्दे मांडून स्वतःसाठी पैसे गोळा करतात, आणि गुंतवणूकदार (Investor)  त्या (Issue) साठी अर्ज करतात, मग कंपनी आपले शेअर त्या गुंतवणूकदारांना देते अणि अशा प्रकारे कंपनी ला पैसे भेटतात आणि गुंतवणूकदारांना कंपन्यांमध्ये गुंतवणूक मिळते

    2. Secondary Market 

    या बाजारात स्टॉक एक्सचेंजद्वारे गुंतवणूकदारांमध्ये शेअर्स खरेदी आणि विकले जातात. जेव्हा कंपनी IPO (Primary Market) मध्ये येते, तेव्हा त्या कंपनीला Secondary Market मध्ये उतरवले जाते. Secondary Market मध्ये SEBI (Securities and Exchange Board of India) म्हणजेच मान्यताप्राप्त ब्रोकर द्वारे कोणत्याही कंपनी चे शेअर खरेदी अणि विक्री करू शकतो.

    IPO म्हणजे काय ?

    IPO (Initial Public Offering): जेव्हा एखादी कंपनी भांडवल वाढवण्यासाठी आपल्या कंपनीचे शेअर्स सेबी (SEBI) ची परवानगी घेऊन पहिल्यांदा शेअर बाजारात आणते त्याला IPO असे म्हणतात. IPO मुळेसामान्य गुंतवणूकदार थेट कंपनीकडून शेअर घेते अन त्याबदल्यात कंपनीला भांडवल वाढते . यालाच आपण Primary मार्केट असे म्हणतो.  यामध्ये कंपनीने शेअरच्या किंमतीची  Range ठरवलेली असते आपण त्या Range मधून शेअर्स घेऊ शकतो. 

     IPO तुम्ही दोन पद्धतीने घेऊ शकता ,

    1. बँकद्वारे
    2. डिमॅट अकाउंट द्वारे 

    डिमॅट अकाउंट म्हणजे काय ?

     या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा प्रश्न पढतो की Demat Account काय आहे ज्या प्रकारे पैसे ठेवण्यासाठी, त्या पैशांचे सुलभरीत्या व्यवहार करता यावेत यासाठी बँक खातं असतं त्याचप्रकारे Shares ठेवण्यासाठी, ते खरेदी-वि क्री करण्यासाठी  डिमॅट अकाउंट आवश्यक आहे. जर तुम्हाला Share market मध्ये गुंतवणूक करायची असेल तर Demat Account आवश्यक आहे.  

    शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी?

    शेअर बाजार हा सर्वांसाठी आहचे. परंतु अजूनही शेअर बाजार हा बाजार नाही निव्वळ जुगार आणि तोसुद्धा फक्त पैशेवाल्यांचा असा समज करून बहुतांश सर्वसामान्य लोक यापासून दुरच असतात. मुळात शेअर बाजार हा त्यांच्यासाठी आहे जो आपल्या उत्पन्नातील काही रक्कम गुंतवणूक म्हणून मोजता आणि सोसता येईल असा धोका पत्करून गुंतवू इच्छितो. योग्य तो अभ्यास करून जर शेअर बाजार मध्ये तुम्ही गुंतवणुक केली तर तुम्ही नक्की पैसे कमवू शकता, तुम्ही शेअर मार्केट चा अभ्यास करून व  डिमॅट अकाउंट उघडून गुंतवणूक करू शकता आणि चांगले पैसे कमावू शकता. 

    इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असते व इन्व्हेस्टमेंट चे प्रकार ?

    Investment (गुंतवणुक) म्हणजे काय ?

    जेव्हा आपण भविष्यात मालमत्तेच्या खरेदीतून नफा मिळेल या अपेक्षेने आर्थिक मालमत्ता खरेदी करतो, तेव्हा त्याला गुंतवणूक (Investment) म्हणतात.

    इन्व्हेस्टमेंट चे प्रकार

    • Share Market (शेअर मार्केट)
    • Real Estate (इमारत ,जमीन )
    • Gold (सोने,चांदी इ.)
    • Mutual Fund 

    ट्रेडिंग म्हणजे काय असते व  ट्रेडिंग चे प्रकार ?

    ट्रेडिंग म्हणजे काय ?

    गुंतवणूक ही जास्त कालावधीसाठी केली जाते कमीत कमी १ वर्ष अणि जास्तीत जास्त २०-२५ वर्ष म्हणून ही एक Long term  म्हणजेच जास्त कालावधी साठी केलेली गुंतवणूक आहे म्हणून ह्या मध्ये return पण जास्त असतात पण ट्रेडिंग ही एक शॉर्ट टर्म प्रोसेस आहे की जी कमी वेळेसाठी जाते म्हणजेच या मध्ये कमीत कमी एक दिवस ते जास्तीत जास्त  १ वर्षासाठी शेअर ठेऊ शकता ह्या मध्ये रिस्क ही जास्त आहे पण Return ही जास्तीत जास्त भेटतात.

    ट्रेडिंग चे प्रकार ? 

    • इंट्राडे ट्रेडिंग (intraday trading )
    • स्विंग ट्रेडिंग (swing trading )
    • पोज़िशनल ट्रेडिंग (Positional trading )  

    इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग मध्ये काय फरक आहे ?

    Investment मध्ये पैसे कमवण्याचा एकच मार्ग आहेआणि तो म्हणजे Research, तुम्हाला कंपनीचे Fundamental Analysis करावे लागेल आणि जेव्हा कंपनीची चांगली वाढ होईल, तेव्हा गुंतवणूकदार त्याच्या शेअरची किंमत वाढवून नफा कमावतो.

    तर ट्रेडिंगमध्ये पैसे कमवण्यासाठी तुम्हाला Technical Analysis येणे खूप महत्वाचे आहेकारण गुंतवणुकीच्या तुलनेत हेखूप जोखमीचे आहे आणि अगदी जुगार मानले जाते, परंतु विना Analysis चे ट्रेडिंग करा किंवा गुंतवणूक दोन्ही सट्टा आहे आपल्याला Charts बद्दल चांगले ज्ञान असले पाहिजे आणि Indicators बद्दल देखील जागरूक असले पाहिजे. येथेही गुंतवणूकदाराला महिन्यासाठी 10-15 टक्के return अपेक्षित आहे. 

    डिमॅट अकाउंट कसे उघडायचे?

    डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे  (Document) 

    • Pan Card 
    • आधार कार्ड 
    • बँक पासबुक किवा बँक स्टेटमेंट किंवा सॅलरी स्लिप (salary Slip )
    • बँक पासबुक फोटो (फ्रंट पेज ) किंवा कॅन्सल चेक (Cancel cheque)
    • मोबाइल नंबर (की जो आधार कार्ड ला लिंक असावा)

    सदर कागदपत्रे (Document) आपल्या जवळ असतील तर 10 मिनिट मध्ये आपले डिमॅट अकाउंट उघडेल अणि आपण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकता. 

    Stock Exchanges काय असते?

    स्टॉक एक्सचेंज ही एक अशी गोष्ट आहे की जिथे सर्व कंपन्या लिस्टेड असतात जेव्हा एखाद्या कंपनीला स्टॉक मार्केटमधून पैसे गोळा करावे लागतात, तेव्हा ती कंपनी स्वतः स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड  होते. जेणे करुन लोक त्या कंपन्यात गुंतवणूक करू शकतात जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा स्टॉक एक्सचेंजमध्ये स्वतःला लिस्टेड  करते, तेव्हा या प्रक्रि येला IPO म्हणतात. आयपीओमध्ये गुंतवणूकदार थेट कंपनीकडून शेअर्स खरेदी करतो, त्यानंतर एक गुंतवणूकदार दुसऱ्या गुंतवणूकदाराकडून शेअर्स खरेदी करतो आणि विकतो

    शेअर्स, बॉण्ड्स, डिबेंचर, म्युच्युअल फंड, डेरिवेटिव्ज (Derivatives) व्यतिरिक्त, सरकारी सिक्युरिटीज देखील स्टॉक एक्स्चेंजमध्ये विकल्या जातात. कोणतीही व्यक्ती थेट स्टॉक एक्स्चेंजमधून शेअर्स खरेदी करू शकत नाही, परंतु त्याला ब्रोकर कडे त्याचे ट्रेडिंग आणि डिमॅट खाते उघडावे लागते आणि त्या ट्रेडिंग आणि डिमॅट खात्याद्वारे शेअर्स Buy-Sell करावी लागते सर्व ब्रोकर स्टॉक एक्सचेंजचे मेंबर असतात.

    भारताचे स्टॉक एक्सचेंजस

    1. NSE – (National Stock Exchange) 

    • NSE हेभारतातील सर्वा त मोठेस्टॉक एक्सचेंज आहे भारतात, जास्तीत जास्त खरेदी किंवा  विक्री NSE मध्ये केली जाते.
    • NSE ची सुरुवात 1992 मध्ये झाली,NSE हेभारतातील पहि ले स्टॉक एक्सचेंज होते ज्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शेअर्सची खरेदी आणि विक्री सुरू केली. 
    • NSE मध्ये सुमारे2000 कंपन्या लिस्टेड आहेत NSE चा मुख्य Index Nifty 50 आहे।NSDL (National Securities Depository Limited) NSE साठी Depository Service पुरवते 

    2. BSE (Bombay Stock Exchange)

    • BSE भारतातील सर्वात जुने आणि दसुरे मोठे स्टॉक एक्सचेंज आहे BSE 1875 मध्ये सुरु करण्यात आले होते.
    • भारतातील पहि ले Equity Derivatives ट्रेडिंग BSE ने सुरु केले होते. 
    • BSE मध्ये 5000 पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड  आहते . BSE चा मुख्य Index (Sensex 30) आहे CDSL (Central Depository Services) BSE साठी Depository Service पुरवते 

    3. MCX (Multi Commodity Exchange)

    • MCX एक कमोडिटी एक्सचेंज आहे MCX मुख्यतः फक्त Bullion [precious metals] मध्ये ट्रेड करते.
    • याचा अर्थ असा की फक्त Gold, Silver, Crude oil,Zinc इत्यादी वस्तूंचे ट्रेड केले जाते. 

    SEBI (Security And Exchange Board Of India)

    भारतीय भांडवल बाजारात नियंत्रण आणण्यासाठी व विकास घडवून आणण्यासाठी एक स्वतंत्र संस्था म्हणून सेबी ची स्थापना करण्यात आली.शेअर मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात रोजच पैशांची उलाढाल होत असते अशा ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडून  देणे, होणाऱ्या व्यवहारांवर  नियंत्रण ठेवणे व गुंतवणूकदारांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे काम SEBI करते.

    SEBI ही एक स्वतंत्र सरकारी संस्था आहे गुंतवणूकदारांसोबत कोणतीही फसवणूक होऊ नये याची जबाबदारी SEBI वर असते. तसेच कोणतेही फसवणूक किंवा चुकीचे व्यवहार जाले असतील तर त्याच्या वर कारवाही करण्याचा हक्क ही SEBI ला असतो. 

    स्टॉक मार्केटचे सर्व प्रकार

    1. Equity Market:

    • इक्विटी मार्केटला शेअर मार्केट, कैपिटल मार्केट, सिक्योरिटीज मार्केट किंवा मनी मार्केटअसेही म्हणतात.                        
    •  त्यात शेअर्सची खरेदी आणि वि क्री समाविष्ट आहे. 
    • आपण NSE आणि BSE दोन्ही एक्सचेंजवर शेअर्स खरेदी करू शकतो. 
    • इक्विटी मार्केटची वेळ सकाळी 9.15 ते दपुारी 3.30 पर्यंत आहे. 

    2. Currency Market

    • फ्युचर्स ट्रेडिंग Currency मार्केटमध्ये केले जाते. 
    • NSE, BSE आणि MCX एक्सचेंजवर करन्सी ट्रेडिंग केली  जाते. 
    • करन्सी ट्रेडिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत आहे. 
    • मनी मार्केटमध्ये खालील दिलेल्या चलनांचा किंवा देशांचा व्यापार केला जातो.

    1. USD – United States Dollar 

    2. Euro- European Euro 

    3. Yen – Japanese Yen 

    4. GBP – Great Britain Pound

    5. INR – Indian Rupees

    3. Commodity Market

    कमोडि टी मार्केट हे गुंतवणूकदारांसाठी मौल्यवान धातू, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, ऊर्जा आणि मसाल्यासारख्या वस्तूंचे ट्रेड करण्याचे ठिकाण आहे उदाहरणार्थ (Crude OIl ,Gold ,Silver).

    4. Derivatives Market

    डेरिवेटिव्ज म्हणजे त्या वस्तू ज्याचे मूल्य दसुऱ्या वस्तूवर अवलंबून असते, डेरिवेटिव्ज मार्केट इक्विटी मार्केटमधून तयार केलेले आहे.   

    डेरिवेटिव्ज मार्केटचे दोन प्रकार आहेत, 

    1. Future (फ्यूचर)

    2. Option (ऑप्शन)

    शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचे फायदे कोणकोणते असतात?

    शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचे अनेक फायदे असतात. ते पुढीलप्रमाणे आहेत.

    • शेअर मार्केटमध्ये आपले पैसे गुंतवण्याचा सगळयात महत्वाचा फायदा म्हणजे शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणुक केल्याने आपल्याला थोडयाच कालावधीत जास्तीत जास्त रिटर्न प्राप्त होत असतो.
    • शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्याने आपल्याला पैशाने पैसा कमवता येत असतो.
    • शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्याने आपल्याला Tax मध्ये बेनिफिट देखील मिळत असतो.

    शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचे तोटे कोणकोणते असतात?

    शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचे जसे आपल्याला फायदे होत असतात तसेच शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्याने काही तोटे देखील आपल्याला सहन करावे लागत असतात. आणि ते तोटे पुढीलप्रमाणे असतात:

    • शेअर मार्केटमध्ये शेअरची किंमत कधीही वाढु शकते तसेच कधीही कमी होऊ शकते.
    • शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यात सर्वात जास्त रिस्क असते.
    • एफ डी आर डी मध्ये पैसे गुंतवल्याने जसे आपल्याला निश्चित रक्कम मिळत असते तसा प्रकार इथे अजिबात नसतो.शेअर मार्केटमध्ये आपल्याला हाय रिटर्न तर मिळतो पण फिक्स रिटर्न मिळत नसतो.आज खुप जास्त नफा झाला तर नंतरून भविष्यात खुप कमी नफा देखील इथे मिळत असतो. म्हणुन इथे संयम बाळगणे तसेच विचार विनिमय करून पैशांची गूंतवणुक करणे फार गरजेचे असते.

    FAQ On Share Market In Marathi

    शेअर म्हणजे काय?

    शेअर म्हणजे एक हिस्सा तसेच वाटा असतो. जेव्हा आपण एखाद्या कंपनीमधील एखादा भाग विकत घेतो तेव्हा त्यालाच शेअर असे म्हटले जाते.आपण कोणत्याही कंपनीचे शेअर विकत घेऊ शकतो.तसेच ते इतर कोणाला विकु देखील शकतो.

    शेअर होल्डर कोणाला म्हणत असतात?

    एखाद्या कंपनीचा भाग विकत घेत असलेल्या व्यक्तीला आपण शेअर होल्डर असे म्हणत असतो.

    अंतिम निष्कर्ष :

    अशा पदधतीने आज आपण शेअर मार्केट बद्दल माहिती जाणुन घेतली आहे. आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

    आपल्याला या Share Market Information In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

    अधिक वाचा :

    • Mutual Fund Information In Marathi
    • बिटकॉइन म्हणजे काय मराठी माहिती

    share market basic information in marathi stock market information in marathi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sammiksha Pawar
    • Website
    • Facebook
    • LinkedIn

    नमस्कार, माझे नाव समीक्षा पवार आहे आणि मी Read In Marathi या मराठी ब्लॉग ची संस्थापक आहे, जिथे मी मराठी संबंधित लेख लिहिते आणि मराठी वाचकांना मार्गदर्शन करते.

    Leave A Reply Cancel Reply

    Recent Posts
    • Republic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये
    • Top 54 Best Small Business Ideas in Marathi [2023] | कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही Business Ideas
    • [30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi
    • मकर संक्रांतीची माहिती 2023- Makar Sankranti (मकर संक्रांती) 2023 In Marathi
    • 26 January Republic Day Speech In Marathi 2023 | 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण मराठी
    Categories
    • Advertisement Writing
    • App
    • Banking
    • Bigg Boss Marathi
    • Biography
    • Business
    • Central Government Schemes
    • Cricket News & Updates Marathi
    • Cryptocurrency
    • Devotional
    • Digest
    • Download
    • Entertainment
    • Essay Writing
    • Farmer Scheme
    • Festival Information
    • Finance
    • Full Form
    • Ganpati Names
    • Hanuman Chalisa
    • Health
    • House Names
    • How To
    • Information
    • Jobs
    • Jobs & Education
    • Lagna Patrika
    • Letter Writing
    • Love Letter
    • Maharashtra Government Schemes
    • Mangalashtak Marathi
    • Marathi Alphabet
    • Marathi Grammar
    • Marathi Numbers
    • Marriage Biodata Format
    • Meaning
    • Moral Stories
    • Mutual Fund
    • Names
    • News
    • Pradhan Mantri Yojana
    • Quotes
    • Recipes
    • Share Market
    • Speech
    • Stories
    • Technology
    • Tulsi Vivah Mangalashtak Lyrics
    • Twins Baby Boy Names
    • UPI
    • Whats App Group
    • Wishes
    Facebook Twitter Instagram Pinterest
    • About
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Disclaimer
    • Terms Of Use
    • DMCA Copyright
    © 2023 Read In Marathi. Designed by Read In Marathi.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.