Shetkaryachi Atmakatha Essay (Nibandh) In Marathi म्हणजे शेतकऱ्याची आत्मकथा या विषया वर मराठी निबंध येथे मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.
शेतकऱ्याची आत्मकथा वर मराठी निबंध Shetkaryachi Atmakatha Essay (Nibandh) In Marathi
लेतो अंगावर चिंध्या
खातो मिरची भाकर
काढी उसाची पाचट
जगा मिळाया साखर
काटा त्याच्याच का पाई
त्यानं काय केलं पाप ?
माझा बाप शेतकरी
उभ्या जगाचा पोशिंदा
त्याच्या भाळी लिहिलेला
रातदिस कामधंदा
कष्ट सारे त्याच्या हाती
दुसऱ्याच्या हाती माप
असे बोल बोलत मी शांत झालो न काय………. मला तो आठवला…….आपला बाप……… निश्चितच शेतकरी बाप आपला……..
एकदा काय झाले आमच्या शाळेची सहल गेली एका अशा ठिकाणी जिथं आम्हाला भरभरून कलिंगड आणि वेगवेगळ्या प्रकारची फळे खायला भेटली……..सांगू कुठ गेली होती? आमच्या गावच्या बाजूच्या शेतात…….
आम्ही तिथं खूप मज्जा केली….. खाल्लो, खूप मज्जा पण केली…….
खेळत खेळत माझे लक्ष एका झाडाखाली बसलेल्या माणसावर गेले…….त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होत आणि क्षणात दुःख दाटून आल्यागत वाटत होते….मी त्यांच्याकडे गेलो आणि विचारले काका काय झाले? ते म्हणाले “काही नाही बाळा, तुला फळे आवडले ना…? “मी होकार दिला.
ते खूप खुश दिसले. पण मला त्यांच्या दुःख्खाचे कारण पाहिजे होत. मी त्यांना इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत बोलत विचारले की, काका ही फळे तुम्ही असे का वाटताय………त्यावर ते म्हणाले, “नाही बाळा याला वाटणे नाही म्हणत त्याला समाजसेवा म्हणतात.”
पण मला हे कळलं नाही की समाजसेवा पण अशी कशी?? मला थोड विचित्र वाटलं……मी त्यांना विचारले की, तुम्ही या फळांना बाजारात का विकत नाहीत….तुम्हाला खूप पैसे भेटतील……..न काय काकांचा हंबरडा फुटला…… अन् ते जोरजोराने रडू लागले……
अन् काय……………….तो शेतकरी आपली आत्मकथा सांगू लागला……
दिवसेंदिवस मी कष्ट करून साऱ्या जगासाठी अन्न उगवितो. काबाडकष्ट करतो. आन माझ्या पदरी काय उरतं फक्त दुःख, निराशा, नैराश्य……….
एकेकाळी माझ्यासारखे पोशिंदे किती खुश होते. पण सद्यस्थिती पाहता आमचे कष्ट जसा लोकांचा व्यापरच बनला आहे. मी राबराब राबतो तरी मला माझ्या कष्टाचे फळ नाही मिळत.
आपल्या देशाचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. शेतीसोबत अनेक जोडधंदे केले जातात, पण याचा सरळ सरळ फायदा मला नाही भेटत. लोकांनी एक असा व्यवसायच बनविला आहे की, कष्ट माझे न नाव त्यांचे……..
सरकार प्रत्येक वेळी माझ्या हितासाठी हे करेन ते करेन म्हणतो पण काहीच होत नाही. आमच्या कष्टाचे फळ आम्हाला भेटत नाही. बी बियाणे, रासायनिक खत हे सगळं घेण्यासाठी जितका खर्च येतो तितके आमच्या उत्पन्नाचं भावही येत नाही.
मी जितक्या आशेने कष्ट करतो तितका तर मला फळ पण भेटत नाही. म्हणून तर माझ्यासारखे शेतकरी बंधू आत्महत्या करण्यास असहाय आहे. शेतीत नक्कीच भवितव्य आणि संधी उपलब्ध असली पाहिजे. मात्र आजची सामाजिक स्थिती पाहता शेतकरी म्हणजे कोणी दुबळा नागरिक, दुय्यम घटक मानला जातो.
मी माझ्या जमिनीवर खूप प्रेम करतो. माझे शेत हे पाण्यावर अवलंबून आहे, पावसाळ्यात मी माझ्या जमिनीची मशागत करतो आणि मग पेरणी साठी पावसाची वाट पाहतो………….आणि मग माझे कष्ट आणि माझ्या मायेची मदत घेऊन मी माझ्या शेतात अन्न पिकवतो.
तुम्हाला दिसते तसे सोपे नाहीये. शेतीसाठी त्याची मशागत करावी लागते, खुरपण करावे लागते, पेरणी, कापणी इत्यादी……..यासाठी मी नाही नाही ते जतन करतो.
आम्ही फक्त कष्ट जाणतो… राजकारण तुमच्या रक्तात
तुम्ही लाखमोलाचे….आम्ही मिळतो स्वस्तात….
आणि त्यातच शेती करताना खूप संकटे येतात जसे बेमोसमी पाऊस, गारा, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ यातून वाचत वाचत मी शेती करतो. इतकेच नव्हे तर बाजारपेठेतील पिकांची घसरण, बँकेतील कर्ज, निर्यातीत होणारे शासकीय बदल इत्यादी सर्व मला झेलावे लागते.
हजारो रुपये खर्च करून मी शेती करतो आणि त्याचे फळ मला भेटेलच असे नाही. मी आधी पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो पण आता थोड थोड आधुनिक शेती करायला शिकलो.
आमची शेती आमची माती,
पिकवू येथे माणिक मोती
असे ब्रीदवाक्य ध्यानीमनी रुजवून मी शेती करतो पण……..मला आपल्या समाजाची गरज आहे त्यांच्या मदतीची गरज आहे…पण हा समाज कसा स्वार्थी झाला आहे, तो माझ्याबद्दल विचारच करत नाही. सगळे एकमेकांबद्दल विचार केले तर कुणालाही काही त्रास होणार नाही………..
असे म्हणत त्या महान पोशिंद्याने आम्हा सगळ्यांना भावूक केले…..आणि तेव्हा कुठे समजले की तो फक्त शेतकरी नाही तर तो उभ्या जगाचा पोशिंदा आहे……..
तर मित्रांनो Shetkaryachi Atmakatha Essay (Nibandh) In Marathi हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर अवश्य शेयर करा.
Thank u for this excellent essay…
most welcome…if you want an essay on other topics just let me know. I will post that also. thanks