Home » Business & Finance » Business » Top 54 Best Small Business Ideas in Marathi [2023] | कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही Business Ideas

Top 54 Best Small Business Ideas in Marathi [2023] | कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही Business Ideas

आजच्या या लेखात आपण कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही Small Business Ideas In Marathi या बद्दल जाणून घेणार आहोत. आपल्याला व्यवसाय करायचा असेल पण कुठला व्यवसाय करायचा काढत नसेल तर हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

पैशाची आवश्यकता आपल्याला प्रत्येकाला आपल्या जीवणात आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पडत असते. त्यामुळे आपण प्रत्येक जण एका विशिष्ट वयोमर्यादेनंतर पैसा कमवायला लागत असतो. पण आपल्या प्रत्येक जणाची आर्थिक परिस्थिती ही स्वताचा उद्योग व्यवसाय (Business) सुरू करण्याइतपत नसते. कारण कोणताही उद्योग तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला काही भांडवलाची आवश्यकता असते. त्यामुळे खुप जणांची ईच्छा असुनही ते आपला स्वताचा उद्योग-व्यवसाय सुरू करू शकत नसतात. कारण स्वताचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नसतो.

म्हणुन आज आपण अशा काही उद्योग व्यवसायांविषयी जाणुन घेणार आहोत ज्याची सुरूवात आपण कोणताही खर्च न करता तसेच अत्यंत कमी भांडवलामध्ये देखील करू शकत असतो. चला तर मग जाणुन घेऊयात कोणताही खर्च न करता तसेच अत्यंत कमी भांडवलामध्ये देखील करू शकत असतो असे कोणकोणते व्यवसाय (Business) आहेत?

Contents hide
1. कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही Small Business Ideas In Marathi

कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही Small Business Ideas In Marathi

जेव्हाही आपण कधीही आपला स्वताचा उद्योग,व्यवसाय सुरू करत असतो तेव्हा आपल्याला सगळयात जास्त आवश्यकता असते एका योग्य योजनेची. त्याचबरोबर आपल्याला आवश्यकता असते आपला उद्योग तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेशा भांडवलाची. हे सर्व सांगण्या मागचा आपला हेतु असा मुळीच नाहीये की आपण पैसे नसल्यामुळे किंवा कमी पैसे असल्यामुळे आपला स्वताचा एक उद्योग, व्यवसाय अजिबात सुरू करू शकत नाही. म्हणुन आज आपण काही अशा उद्योग-व्यवसायांविषयी जाणुन घेणार आहोत जे आपण अत्यंत कमी खर्चामध्ये देखील सुरू करू शकतो. 

1. प्रक्षिक्षण संस्था (Online Coaching):

आज सर्व नोकरीपासुन ते उद्योग व्यवसायापर्यतची सर्व क्षेत्रे आँनलाईन झालेली आहेत. त्यातच शिक्षण देखील आता आँनलाईन उपलब्ध झालेले आहे. आपण कुठेही न जाता एका जागी बसुन परदेशातील शिक्षण संस्थेतुन देखील आज शिक्षण घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण स्वताचे coaching institute सुरू करून इतरांना online coaching देखील करू शकतो. आणि ह्यात आपल्याला ना कोणत्या जागेची आवश्यकता असते ना कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीची.फक्त ह्यात आपण ज्या subject तसेच skill मध्ये expert आहे तो विषय तसेच ती कला आपल्याला इतरांना देखील शिकवावी लागत असते.

2. रिक्रूटमेंट फर्म (Recruitment Firm):

Recruitment firm ही एक अशी कंपनी असते जी युवा तरूण- तरूणींना त्यांनी शिक्षण घेतलेल्या क्षेत्रात नोकरी करण्याची संधी मिळवुन देत असते.पण अशा पदधतीचा उद्योग तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्या कंपनीचे network हे फार strong असणे गरजेचे असते.हा एक खुप चांगला व्यवसाय आहे जो आपण अत्यंत कमी पैशात देखील सुरू करू शकतो.

3. आँनलाईन मार्केटिंग, सेलिंग (Online Marketing, Selling) : 

आँनलाईन मार्केटिंग सेलिंग म्हणजे कोणताही पुरूष किंवा स्त्री पुरूषांच्या तसेच महिलांच्या दैनंदिन जीवणात वापरात येत असलेल्या गरजेच्या तसेच उपयोगाच्या वस्तु जसे की कपडे, घरगुती किराणा, वेगवेगळे product तसेच service यांची आँनलाईन मार्केटिंग करून सेलिंग करू शकतो.

याचा फायदा आपल्याला असा होत असतो की कोणतीही सेल करावयाची वस्तु तसेच product,service आपल्याला आपल्या स्वताजवळ बाळगण्याची आवश्यकता पडत नसते. आपल्या consumer कडुन आँर्डर आली का आपण त्या वस्तुची producer कडे आँर्डर देऊन त्या consumer च्या घरी ती वस्तु डायरेक्ट पाठवू शकतो. त्यात आपले profit margin add वगैरे करून.

4. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी (Real Estate Consulting)

आपण सर्व जण जेवढा पैसा कमवित असतो. त्यापैकी 10 ते 20 टक्के आपण कुठेतरी invest करत असतो. आणि real estate हा आपल्या पैशांची गुंतवणुक करण्याचा एक अतिशय उत्तम मार्ग म्हणुन ओळखला जातो. ज्यात एखादी व्यक्ती एखाद्या real estate firm द्वारे आपली Property म्हणजेच बंगला, प्लाँट खरेदी करत असते.

आणि त्यासाठी त्या property खरेदी करत असलेल्या व्यक्तीला property च्या किंमतीनुसार real estate firm ला 1 ते 2 टक्के कमिशन द्यावे लागत असते. real estate हा एक खुप उत्तम व्यवसाय आहे जो करून आपण लाखो तसेच करोडोंची देखील कमाई करू शकतो. आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला भांडवल देखील फार कमी प्रमाणात लागत असते.

5. तुमचा ब्लॉग सुरू करा (Blogging) : 

Blogging हा एक असा व्यवसाय आहे जो आपण कुठेही न जाता फक्त एका जागी बसुन देखील करू शकतो.फक्त हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याकडे स्वताचा एक अँड्राईड मोबाईल किंवा लँपटाँप तसेच कंप्युटर असणे आवश्यक असते आणि त्यात इंटरनेट कनेक्वन असणे देखील गरजेचे असते.

आणि ह्या व्यवसायात कामाच्या वेळेचे कोणतेही बंधन नसते.आपल्याला दिवसभरात जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपण आपल्या ब्लाँगवर आर्टिकल लिहिण्याचे, प्रकाशित करण्याचे काम करू शकतो.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला फक्त डोमेन तसेच होस्टिंगचा खर्च करावा लागत असतो.

फक्त ह्या व्यवसायात आपल्याला लगेच पैसे मिळत नसतात.ह्या व्यवसायातुन पैसे येणे सुरू होण्यासाठी आपल्याला चार ते पाच महिने लागत असतात किंवा चार पाच वर्ष देखील लागु शकत असतात.आपली कमाई ह्यातुन किती लवकर सुरू होईल हे आपल्या काम करण्याच्या पदधतीवर तसेच आपण ह्या व्यवसायाला किती वेळ देतो ह्यावर देखील अवलंबुन असते.

6. ट्रेनिंग संस्था (Training Institute):

Training institute मध्ये आपण कोणत्याही प्रकारचे प्रक्षिक्षण इतरांना देऊ शकतो. आणि ह्यात आपण आपल्या व्यवसायात वाढ होण्यासाठी इतर ट्रेनरला हायर करून वेतन देऊन त्यांच्यामार्फत देखील लोकांना ट्रेनिंग देण्याचे काम करू शकतो.आणि ह्या कामासाठी आपल्याला कोणत्याही गुंतवणुकीची आवश्यकता पडत नसते पण आपली स्वताची एक training institute सुरू करण्यासाठी आपल्याकडे एक जागा असणे देखील गरजेचे असते.

7. इव्हेंट मँनेजमेंट फर्म (Event Management Firm) : 

आजच्या ह्या धावपळीच्या जीवणामध्ये आपल्या प्रत्येकाला आपल्या कामातुन आपल्या घरातील वेगवेगळे कार्यक्रम event आयोजित करण्यासाठी अजिबात सवड मिळत नसते.याचसाठी आपण आपल्या घरातील वाढदिवस अशा छोटया कार्यक्रमापासुन मोठया कार्यक्रमांचे आयोजन करण्यापर्यत सगळे काम कोणा दुसरी व्यक्तीला करण्यासाठी देत असतात.आणि हेच काम करत असतात event management firms ज्यांचे काम हे वेगवेगळया event manage करण्याचे असते.आणि त्याबदले त्या आपल्याकडुन काही चार्ज देखील घेत असतात.आणि हा असा व्यवसाय आहे जो आपण कमी पैशांत देखील करू शकतो.

8. मोबाईल फुड कोर्ट (Mobile Food Court) :

आजच्या ह्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण एवढी प्रगती केली आहे की आज आपण आपल्याला हवी असलेली प्रत्येक वस्तु घरबसल्या तसेच आपण आहे तिथे बसुन मागवू शकतो.ह्याच कारणामुळे आज आपण जेवणासाठी हाँटेल तसेच रेस्टाँरंटमध्ये जाणे टाळत असतो.अशा वेळी फुड कोर्ट हा एक खुप उत्तम पर्याय आहे ज्याचा वापर करून लोकांना घरबसल्या food service देऊन food services चा व्यवसाय सुरू करू शकतो.

9. दागदागिने बनविणे (Jewelry Making) :

आत्ताच्या काळात वाढत्या चोरी,लुट यांचे वाढत चाललेले थैमान बघता बहुतेक स्त्रिया सोन्याचे दागिने परिधान न करता आर्टिफिशल दागिने परिधान करणे अधिक पसंद करतात.ज्याच्यामध्ये त्यांना नवनवीन डिझाईन हव्या असतात.अशा परिस्थीत आपल्याकडे अशा काही व्यवसायाच्या कल्पणा असतील की ज्याच्यात आपण नवीन डिझाईनच्या ज्वेलरी देखील बनवू शकत असु तर आपण jawellery making चा व्यवसाय देखील करू शकतो.ते ही कमी पैशांची गुंतवणुक करून.

10. विवाह जुळवणे (Matrimony):

matrimonial services देण्याचा व्यवसाय देखील आपण करू शकतो.ह्यासाठी आपल्याला सोशल मिडियावर आपल्या सर्विसेस विषयी लोकांना माहीती होण्यासाठी,आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी एक पेज तयार करावे लागेल.ह्यात आपल्याला वधु आणि वर यांचे नाते संबंध जुळवून देण्याचे काम करावे लागत असते.यात आपल्याला गुंतवणुक ही काहीच करावी लागत नसते पण कमाई ह्या व्यवसायात भरपुर असते.

11. वेडिंग प्लँनर (Wedding Planer):

wedding planning म्हणजेच एखाद्या लग्न समारंभातील सर्व कामकाजाचे नियोजन करणे होय.ह्यात आपण लग्न समारंभांमध्ये जे लग्नातील सर्व कामांचे नियोजन करत असतो त्याबदल्यात आपल्याला पैसे देखील मिळत असतात. हा सुदधा एक चांगला व्यवसाय आहे जो आपण करू शकतो.

12. महिलांसाठी जिम (Gym For Women) :

आज आपण पाहावयास गेले तर बहुतेक महिला वर्गामध्ये वजन वाढीचे प्रमाण आणि त्यामुळे उदभवत असलेल्या वेगवेगळया समस्यांचा सामना करण्याचे प्रमाण हे वाढतच चालले आहे.अशा परिस्थितीत आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी,आपले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व महिलांना उपयुक्त ठरत असते जिम.आणि पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी बनवल्या गेलेल्या जिममध्ये खुप कमी मशिनची आवश्यकता भासत असते.त्यामुळे महिलांसाठी जिम सुरू करण्यासाठी आपल्याला खर्च देखील खुप कमी लागत असतो.

13. योगा इन्सट्रक्टर (Yoga Tutor) :

आपल्याला रिकाम्या वेळात जर एखादा व्यवसाय करायचा असेल तर आपण इतरांना योगा शिकवण्याचा व्यवसाय देखील करू शकतो.फक्त यासाठी आपल्याला काही योगाचे महत्वाचे कोर्सेस आहेत जे करणे आवश्यक असते.त्यानंतर आपण आपला स्वताचा yoga instructing चा व्यवसाय सुरू करू शकतो.

14. आँनलाईन किराणा शाँप (Online Grocery Store) :

आजकाल आपण प्रत्येक जण आपल्याला हव्या असलेल्या वस्तुंची, किराणा मालाची खरेदी ही आँनलाईनच करत असतो. त्यामुळे हा सुदधा एक असा व्यवसाय आहे जो आपण आत्ताच्या वर्तमानकाळात सुरू करू शकतो.आणि आजकाल आँनलाईन खरेदीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे ह्या व्यवसायाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

15. विमा एजंसी (Insurance Agency) :

आजकाल आपल्याला प्रत्येकाला आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या हितासाठी उज्वल भवितव्यासाठी आपला तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांचा life insurance,health insurance,medical insurance,term insurance इत्यादी काढायचा असतो.आणि हे इंशुरन्स काढण्याचे काम करत असतो insurance agent.अशा खुप मोठमोठया इंशूरन्स कंपनी असतात जे आपल्या इंशुरंन्सच्या कामामध्ये वाढ होण्यासाठी इंशुरन्स एजंटची नियुक्ती करत असतात.ह्यात आपण आपली स्वताची इंशुरन्स एजंसी देखील सुरू करू शकतो.

16. इण्टेरिअर डिझाईन (Interior Designer) :

हा सुदधा एक असा व्यवसाय आहे ज्याचा कोर्स करून सर्टिफिकिट मिळवुन आपण याचा व्यवसाय सुरू शकतो.

17. मँन पाँवर रिसोर्स (Man Power Resource):

Man power resourcing हा एक असा व्यवसाय आहे ज्यात गरजू व्यक्तींना त्यांच्या पात्रतेनुसार,योग्यतेनुसार नोकरी मिळवुन देण्याचे काम केले जात असते.आजकाल आपल्या प्रत्येकाला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरीची आवश्यकता असते.अशा गरजू व्यक्तींना चांगली नोकरी मिळवुन देऊन आपण त्यांच्याकडुन त्याबदल्यात एक चांगले कमिशन प्राप्त करू शकतो.फक्त यासाठी आपल्याला मोठमोठया कंपनींमध्ये ज्या नोकरीसाठी वेगवेगळया जागा निघत असतात त्यांची माहीती असणे तसेच ती ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून आपण योग्य उमेदवारांपर्यत ही नोकरीची संधी पोहचवुन कमाई करू शकतो.

18. सण, उत्सवाला दयायच्या भेटवस्तु (Gift Services):

सण आणि उत्सव असल्यावर आपण कोणताही उपहार न घेता राहु असे कधी होऊच शकत नाही.सण उत्सव म्हटला तर आपण एकमेकांना उपहार देणे ही साहजिकच गोष्ट असते.त्यामुळे हा सुदधा एक व्यवसाय आहे जो आपण festivals मध्ये सुरु करू शकतो.ज्यात आपण कमी पैशात देखील सण उत्सवांमध्ये उपहार खरेदी करून त्यात आपला प्राँफिट मार्जिन अँड करून भरपुर कमाई करू शकतो.

19. आईसक्रीम पार्लर (Ice-Cream Parlor):

आज लहान मुलांपासुन ते मोठया माणसांपर्यत आपल्या प्रत्येकाला आईसक्रीम ही फार आवडत असते.आणि त्रतु कोणताही असो आपण आईसक्रीम खाणे कधीच टाळत नसतो.रोज संध्याकाळी तसेच रात्री जेवण झाल्यानंतर प्रत्येकाला स्वीट म्हणुन आईसक्रीम हवी असते.त्यासाठी आपण आपल्या घरापासुन मैलो दूर आईसक्रीम पार्लर असेल तरी तिथे जायला माघार घेत नसतो.इतकी आवड आपल्या प्रत्येकाला आईसक्रीम खाण्याची असते.आणि अशातच आपण घरीच छोटेसे आईसक्रीम फ्रीज आणुन घरीच एखादे छोटेसे आईसक्रीमचे पार्लर सुरू केले तर आपल्या आजुबाजुच्या परिसरातील सर्व लहान मोठी मंडळी आपल्याकडे आईसक्रीम खाण्यासाठी रोज येत जातील.ज्याच्यामुळे आपली चांगली कमाई होऊ शकते.

20. किराणा दुकान (Grocery Shop) :

किराणा दुकान हे आपण एखाद्या छोटयाशा जागेमध्ये लोकांना दैनंदिन जीवणात लागत असलेला किराणा माल भरूनही आपण सुरू करू शकत असतो.आणि समजा आपण जिथे राहतो तिथे जवळपास एखादे किराणा दुकान उपलब्ध नसेल तर आपण आपल्या घरामध्येच किराणा माल आणुन लोकांना विकु शकतो.याने लोकांना किराणा खरेदी करण्यासाठी मैलो दुर जाण्याची गरज पडणार नाही आणि सोबत आपलाही स्वताचा एक छोटासा व्यवसाय सुरू होऊन जाईल.

21. झेराँक्स मशीन तसेच फोटोकाँपी शाँप (Xerox Shop) :

फोटोकाँपी शाँप ह्या व्यवसायात आपल्याला फक्त एका फोटोकाँपी मशिनची आवश्यकता पडत असते.ज्यात आपल्याला थोडाफार खर्च हा फोटो काँपी मशिन खरेदी करण्यासाठी करावा लागत असतो.आणि आजकाल प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कामासाठी कागदपत्रांच्या झेराँक्स ह्या नेहमी लागतच असतात.त्यातच आपण हा व्यवसाय जर आपण एखाद्या शाळा,महाविद्यालयाच्या आवारात किंवा शासकीय कार्यालयाच्या आवारात सुरू केला तर आपला व्यवसाय हा अजुन जोरात चालण्याची शक्यता असते.कारण शालेय महाविद्यालयीन कामकाजासाठी विदयार्थ्यांना नेहमी कागदपत्रांच्या झेराँक्स लागत असतात.तसेच शासकीय कार्यालयात देखील महत्वाच्या कागदपत्रांच्या झेराँक्स साठी लोक झेराँक्सचे दुकान शोधत असतात.अशा वेळी आपल्यासाठी ही एक चांगली व्यवसायाची संधी बनु शकते.

22. ब्युटी आणि स्पा (Beauty and Spa) :

समजा आपल्याला सौंदर्य आणि सौंदर्य प्रसाधनांविषयी माहीती असेल तर आपण भाडयाने एखादा रूम घेऊ शकतो आणि तिथे आपण आपले स्वताचे एक स्पा तसेच ब्युटी पार्लर देखील सुरू शकतो.हा सुदधा एक चांगला व्यवसाय आहे जो आपण खासकरून महिला करू शकतात.

23. कार ड्रायव्हिंग स्कुल (Car Driving School) :

आज पाहायला गेले तर प्रत्येक व्यक्तीला आपली स्वताची एक कार घ्यायची आहे.त्यासाठी आपण आधीपासुनच ड्रायव्हिंग क्लास लावुन कार ड्रायव्हिंग शिकत असतो.आणि यासाठी आपण एक असा ट्रेनर शोधत असतो जो आपल्याला कार ड्रायव्हिंग शिकवू शकेल.आणि हा एक असा व्यवसाय आहे ज्यात आपल्याला जर उत्तम कार ड्रायव्हिंग येत असेल तर आपण आपले स्वताचे कार ड्रायव्हिंग स्कुल देखील चालवु शकतो.ह्यासाठी आपल्याला फक्त उत्तम कार ड्रायव्हिंग येणे गरजेचे असते आणि आपल्याकडे कार ड्रायव्हिंग शिकवण्यासाठी स्वताची एक कार देखील असावी लागते. 

24. आर्थिक नियोजनाची सेवा (Financial Planning Services) :

आज आपल्याला असे खुप व्यक्ती पाहायला मिळतात ज्यांच्याकडे पैसा तर महामोर असतो पण तो टिकवायचा कसा? त्यात अजुन वाढ कशी करायची? आणि त्यात वाढ होण्यासाठी तो कुठे गुंतवायचा? हेच त्यांना माहीत नसते.आणि असे व्यक्ती महिन्याला कमवून महिन्यातच आपला पैसा चैनचंगळ करण्यात खर्च करत असतात.अशा लोकांना फायनँन्शिअल मार्गदर्शन करण्याचा देखील आपण आपला स्वताचा एक व्यवसाय सुरू करू शकतो.ज्याचा लोकांनाही आपल्या पैशाचे व्यवस्थापण तसेच त्यात वाढ करण्यासाठी त्यांना मदत होईल.आणि त्याचबदल्यात लोक आपल्याला पैसे देखील देत जातील.

25. गेम स्टोअर (Game Center) :

आज प्रत्येक लहान मुलगा हा आपल्या मोबाईलवर तसेच कंप्युटरवर दिवसभर आपल्याला गेम खेळताना दिसत असतो.याचमुळे पालक त्यांच्याकडून मोबाईल देखील हिसकावून घेत असतात.अशावेळी मुले असे एखादे ठिकाण शोधत असता जिथे ते गेम खेळु शकतील तर आपण अशा मुलांसाठी आपल्या घरात गेमिंग स्टोअर चालु करून मुलांना गेम खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ शकतो.याच्याने त्यांचेही मनोरंजन होईल आणि आपलाही व्यवसाय जोरात चालेल.

26. आँनलाईन बुक स्टोअर (Online Book Store) :

भरपुर लोकांना वाचणाची खुपच आवड असते.आणि असे लोक आँनलाईन नेहमी पुस्तके मागवत असतात.जर आपण आँनलाईन लोकांना पुस्तकांची सेवा देणे सुरू केले तर ह्यातुन देखील आपण चांगली कमाई करू शकतो.

27. सेकंड हँण्ड कारची डिलरशीप करणे (Second Hand Car Dealership):

आज आपल्या प्रत्येकाला नवीन कार विकत घ्यायची असते.आणि त्याचसाठी आपण आपली जुनी कार विकत असतो जेणेकरून जुनी कार विकुन जे पैसे येतील त्यात अजुन थोडे पैसे टाकुन आपण नवीन कार घेऊ शकतो.आणि ह्याच साठी आपण आपल्या जुन्या कारला ग्राहक बघत असतो जो ती खरेदी करेन आणि याचसाठी आपण एखादा व्यक्ती देखील शोधत असतो जो आपल्या कारची डिल करून देत असतो.हा एक असा व्यवसाय आहे ज्यात आपण एखाद्या व्यक्तीच्या जुन्या सेकंड हँन्ड कारची डिल करवुन देत असतो आणि त्याबदल्यात आपल्याला काही कमिशन देखील प्राप्त होत असते.

28. अगरबत्ती आणि मेणबत्ती बनविणे (Incense Sticks and Candles Making) :

जर आपल्यामध्ये अगरबत्ती तसेच मेणबत्ती बनविण्याची कला असेल तर आपण घरबसल्या अगरबत्ती तसेच मेणबत्ती बनविण्याचा व्यवसाय करून देखील भरपुर पैसे कमावू शकतो.

29. अँफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing):

अँफिलिएट मार्केटिंग मध्ये आपण एखाद्या कंपनीच्या अँफिलिएट प्रोग्रँमला जाँईन करत असतो आणि त्याचे प्रोडक्ट सर्विस आँनलाईन वेबसाईटदवारे तसेच सोशल मिडियाद्वारे सेल करत असतो.आणि त्याबदल्यात आपल्याला त्या कंपनीकडुन काही कमीशन देखील मिळत असते.

30. घराला रंग देणे (House Painting Services) :

होम पेंटिंग सुदधा एक चांगला व्यवसाय आहे जो आपण करू शकतो यात आपण लोकांच्या घराला रंग देण्याचे काम करत असतो.फक्त यासाठी आपल्याला पेटिंगचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

31. अपसायकल फर्निचर (Up cycle Furniture) :

अपसायकल फर्निचर म्हणजे जुन्या फर्निचरला नवीन फर्निचरमध्ये रूपांतरीत करून एकदम वेगळे आणि एकमेव रूप देणे ही सुदधा एक चांगली कला आहे जिचा वापर करून आपण भरपुर पैसे कमावू शकतो.यात आपल्याला गुंतवणुक काहीच नसते.फक्त आहे त्याच वस्तुला नवीन रूप द्यायचे असते.

32. पेपर बँग बनविणे (Paper Bag Making) :

आज पाँलिथिनचा वापर करणे आपल्या पर्यावरणाला घातक ठरत असल्यामुळे आज प्रत्येक जण पेपर बँगचा वापर करणे अधिक पसंद करतो आहे.अशा परिस्थितीत ही एक खुप चांगली व्यवसायाची संधी आपल्यासाठी ठरू शकते.यासाठी फक्त आपल्याला काही यंत्रे विकत घ्यावी लागत असतात मग आपण घरबसल्या पेपर बँग बनविण्याचा व्यवसाय करू शकतो.

33. पापड लोणचे बनविणे (Pickle Making) :

खुप स्त्रिया असतात ज्या आपल्या घरात पापड तसेच लोणचे बनवत असतात आणि लोकांकडुन आँडर्र घेऊन त्यांना पाहिजे तेवढा माल घरपोहोच सुदधा पोहचवत असतात.

34. सजावटीच्या वस्तु बनविणे (Decorative Product Making) :

आजकाल आपल्याला प्रत्येकालाच आपल्या घराची साजसजावट ही करायची असते.याचसाठी आपण बाजारातुन वेगवेगळया साजसजावटीच्या वस्तु देखील आणत असतो.हा सुदधा एक चांगला व्यवसाय आहे ज्यात आपल्याला जुन्या तसेच नव्या वस्तुंचा वापर करून साजसजावटीच्या वस्तु तयार करायच्या असतात.

35. द्रोण पात्र बनविणे :

फार पुर्वीपासुन द्रोण पात्रामध्ये आपण जेवण करत आलो आहे.आणि आजही कोणत्याही कार्यक्रमात जेवणासाठी द्रोण पात्रेच वापरले जात असतात.म्हणुन हा सुदधा एक चांगला पर्याय आहे भरपुर पैसे कमविण्याचा.

36. टिफिन सर्विस देणे (Tiffin Service) :

टिफीन सर्विस देणे हा सुदधा एक चांगला व्यवसायाचा मार्ग आहे.ज्यात आपण अशा लोकांना टिफिन सर्विस देऊ शकतो जे बाहेरगावी नोकरीसाठी,कामासाठी,शिक्षणासाठी आले आहे आणि त्यांना स्वयंपाक बनवता येत नाही किंवा बनवायला त्यांच्याकडे वेळ नसतो.ह्या व्यवसायात आपल्याला काहीच गुंतवणुक करावी लागत नसते.

37. मत्स्य पालन,मत्स्यविक्री :

मत्स्यपालन हा एक असा व्यवसाय ज्यात आपल्याला समुद्रातील मासे पकडुन ते विकायचे काम करावे लागत असते.हा सुदधा एक चांगला व्यवसाय आहे ज्यात गुंतवणुक ही काहीच नसते.

38. टेलरींग शाँप :

असे म्हटले जाते की ज्याच्या अंगी काहीतरी कला,कौशल्य असते.तो कधीच बेरोजगार तसेच उपाशी राहत नाही.टेलरिंग ह्या कामात आपण कपडे शिवायचे काम करत असतो.ह्यासाठी आपल्याला फक्त टेलरिंग मशिनचा खर्च करावा लागतो.

39. जोडलेल्या बँग बनविणे :

जोडलेल्या गुंफलेल्या बँग बनविणे तसेच विकणे हा सुदधा एक चांगला व्यवसाय आहे. ज्यात आपल्याला फक्त गुंफलेल्या बँग तयार करायच्या असतात आणि बाजारात त्यांची विक्री करायची असते.

40. मग प्रिंटींग करणे :

मग प्रिंटिंग हा एक असा व्यवसाय आहे ज्यात आपल्याला विविध प्रकारच्या मगची प्रिंटींग करायची असते.आणि हा व्यवसाय आपण घरबसल्या देखील करू शकतो.आणि ह्यात लागत असलेली गुंतवणुक पण जास्त नसते.

41. नर्सरी :

जर आपल्याला बाग बगीचे तयार करणे त्यांची निगा राखणे ह्या गोष्टींची मनापासुन आवड असेल तर आपण घरीच वेगवेगळे बीयाणे लावुन त्याचे रोपटे उगवून बाजारामध्ये ती रोपटे विकण्याचा व्यवसाय करू शकतो.

42. पँकेजिंग करणे :

आपण जे पण काही बाजारातुन भेटवस्तु खरेदी करत असतो.त्यांची एक आकर्षक अशी पँकेजिंग केलेली असते.ज्यामुळे लोक ती भेटवस्तु खरेदी करण्यासाठी आकर्षित होत असतात.हा सुदधा एक चांगला व्यवसाय आहे जो आपण करू शकतो.

43. तोंडाला लावण्याचे मास्क तयार करणे :

आज प्रत्येक जण आपल्या नाका-तोंडात धुळ जाऊ नये म्हणुन तसेच कोरोनाचा संसर्ग आपल्याला होऊ नये म्हणुन देखील तोंडाला मास्क लावत आहे.त्यामुळे हा सुदधा एक चांगला व्यवसाय आहे जो आपण करू शकतो.

44. PPE Kit तयार करणे :

आपल्याला कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणुन आज प्रत्येक जण बाहेर अशा ठिकाणी जाताना जिथे त्याला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो पीपीटी किटचा वापर करतो आहे.आणि वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे याची मागणी देखील दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे पीपीटी किट तयार करणे हा सुदधा एक चांगला व्यवसायाचा मार्ग आहे. 

45. ट्रँव्हल एजंट :

बाहेरगावी फिरण्याचा तसेच भटकंती करण्याची आपल्या सगळयांनाच खुप आवड असते.पण कुठे फिरायला जायचे आणि कसे जायचे हेच आपल्यापैकी बहतेक जणांना माहीत नसते.अशावेळी ट्रँव्हल एजंट हा आपली ट्रँव्हलिंग प्लँन तयार करण्यास मदत करत असतो.हा सुदधा एक चांगला व्यवसायाचा मार्ग आहे.

46. डेटा इंट्री :

डेटा इंट्री हा एक असा व्यवसाय आहे जो आपण मोबाईल तसेच लँपटाँपद्वारे देखील करू शकतो.अशा खुप कंपन्या असतात ज्यांना डेटा इंट्रीच्या कामासाठी मुला मुलींची तसेच घरगृहिणींची आवश्यकता असते.

47. चाँकलेट बनविणे :

आज लहानांपासुन मोठया प्रौढ व्यक्तींपर्यत सगळयांनाच चाँकलेट खायला आवडत असते.आणि आपल्या अंगी जर अशी काही कला असेल ज्यात आपण वेगवेगळया पदधतीचे चाँकलेट तयार करून लोकांना खायला देऊ शकतो.तर हा सुदधा आपल्यासाठी एक चांगला मार्ग ठरू शकतो व्यवसायाचा.

48. कुकिंग क्लास :

चांगले चांगले उत्तम पदार्थ खाण्याची आवड तर आपल्याला सगळयांनाच असते पण आपल्यात खुप मोजकेच जण असतात ज्यांना असे उत्तम पदार्थ तयार करण्याची आवड असते.आणि असे लोक इतरांना नवनवीन उत्तम पदार्थ बनवायला शिकवून म्हणजेच कुकिंग क्लासेस घेऊन देखील चांगली कमाई करू शकतात.

49. युटयुब चँनल :

आपल्या अंगी एखादी कला असेल जी आपण इतरांना शिकवू शकतो,तसेच आपल्याला एखाद्या क्षेत्राचे,विषयाचे चांगले उत्तम ज्ञान असेल जे आपण इतरांना देखील देऊन त्यांची मदत करू शकतो.तर आपण आपले स्वताचे युटयुब चँनल देखील सुरू करू शकतो.हा देखील एक चांगला व्यवसायाचा मार्ग आहे.आणि ह्यात आपल्याला कोणतीही पैशांची गुंतवणुक करावी लागत नसते.फक्त रोज व्हिडिओ तयार करणे तो व्यवस्थित एडिट करणे आणि मग तो अपलोड करणे हे काम आपल्याला यात करायचे असते.आणि मग जसे आपल्या व्हिडिओवर जाहीराती येणे सुरू होते तशी आपली कमाई होत असते.

50. कोल्ड स्टोरेज :

कोल्ड स्टोरेजची आवश्यकता ही आपल्याला नेहमी पडत असते.आपल्या घरातील खाद्यपदार्थ तसेच फळे भाज्या खराब होऊ नये यासाठी. आणि खुप जणांच्या घरात ही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या घरातील खाद्यपदार्थ लवकर खराब होत असतात. अशा वेळी आपण अशा व्यक्तींना आपले कोल्ड स्टोरेज भाडयाने देऊन चांगली कमाई करू शकतो.

51. फ्रेंचाइजी :

आज बाजारात अशा खुप कंपन्या आहेत ज्या फ्रेंचायजी पार्टनरशिप देत असतात ज्यात कंपनी व्यवसायिकांना व्यवसायासाठी आपल्या कंपनीचे नाव देत असते आणि त्यांना सेलिंग करण्यास सांगत असते.

52. डे केअर सेवा (Day Care Services):

जे पालक working असतात तर त्यांना आपल्या मुलांना दिवसभर सांभाळायचा प्रश्न पढतो त्या साठी Day Care Services चा उपयोग होत असतो. यामध्ये, तुम्हाला अशा कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल जे मुलांमध्ये सहज मिसळतील आणि तुम्हाला आनंदी आणि सुरक्षित असे वातावरण निर्माण करावे लागेल जेणेकरून पालक कोणत्याही चिंता न करता दिवसभर आपल्या मुलांना तिथे सोडू शकतील.

53. नृत्य केंद्र (Dance Centre)

जर तुम्ही चांगले Dancer किंवा नृत्यदिग्दर्शक असाल तर तुम्ही भाड्याने जागा घेऊन सहज नृत्य केंद्र सुरू करू शकता.

54. हस्तकला विक्रेता (Handcraft Seller)

भारत सरकारने अनेक राज्यांमध्ये हस्तकला उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन देणे सुरू केले आहे. लोकांना अशा हस्तकलेची उत्पादने आवडत आहेत जसे विविध धातूची भांडी, चित्रे, शाल, कार्पेट, लाकडी भांडी, मातीची भांडी, भरतकाम केलेल्या वस्तू आणि कांस्य आणि संगमरवरी शिल्पे इ. यापैकी काही उत्पादनांसह आपण Handcraft small business देखील सुरू करू शकता.

आशा आहे की आम्ही दिलेल्या कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही Business Ideas विषयी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही Business Ideas या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *