Motivational Marathi Story: एकच वाट
एका जंगलात एक हरिणी राहत होती तिला सोनू आणि मोनु नावाची अशी दोन पारसे होती सोनू एकाग्र होता. तो एखादी गोष्ट केल्यानंतर दुसरी गोष्ट करायचा तर मोणू खूप अवघड होता .
तो एकही काम पूर्ण करायचा नाही गावतही तो पूर्ण खायचा नाही. खूप वेळा समजावून सुदधा मोनू सुधारला नाही व मोनू शिकवण मिळाली म्हणून हरणीने एक युक्ती केली तिने पोटदुखीचे सोंग केले आणि सोनू मोनू ला म्हणाली बाळांनो माझे पोट खूप दुखते आहे त्या डोंगराच्या पलीकडे एक झुडूप आहे त्याची पाने मला आणून दिली तर ती खावून मी बरी होईल.
तेव्हा दोघेही जा आणि ती पान घेवून या ती पान घेवून या जो पान लवकर आणेल त्याचेच माझ्यावर जास्त प्रेम आहे. असे मी समजेल सोनू आणि मोनू लगेच निघाले काही वेळ चालल्यावर मोनू ला एक आडवाट दिसली त्याने विचार केला आपण या आड वाटेने गेलो तर लवकर पोहोचु म्हणुन तो त्या आडवाटेने जावू लागला पण चालल्यानंतर त्याच्या समोर एक डोंगर आला त्याने विचार केला अरे बाप रे ऐवढा मोठ्ठा डोंगर चढल्यापेक्षा आपण तिसऱ्या वाटेने जावू म्हणुन त्याने तिसरी वाट निवडली तिकडेही त्याला एक मोठ्ठी नदी आडवी आली तो तिथूनही मागे फिरला
तसा तो दिवसभर फिरत राहिला पण त्याला योग्य वाट मिळालीच नाही शेवटी संध्याकाळ झाली आणि मोनू निराश होऊन घरी परतला घरी सोनुने झुडुपाची पाने आणली होती ते पाहून मोनू रडू लागला तेव्हा हरिणी म्हनाली बाळा सोनू लाही वाटेत नदी लागली पण त्याने विचार बदलला नाही तो चालतच राहिला आणि त्याला पान मिळाली जर तुम्ही एकाच वाटेने पुढे गेला असता तर तुलाही पान मिळाली असती अणि मग शेवटी मोनू ला त्याची चूक कळाली.
Moral:
मित्रांनो एकच मार्गाने सतत प्रयत्न केले तर आपल्याला धैर्य नक्कीच गाठता येते.