Home » Jobs & Education » Essay Writing » स्वच्छ भारत अभियान वर मराठी निबंध Swachh Bharat Abhiyan Essay In Marathi

स्वच्छ भारत अभियान वर मराठी निबंध Swachh Bharat Abhiyan Essay In Marathi

Swachh Bharat Abhiyan Essay In Marathi म्हणजे स्वच्छ भारत अभियान वर मराठी निबंध येथे मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.

स्वच्छ भारत अभियान वर मराठी निबंध Swachh Bharat Abhiyan Essay In Marathi

देशातील स्वच्छता ही एकमेव स्वच्छता
कामगाराची जबाबदारी नाही…..
यात नागरिकांची काही भूमिका नाही का?
आपली ही मानसिकता बदलली पाहिजे
…… नरेंद्र मोदी

असे घोषवाक्य घेत हा अभियान भारत सरकारने सुरू केला.हे खूप महत्त्वाचे अभियान आहे ज्यात आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली लपलेली आहे. स्वच्छता ही केवळ गल्ली रस्त्यापर्यंत नसून ती आपल्या घरापर्यंत आणणे ही फक्त आणि फक्त आपली सर्वांची जबाबदारी आहे.

जे बदल तुम्ही जगात बघू इच्छितो,
ते सगळ्यात आधी तुम्हा स्वतः मध्ये घडवा……

अशा प्रकारचे बोल आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी चालवले. त्यांच्या मते स्वच्छता जागृतीची मशाल सर्वांमध्येच जन्माला यायला हवी, त्याअंतर्गत शाळांमध्येही स्वच्छ भारत अभियानाचे काम सुरू झाले आहे.स्वच्छ भारत अभियानाची मशाल आज आपल्या संपूर्ण भारतासाठी आवश्यक आहे, ज्या अंतर्गत अनेक कामे केली जात आहेत.

शंभर वर्षांपूर्वी, महात्मा गांधींनी स्वच्छ भारताचे स्वप्न पाहिले होते, जे आज प्रत्यक्षात येत आहे….

“स्वच्छ भारत अभियान” हे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केले, ज्यांचे मुख्य उद्दीष्ट भारत स्वच्छ व निरोगी बनविणे आहे. ही मोहीम आमच्या पंतप्रधानांनी २ ऑक्टोबर २०१९ रोजी महात्मा गांधी यांच्या जन्मदिवशी सुरू केली होती आणि त्याच वेळी गांधीजींच्या १५० व्या जन्मदिवशी २ ऑक्टोबर २०१९ रोजी ती पूर्ण होण्याची तारीख निश्चित केली गेली होती.

या मोहिमेचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जाणीव करुन दिली की लोकांनी आपले घर तसेच परिसर स्वच्छ केले पाहिजे, जर आपला परिसर स्वच्छ नसेल तर घर स्वच्छ करण्याचा काही उपयोग होणार नाही.

स्वच्छता हे आपले नैतिक मूल्य आहे, परंतु आपण आपले हे नैतिक मूल्य विसरत आहोत, म्हणूनच आपल्याला या स्वच्छ भारत अभियानाची आवश्यकता आहे.

अशा प्रकारे या अभियानांतर्गत प्रभातफेरी काढण्यात येऊ लागली.लोकांना जागरूक करण्यासाठी घोषवाक्य बोलण्यात येऊ लागले. घोषवाक्य पण असे की लोकांमधे जागरूकता निर्माण व्हावी जसे,

चला सर्वजण एकत्र येऊया, हा सगळा परिसर स्वच्छ करूया.

हातात झाडूचे शस्त्र धरा, आपला परिसर आपले गाव स्वच्छ करा.

स्वच्छ भारत, सुजलाम सुफलाम भारत.

चला धरूया स्वच्छतेची वाट, सर्वजण मिळून लावूया कचऱ्याची विल्हेवाट.

स्वच्छतेच्या नियमांचे करूया पालन, चला स्वच्छ करूया घर-अंगण.

चला हातात हात मिळवूया, दुर्गंधीला भारत देशातून बाहेर पळवूया.

चला देशात आणूया स्वच्छतेची क्रांती, तेव्हाच मिळेल सुख-समृद्धी आणि मनशांती.

स्वच्छ भारत या योजनेला योगदान द्या, कचरा नेहमी कचरा गाडीतच टाका.

जेव्हा नांदेल स्वच्छता, तेव्हाच मिळेल मुक्तता.

गांधीजींनी दिला संदेश, स्वच्छ ठेवा भारत देश.

स्वच्छतेविषयीची प्रत्येक कृती, देईल आरोग्यला गती.

स्वच्छतेचे मंत्र ध्यानी धरा, आरोग्य आपले निरोगी करा.

लोकांच्या प्रतिसादामुळे स्वच्छ भारत अभियानला जनचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. लोकांनी उत्स्फूर्त सक्रीय सहभाग नोंदवत स्वच्छ व निटनेटक्या भारताची शपथ घेतली.

रस्ते साफ करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, शौचालयांची स्वच्छता व निरोगी वातावरण यासाठी हाती झाडू घेणे हा स्वच्छ भारत अभियानाचा भागच बनला आहे. लोकांनी ही चळवळ पुढे नेत “ईश्वराचे दुसरे रुप म्हणजे स्वच्छता” हया संदेशाच्या प्रसारात मदत केली आहे.

परिसर स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. परिसर स्वच्छ ठेवणे ही गोष्ट वैयक्तिक व सामूहिक दृष्टीने खूप महत्त्वाची आहे/ या परिसराचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. म्हणून परिसर स्वच्छतेमध्ये लोकांना योग्य व पुरेसा आहार, शुद्ध पाणी आपल्या मुलांना योग्य वेळी लस टोचून घेतली असती तर फारसे आजार उद्भवलेच नसते. वैयक्तिक स्वच्छते इतकेच परिसर स्वच्छतेला महत्त्व आहे.

आपले घर व त्याचा परिसर स्वच्छ ठेवले तरच आपल्या गावाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ६०% आजार किंवा रोग सुरक्षित/ शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या व योग्य परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे होतात. विशेषतः कुपोषित बालकांवर अशुद्ध पाणी, प्रदूषित परिसरच प्रतिकूल परिणाम करतो.

निष्कर्ष:

स्वच्छ भारत अभियान ये पूर्णपणे साकार करण्यासाठी आधी सर्व नागरिकांचे स्वच्छते बद्दल मन परिवर्तन झाले पाहिजे. जेणे करून सर्व नागरिक एकत्र काम करून भारताला स्वच्छ ठेवतील.


तर मित्रांनो Swachh Bharat Abhiyan Essay In Marathi हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर अवश्य शेयर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *