नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आपण आपल्या अवतीभोवती प्रशासनात नेहमीच अधिकार वर्ग पाहत असतो. हे अधिकारी कोणती परिक्षा देतात. त्याचे स्वरूप आणि पद्धत कशी असेल याबद्दल बऱ्याच आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना माहिती ही असेल. पण चला तर मग पुन्हा एकदा आपण प्रशासनातील युपीएससी (UPSC) या उच्च परिक्षेबद्दल जाणुन घेऊया..!!
UPSC information in marathi | युपीएससी (UPSC) माहीती
मित्रांनो युपीएससी या परीक्षेची माहिती बघत असताना. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण खूपदा म्हणतो की, मला युपीएससी ची परिक्षा द्यायची. मग युपीएससी म्हणजे काय तर सरळ साधे म्हणजे “सिविल सर्विस एक्झामिनेशन” “युनियन पब्लिक सर्विस कमिशन” ज्याला आपण मराठीत “केंद्रिय लोकसेवा आयोग” असे म्हणतो.
युपीएससी म्हणजेच केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत तीन ऑल इंडिया सर्विससाठी सिलेक्शन केले जाते. एक आहे आयएएस म्हणजे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस म्हणजेच कलेक्टर दुसरा आहे आयपीएस म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिस म्हणजे तुमचा जिल्ह्याचा एस पी यासोबत तिसरी परीक्षा आहे तिचं नाव आहे आय एफ ओ एस म्हणजे काय इंडियन फॉरेस्ट सर्विस म्हणजेच मराठीत भारतीय वनसेवा.
या तीन आँल इंडिया सर्व्हिसेस आहेत. IAS ,IPS आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस यांची पुर्व परिक्षा एक असते मात्र IAS आणि IPS यांची मुख्य परिक्षा वेगळी असते व इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस साठी मुख्य परिक्षा वेगळी असते.
युपीएससी हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कठीण उच्च स्तर असणारा अभ्यासक्रम आहे. ह्या अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करून तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि अभ्यासातील सातत्य व प्रयत्नांनी हे यश मिळू शकते.
युपीएससी म्हणजे काय?
युपीएससी ही भारतीय प्रशासनातील सर्वात मोठी उच्च स्पर्धा परीक्षा आहे. ही परिक्षा भारतात अनेक विद्यार्थी देत असतात. UPSC या शब्दांचा लाॅग फॉर्म म्हणजेच “Union Public Service commission” ज्याला आपण सर्व मराठीत “केंद्रीय लोकसेवा आयोग” असे म्हणत असतो.
सुरूवातीला लोकसेवा आयोग ची स्थापना १ ऑक्टोबर १९२९ रोजी केली गेली होती. पुढे भारत सरकारच्या कायदा १९३५ नुसार त्याचे नामकरण फेड्रल संघराज्य लोकसेवा आयोग असे करण्यात आले होते.
त्यानंतर भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्याचे नामकरण “संघ लोकसेवा आयोग” किंवा ज्याला आपण “केंद्रीय लोकसेवा आयोग” असे म्हणतो असे करण्यात आले. केंद्रिय लोकसेवा आयोगाचे मुख्यालय हे ‘दिल्ली’ येथे आहे. युपीएससी ही परीक्षा गट अ व गट ब या पदांसाठी घेतली जाते. युपीएससी ही परिक्षा साधारणपणे IAS, IPS, IFS, IRS या पदांसाठी होत असते.
युपीएससी परीक्षेचे स्वरूप काय आहे?
युपीएससी ही राष्ट्रीय पातळीवर घेतली जात असल्याने भारतातील कोणत्याही भागातील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत ही परीक्षा तीन टप्प्यांत घेण्यात येते या परीक्षेचे माध्यम हे इंग्रजी आणि हिंदी या भाषेत असते. यात एक पुर्व परिक्षा, दोन मुख्य परिक्षा आणि तीन मुलाखत या तीन टप्प्याद्वारे युपीएससी ची परिक्षा घेण्यात येते.
1. पुर्व परिक्षा
युपीएससी च्या परिक्षा मध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात. यातील प्रश्नांना पर्याय दिले जाते.यातून योग्य पर्यायाची निवड करायची असते. पुर्व परिक्षेचे दोन पेपर असतात यातील पहिला पेपर हा सामान्य अध्ययनाचा असतो तर दुसरा पेपर हा वैकल्पीक विषयाचा असतो.
2. मुख्य परिक्षा
पुर्व परिक्षेत विद्यार्थी जर मेंरीटनुसार उत्तीर्ण झाले तर त्यांना पुढची मुख्य परिक्षा देण्याची संधी मिळत असते. पुर्व परिक्षेनंतरची मुख्य परिक्षा ही पुर्णपणे वर्णनात्मक प्रकारची असते. या मुख्य परिक्षेत भारतीय भाषा, वैकल्पिक विषय, निबंध, इंग्रजी भाषा, सामान्य अध्ययन अशा विविध विषय असतात.
3. मुलाखत
पुर्व परिक्षा नंतर मुख्य परिक्षा उत्तम मार्कने उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखत असते ही मुलाखत फक्त दिल्ली याच ठिकाणी होत असते. मुख्य परिक्षा झाल्यावर साधारण दोन ते तीन महिन्यांनी मुलाखत असते. यात विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास तो प्रशासनात मोठा अधिकारी होतो.
युपीएससी परीक्षेतून मिळणारे पद
युपीएससी परीक्षेतून मिळणारे पद हे तीन विभागांत विभागले जाते.
1. अखिल भारतीय नागरी सेवा
- प्रशासकीय सेवा.
- पोलिस सेवा.
- भारतीय वन सेवा.
2. गट अ सिव्हिल सर्व्हिसेस
- भारतीय माहिती सेवा.
- भारतीय आयुध कारखाना सेवा.
- इंडियन कम्युनिकेशन.
- फायनान्स सर्व्हिसेस.
- भारतीय टपाल सेवा.
- भारतीय रेल्वे खाती सेवा.
- भारतीय रेल्वे कर्मचारी सेवा.
- भारतीय रेल्वे वाहतूक सेवा.
- भारतीय महसूल सेवा.
- भारतीय व्यापार सेवा.
- रेल्वे संरक्षण दल.
- भारतीय परराष्ट्र सेवा.
- भारतीय नागरी खाती सेवा.
- भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा.
- भारतीय संरक्षण लेखा सेवा.
- भारतीय संरक्षण एस्टेट सर्व्हिस.
3. गट ब सिव्हिल सर्व्हिसेस
- सशस्त्र सेना मुख्यालय नागरी सेवा.
- डॅनिक्स.
- डॅनिप.
- पांडिचेरी नगरी सेवा.
- पांडिचेरी पोलिस सेवा.
युपीएससी अभ्यासक्रम काय असतो? । UPSC yllabus information in Marathi
युपीएससी चा अभ्यास करताना विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता आणि सातत्याची फार आवश्यकता असते. युपीएससी चा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना खोलवर जाऊन अभ्यास करावा लागतो.
अनुक्रमांक | पेपर | विषय | गुण |
1 | पेपर A | Indian language (पात्रतेसाठी) | 300 |
2 | पेपर. B | English (पात्रतेसाठी) | 300 |
3 | पेपर १ | निंबध | 250 |
4 | पेपर २ | General studies 1 | 250 |
5 | पेपर ३ | General studies 2 | 250 |
6 | पेपर ४ | General studies 3 | 250 |
7 | पेपर ५ | General studies 4 | 250 |
8 | पेपर ६ | Optional subject T1 | 250 |
9 | पेपर ७ | Optional subject T2 | 250 |
Total | 1750 |
पेपर क्रमांक २ हा फक्त पात्रतेसाठी असतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांला ३३% गुण मिळवणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांची मुख्य परिक्षेसाठी पात्रता होण्यासाठी पेपर १ मधील गुण विचारात घेतले जाते. तसेच पेपर आणि पेपर ब फक्त पात्रतेसाठी असुन विद्यार्थ्यांनी फक्त पास होणे गरजेचे आहे. हे १७५० व मुलाखतीचे २७५ मार्क मिळवून एकुण २०२५ मार्क ची युपीएससी परीक्षा असते आणि याच्या आधाराने उमेदवाराची निवड करण्यात येत असते.
युपीएससी च्या परीक्षेसाठी ऑप्शन साठी असणारे विषय
- Physics
- Political Science
- Psychology
- Public Administration
- Sociology
- Statistics
- Zoology
- Chemistry
- Civil Engineering
- Commerce & Accountancy
- Economics
- Electrical Engineering
- Geography
- Geology
- Agriculture
- Animal Husbandry and Veterinary Science
- Anthropology
- Arabic
- Botany
- Law
- Management
- Mathematics
- Mechanical Engineering
- Medical Science
- Philosophy
युपीएससी या परीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
- युपीएससी ची परिक्षेसाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
- उमेदवाराने या परिक्षेच्या पात्रतेसाठी शासन मान्य विद्यापीठातुन पदवी मिळवलेली असावी.
युपीएससी परीक्षेसाठी उमेदवाराचे वय मर्यादा
- युपीएससीची परिक्षा सर्व सामान्य उमेदवार सहा वेळा देऊ शकतो. त्याला वयाची अट ३२ वर्षांपर्यंत असते.
- ओबीसी उमेदवारांसाठी वयाची अट ही ३५ वर्षासाठी असुन त्यांना नऊ वेळा देऊ शकता.
- एसी आणि एसी टी उमेदवार ही परीक्षा कितीही वेळा देऊ शकते त्यांना वयाची अट ३७ वर्षांपर्यंत असते.
केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत कोणकोणत्या परीक्षा घेतल्या जातात
युपीएससी म्हणजेच केंद्रिय लोकसेवा आयोग किंवा संघलोकसेवा आयोग त्यांच्या माध्यमातून खालील पदांसाठी परीक्षा घेण्यात येते.
- सिविल सेवा परिक्षा (CSE)
- भारतीय संरक्षण अकादमी परीक्षा (NDA)
- भारतीय वन सेवा परीक्षा (IFSE)
- इंजिनिअरिंग सेवा परीक्षा (ESE)
- भारतीय आर्थिक सेवा परीक्षा (IES)
- नौदल आकादमी परीक्षा (NAE)
- एकत्रिक संरक्षण सेवा परीक्षा (CDS)
- एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा (CMSE)
- भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा (ISS)
- केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षा (CAPF)
अंतिम निष्कर्ष:
अशा पद्धतीने युपीएससी म्हणजेच केंद्रिय लोकसेवा आयोग या परिक्षेच स्वरूप, अभ्यासक्रम, वयोमर्यादा आणि पात्रता असते.
आशा आहे की आम्ही दिलेल्या युपीएससी (UPSC) बद्दल माहिती चा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.
आपल्याला या UPSC Information In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
अधिक वाचा: