Home » Government Schemes » Maharashtra Government Schemes » महाराष्ट्र विधवा पेंशन योजना 2022 : नोंदणी, पात्रता, लाभ व उद्दिष्टे | विधवा महिलांसाठी योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र विधवा पेंशन योजना 2022 : नोंदणी, पात्रता, लाभ व उद्दिष्टे | विधवा महिलांसाठी योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य सरकारने गरिब आर्थिक परिस्थिती असणाऱ्या विधवा महिलांसाठी पेंशन योजना सुरू केली आहे. 2022 पासून ही योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार कडून गरिबी परिवारातील विधवा महिलांना प्रतिमाह ६०० रुपये पेंशन रक्कम देण्यात येणार आहे. जर आपण किंवा ओळखीच्या कोणी महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल; तर त्याची लाभ, पात्रता व अर्ज करण्याची प्रक्रिया या लेखातून जाणून घेऊयात.

महाराष्ट्र विधवा पेंशन योजना 2022 | Widow Pension Scheme Maharashtra in Marathi

योजनेचे नावइंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
योजनेचा प्रकारकेंद्र पुरस्कृत योजना
यांच्याद्वारे सुरु केले आहेमहाराष्ट्र राज्य सरकार
उद्देशविधवा महिलांना प्रतिमाह निवृत्ती वेतनाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करणे.
लाभार्थीसर्व प्रवर्गातील विधवा महिला
लाभाचे स्वरूपलाभार्थी महिलेस प्रतिमाह रुपये ६०० निवृत्ती वेतन देण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळmumbaisuburban.gov.in

महिलांसाठी पतीच्या निधनानंतर जगणे अवघड होते. त्यांना मानसिक, भावनिक व आर्थिक मदतीची गरज असते. त्यांच्या पतीच्या निधनानंतर खर्च तसेच मुलांच्या पालनपोषण व शिक्षणाचा खर्च याची जबाबदारी वाढते. तर, या अडचणींवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन योजनेचा शुभारंभ केला आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सुरू केली आहे. विधवा महिलेस अधिकृत संकेतस्थळावरील पीडीएफ डाऊनलोड अर्ज करावा लागेल व नजीकच्या तलाठी किंवा तहसील कार्यालयात जमा करावा लागेल.

लाभार्थी महिलेस केंद्र सरकारकडून प्रतिमाह २०० तसेच राज्य सरकारकडून संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत ४०० असे एकूण ६०० रुपये रक्कम पेंशन म्हणून मिळणार आहे. ही रक्कम दरमहा वेळोवेळी अर्जासोबत जोडलेल्या बॅंक खात्यात जमा होणार आहे.

महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेचे लाभ :

 • या योजनेच्या माध्यमातून विधवा महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे.
 • योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील रहिवासी विधवा महिलांना घेता येईल.
 • विधवा महिलांना पेन्शनची रक्कम प्रत्येक महिन्याला मिळेल.
 • महाराष्ट्र सरकारचा योजनेच्या माधयमातून राज्यातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आहे.
 • विधवा महिलांचा त्रास व वेळच्या वेळी पैसे मिळावे या हेतूने DBT च्या ‌माध्यमातून पेन्शन रक्कम त्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाईल.
 • या योजनेअंतर्गत प्रत्येकी ६०० रुपये पेंशन रकमेचा लाभ पात्र विधवा महिलांना मिळणार आहे.

    ( जर विधवा महिलेस एकपेक्षा जास्त मुले असतील तर पेंशन ची रककम ९०० रुपये मिळणार आहे. मुलांचे वय २५ पेक्षा अधिक असेल किंवा त्यांचे नोकरी आणि लग्न झाले असेल तर लाभार्थी विधवा महिलेस ६०० रुपये मिळतील. )

महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेसाठी पात्रता :

 • महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्यातील किमान १५ वर्ष स्थायिक रहिवासी असावी.
 • विधवा महिलांनच या योजनेचा लाभ घेता येईल.
 • पात्र उमेदवाराकडे बॅंक खाते असणे आवश्यक आहे.
 • विधवा महिलेचे वार्षिक उत्पन्न २१,००० रुपये किंवा त्या पेक्षा कमी असावे.
 • विधवा महिलेचे वय ४० ते ६५ वर्षे असावे.
 • पात्र उमेदवार दारिद्र्यरेषेखालील (Below Poverty Line) धारक असावा.
 • अर्ज करु इच्छिणारी महिला महाराष्ट्र वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, महाराष्ट्र अपंग निवृत्ती वेतन योजना किंवा इतर योजनांची लाभार्थी नसावी.
 • विधवा महिलेने दुसरे लग्न केले असल्यास ती योजनेसाठी अपात्र राहील.

महाराष्ट्र विधवा पेंशन योजना महत्वाची कागदपत्रे / दस्तावेज :

 • लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा ओळख प्रमाणपत्र
 • वयाचा दाखला
 • वार्षिक उत्पन्नाचा दाखला
 • जातीचे प्रमाणपत्र
 • पासपोर्ट साइज फोटो
 • पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
 • लाभार्थ्याचा रहिवासी दाखला
 • बॅंक खाते पासबुक

महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेसाठी अर्ज कसा करावा

 1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या : https://mumbaisuburban.gov.in/sanjay-gandhi-yojana/
 2. तुमच्यासमोर होम पेज उघडेल.
 3. मेनू वरती क्लिक करून ‘Forms’ हा पर्याय निवडा.
 4. त्यामधील उपलब्ध नोंदणी अर्ज उघडा.
 5. अर्ज डाऊनलोड करा किंवा येथे क्लिक करुन डाऊनलोड करा.
 6. अर्जामध्ये माहिती भरा.
 7. त्या सोबत कागदपत्रे जोडा.
 8. कागदपत्रे जोडलेला अर्ज तुमच्या जवळच्या संजय गांधी योजना/ तलाठी कार्यालय / तहसीलदार किंवा कलेक्टर कार्यालयात जमा करा.

अधिक माहितीसाठी जवळच्या संजय गांधी योजना/ तलाठी कार्यालय / तहसीलदार किंवा कलेक्टर कार्यालयास संपर्क साधावा किंवा https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधा.

Frequently Asked Questions On Indira Gandhi National Old Age Pension Scheme (FAQ)

महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेतंर्गत किती रक्कम मिळणार आहे?

या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांना ६०० रुपये रक्कम मिळणार आहे.

महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेसाठी वयाची अट किती आहे?

या विधवा पेंशन योजनेसाठी विधवा महिलेचे वय ४० ते ६५ दरम्यान असावे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेसाठी लाभार्थ्यांची पात्रता काय असावी?

महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेसाठी विधवा महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी.

महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी या लेखात दिली आहे.

आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *