Home » Jobs & Education » Essay Writing » विज्ञान शाप की वरदान निबंध मराठी मध्ये | Vidnyan Shap Ki Vardan Marathi Nibandh | Science Boon or Curse Essay in Marathi

विज्ञान शाप की वरदान निबंध मराठी मध्ये | Vidnyan Shap Ki Vardan Marathi Nibandh | Science Boon or Curse Essay in Marathi

आजच्या या लेखात आपण विज्ञान शाप की वरदान, science boon or curse essay in marathi, विज्ञान शाप की वरदान निबंध, vidnyan shap ki vardan nibandh, या विषयावर एक निबंध बघू. विज्ञान शाप की वरदान या विषयावर लिहिलेले हे मराठी निबंध मुलांसाठी १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, आणि ११, १२ वर्ग आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले आहे.

Vidnyan shap ki vardan या विषयावर लिहिलेला हा निबंध आपल्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वापरू शकता. या वेबसाइटवर आपल्याला इतर विषयांवर मराठीमध्ये निबंध सापडतील, जे आपण वाचू शकता.

विज्ञान शाप की वरदान निबंध मराठी मध्ये | Vidnyan Shap Ki Vardan Marathi Nibandh | Science Boon or Curse Essay in Marathi

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आणि विज्ञानाचे युग आहे. ज्या गोष्टी कधी आपल्या कल्पणेतही शक्य होणार नव्हत्या त्या गोष्टी देखील आज विज्ञानाने तसेच तंत्रज्ञानाने साध्य करून दाखवलेले आपणास दिसुन येते.म्हणुन आपण सर्व जण विज्ञानाला निसर्गाने आपल्याला दिलेले एक वरदान मानतो.

पण काही जण असे सुदधा आहेत ज्यांना वाटते की आजचे विज्ञान युग हे आपल्यासाठी एक शाप आहे. कारण कोणाला विज्ञानामुळे आपल्याला झालेले फायदे दिसता आहेत.तर कोणाला विज्ञानामुळे आपल्याला होत असलेले नुकसान दिसते आहे.

याचसाठी आपण आज आजच्या लेखातुन विज्ञान आपल्यासाठी शाप आहे का वरदान हे पाहणार आहोत.ज्यात आपण विज्ञान आपल्यासाठी वरदान का ठरते आहे?तसेच विज्ञान आपल्यातील काही जणांसाठी शाप का ठरते आहे?याच्यामागचे कारण काय आहे?आणि ह्यावर काय उपाय करायला हवेत.ह्या सर्व बाबींचा आढावा घेणार आहोत.

विज्ञानामुळे आज आपल्याला कोणकोणते फायदे झाले आहेत?

विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवणात खूप मोठ मोठे अमुलाग्र बदल घडुन आलेले आपणास दिसुन येते.विज्ञानामुळे मानवी जीवणात खुप सहज सोपेपणा निर्माण झालेला आपणास दिसुन येतो.विज्ञानाने तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे आज आपला वेळ वाचतो आहे,उर्जेची देखील बचत होते आहे.कारण विज्ञानाने खुप गोष्टी अशा आहेत ज्या आपल्यासाठी सोप्या करून टाकल्या आहेत.

1. श्रमाची,उर्जेची आणि वेळेची बचत :

आज विज्ञानाने केलेल्या अविष्कारांमुळे आज कोणतेही काम आपण झटक्यात कुठेही न जाता जागेवर बसुन करू शकतो.जसे की आपल्याला काही माहीती हवी असेल तर ती मिळविण्यासाठी आपल्याला कोणत्याही ग्रंथालयात जाण्याची आवश्यकता पडत नसते.आज जगातील कुठलीही माहीती आपण हाताच्या बोटांद्वारे फक्त गुगल तसेच युटयुबसारख्या इत्यादी अनेक सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे प्राप्त करू शकतो.

 एवढेच नाहीतर आज कोणतीही वस्तु आपण घरबसल्या आँनलाईन आँडर्र करून मागवु शकतो.त्यासाठी आपल्याला कुठल्याही दुकानात खरेदीसाठी पायी चालत जाण्याची आज कोणतीही आवश्यकता राहिलेली नाहीये.आणि हा सर्व विज्ञानाचाच एक चमत्कार आहे.ज्याचा फायदा आज आपल्याला होतो आहे.

आज आपल्याला कोणाला पैसे द्यायचे असेल किंवा कोणाकडुन पैसे घ्यायचे असेल तर आपण ते गुगल पे,फोन पे सारख्या माध्यमांद्वारे ट्रान्सफर तसेच रिसीव्ह देखील करू शकतो.आज आपण एटीएम वर जाऊन तेथे पिन नंबर टाकुन आपल्या खात्यातील पैसे कधीही केव्हाही पैसे काढु शकतो.हे सर्व शक्य झाले आहे विज्ञान तसेच तंत्रज्ञानामुळे.

आज पैसे कमविण्यासाठी,नोकरी करण्यासाठी,कोणताही व्यवसाय करण्यासाठी आपल्याला कुठेही चालत जाण्याची,शारीरीक दृष्टया उपस्थित राहण्याची गरज राहिलेली नाहीये.आज आपण आहे तिथे बसुन सुदधा आँनलाईन पदधतीने जाँब तसेच एखादा व्यवसाय करू शकतो.एवढेच नव्हे तर आपण आज कोणतेही शिक्षण सुदधा आँनलाईन पुर्ण करू शकतो.ते ही देशात किंवा परदेशात सुदधा.इतके आज विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जग पुढे गेलेले आपणास दिसुन येते आहे.

2. नवनवीन जीवणोपयोगी संसाधनाची निर्मिती :

आज विज्ञानामुळे अशा अनेक वस्तुंचा शोध वैज्ञानिकांनी तसेच शास्त्रज्ञांनी लावला आहे ज्यांच्यामुळे आपले श्रम आणि वेळ दोघांची बचत होते आहे.आणि त्या वस्तु आपल्या जीवणासाठी उपयोगी देखील ठरत आहे.जसे की कपडे धुण्याचे यंत्र ज्यामुळे आपण झटक्यात कपडे धुवू शकतो.आणि ह्यामुळे आपल्या वेळेची,श्रमाची देखील बचत होते.

दुर परदेशातील व्यक्तींसोबत संवादासाठी अँड्राँईड मोबाईल तसेच कंप्युटर,हवेतुन परदेशात जाण्यासाठी विमान,गाणे ऐकण्यासाठी रेडिओ,मनोरंजनासाठी तसेच जगातील घडामोडी कळण्यासाठी टिव्ही,समुद्रातुन प्रवास करण्यासाठी जहाज,कुठे जाण्यायेण्यासाठी चारचाकी-दुचाकी वाहन,पाणी गरम करण्यासाठी हिटर,पाणी थंड करण्यासाठी फ्रीज,थंड हवेसाठी कुलर,लाईट गेल्यावर प्रकाशासाठी इनव्हर्टर,कोरोनासारख्या जीवघेण्या आजारांवर लस शोधुन काढणे हे सर्व विज्ञानामुळेच आज शक्य झालेले आपणास दिसुन येते.इत्यादी अशा अनेक जीवणोपयोगी संसाधनांचा विज्ञानामुळे आज शोध लागला आहे.ज्यांची आपण अक्षरश आपण गणना देखील करू शकत नाही.

यावरून आपल्याला समजून येते की विज्ञानाचे मानवावर किती मोठे उपकार आहेत.कारण आज विज्ञानामुळे मानवाच्या श्रम,वेळ,उर्जा यात कपात झाली आहे.आणि आपले जीवण सर्व सुख सुविधांनी युक्त तसेच सुखमय,प्रकाशमय, आनंदी देखील झाले आहे.

विज्ञानामुळे आपल्याला कोणते नुकसान झालेले आहे?

जसे आज विज्ञानामुळे आपल्या श्रम, उर्जा आणि वेळेची बचत झालेली आहे आपले आयुष्य सुख सुविधांनी युक्त झाले आहे त्याचप्रमाणे विज्ञानामुळे मानवाला काही नुकसान देखील सहन करावा लागते आहे ते पुढीलप्रमाणे आहेत :

1. घातक तसेच जीवघेण्या यंत्रांचा, रसायनांचा शोध :

आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामुळे अशा काही घातक यंत्र रसायनांचा शोध लागला आहे ज्या मानवी जीवणास घातक आहे.आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून काही दहशतवादी व्यक्ती बाँम्ब,रिव्हाँल्वहर,तलवार यासारख्या घातक यंत्राचा वापर करून निर्दोष निरपराध लोकांची हत्या देखील करू राहिले.

एवढेच नाही तर आज देशादेशातील भारत चीन वैमनस्यातुन आज कित्येक निरपराध लोकांचा कोरोनासारख्या भयंकर आजाराची निर्मिती करत असलेल्या विषारी वायुंना,रसायनांना हवेत सोडुन बळी घेतला जातो आहे.आणि हा मानवाने विज्ञानाचा केलेला खुप मोठा दुरुपयोग आहे.जो सजीवसृष्टीस फार घातक ठरू शकतो.

2. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा होणारा दुरुपयोग, गैरवापर :

आज विज्ञानामुळे तसेच तंत्रज्ञानामुळे सर्व काही डिजीटल तसेच आँनलाईन झालेले आपणास दिसुन येते आहे.पण ह्याच मानवाच्या सोयी सुविधेसाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर आज हँकिंग,क्रँकिंग,सायबर क्राईम,आँनलाईन फ्राँड सारख्या गुन्हेगारी प्रवृत्तींना पार पाडण्यासाठी देखील केला जातो आहे.ज्यामुळे कित्येक लोकांना मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागतो आहे.हा माणसाने आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा केलेला खुप मोठा अनैतिक वापर आहे ज्यामुळे इतर निरपराध,निदोर्ष लोकांना त्रास होतो आहे.

3. माणुस आळशी आणि सुस्त होत चालला आहे :

आज विज्ञानामुळे माणसाचे आयुष्य सर्व सोयी सुविधांनी युक्त,तसेच सुकर आणि चैतन्यमय विलासित झाले आहे.याच कारणाने माणसाला आपला जास्त वेळ तसेच आपली उर्जा खर्च करावी लागत नाहीये,कारण विज्ञान तंत्रज्ञानामुळे आज आपल्याला कोणतीही वस्तु खरेदी करण्यासाठी,शिक्षणासाठी,माहीती मिळवण्यासाठी बाहेर जाण्याची गरज पडत नाहीये सर्व काही त्याला इंटरनेटद्वारे उपलब्ध करून दिले गेल्यामुळे आज माणुस शारीरीक आणि मानसिक दृष्टया सुस्त तसेच आळशी देखील होत चालला आहे.कारण त्याला सर्व काही जागेवर बसुन मिळत आहे ज्यामुळे त्याला कोणतेही काम करण्यासाठी त्याची उर्जा तसेच वेळ खर्च करावा लागत नाहीये.कष्ट करावे लागत नाहीये.याचेच दुष्परिणाम आपणास असे पाहावयास मिळतात की तो व्यक्ती लठठ होतो,त्याची शरीराची चरबी वाढते,तसेच कोणतेही कष्ट व्यायाम न केल्यामुळे,हालचाल न केल्याने शरीराचे अवयव त्याचे निष्क्रीय होत जातात.ज्याचे परिणाम स्वरुप त्याला पुढे जाऊन अनेक शारीरीक तसेच मानसिक विकारांना सामोरे जावे लागते.

सदैव वरदान ठरत असलेले विज्ञान आपल्यासाठी शाप ठरू नये म्हणुन आपण काय उपाय करायला हवे?

  • विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्माण करण्यात आलेल्या यंत्रांचा,रसायनांचा वापर मानवाने आपल्या हितासाठी नक्कीच करायला हवा पण त्या हितामध्ये कोणाचे अहित नसावे त्या यंत्र तसेच रसायनांचा वापर कोणतीही जीवहानी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा विध्वंस करण्यासाठी अजिबात करू नये.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा योग्य त्या कामासाठीच वापर आपण करावा आपल्या मिळवलेल्या ज्ञानाचा,शिक्षणाचा वापर हँकिंग,क्रँकिंग,आँनलाईन फ्राँड सायबर क्राईम सारख्या अनैतिक कार्यासाठी अजिबात करू नये.आपल्या ज्ञानाचा योग्य दिशेने देशाच्या, समाजाच्या हितासाठी,समाजाला मदत करण्यासाठी वापर करायला हवा.
  • विज्ञानाने आपल्याला सुख सुविधा दिल्या याचा अर्थ अजिबात असा होत नाही की आपण काही कष्टच करू नये, शरीराची हालचाल करू नये,ध्येयहीन आणि आळशी तसेच विलासित जीवण जगावे.विज्ञानामुळे आपल्या ज्या उर्जेची आणि वेळेची बचत होते आहे तिचा वापर आपण अजुन एखादी चांगली कला कौशल्ये शिकण्यात,ज्ञान प्राप्त करण्यात व्यतित करायला हवा.तसेच आपण नियमित मर्यादित शारीरीक मेहनत ही करायलाच हवी.

अशा पदधतीने आज आपण विज्ञान शाप की वरदान (Vidnyan Shap Ki Vardan) हे दोन्ही अंगांनी जाणुन घेण्याचा आजच्या निबंधातुन प्रयत्न केला आहे.

आशा आहे की आम्ही दिलेल्या विज्ञान शाप की वरदान निबंध विषयी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या विज्ञान शाप की वरदान निबंध (vidnyan shap ki vardan nibandh) माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *