Home » People & Society » Festival Information » दसरा सणाची माहिती मराठी मध्ये । विजयादशमी दसरा विषयी माहिती । Vijayadashami Dasara (Dussehra) Information in Marathi

दसरा सणाची माहिती मराठी मध्ये । विजयादशमी दसरा विषयी माहिती । Vijayadashami Dasara (Dussehra) Information in Marathi

दसरा सणाची माहिती मराठी, दसरा या सणाविषयी माहिती, दसरा माहिती मराठी, दसरा किती तारखेला आहे, दसरा सणाची माहिती, दसरा विषयी माहिती मराठी, दसऱ्या विषयी माहिती, दसरा सणाचे महत्व, विजयादशमी मराठी माहिती, (Dussehra Information In Marathi, Dasara Information In Marathi, Dussehra Mahiti Marathi, Dussehra In Marathi, Dasara Mahiti In Marathi)

दसरा (Dasara) किंवा विजयादशमी (Vijayadashami) हा हिंदु धर्मातील व्यक्तींचा एक पवित्र सण म्हणुन ओळखला जातो. ह्या सणाचे आयोजन नेहमी अश्विन महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला होत असते.

ह्या दिवशी रामाने दहा तोंडाचा राक्षस रावणाचा वध केला होता. याचसोबत माता दुर्गेने देखील ह्या दिवशी महिषासुरा सारख्या क्रुर राक्षसाशी युदध करून त्याच्यावर विजय प्राप्त करून त्याचा सर्वनाश केला होता. म्हणुन आपण सर्वजण ह्या सणाला दसरा तसेच विजयादशमी अशा दोन नावांनी संबोधित असतो.

त्याचबरोबर महाराष्ट्रात दसरा किंवा विजयादशमी हा सणा नवरात्र च्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. आजच्या लेखातुन आपण ह्याच दसरा ह्या सणाविषयी सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.

दसरा किंवा विजयादशमी सणा विषयी माहिती मराठी मध्ये । Vijayadashami Dasara (Dussehra) Information in Marathi

उत्सवाचे नाव (Festival Name) दसरा किंवा विजयादशमी [Vijayadashami/Dasara/Dussehra)]
दसरा 2023 तारीख मंगळवार, 24 ऑक्टोबर
दसरा सणाची म्हणसंक्रांत आली दिवाळी निघालं दसरा काढला शिमगा केला

दसरा म्हणजे काय?

दसरा तसेच विजयादशमी हा सण सत्याने असत्यावर तसेच चांगल्याने वाईटावर प्राप्त केलेला विजयाचा दिवस म्हणुन ओळखला जातो. कारण ह्याच दिवशी प्रभु श्रीरामचंद्र यांनी लंकेचा राजा तसेच दहातोंडाचा राक्षस रावण ह्याचा वध केला होता. तसेच देवी दुर्गेने महिषासुरावर विजय प्राप्त करून त्याचा वध केला होता. म्हणुन ह्या सणाला दशहरा तसेच विजयादशमी असे म्हटले जाते.

2023 मध्ये दसरा हा सण किती तारखेला आहे?

दसरा हा सण आश्विन महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या दशमीला साजरा केला जात असतो. आणि 2023 मध्ये हा सण 24 आँक्टोंबरला मंगळवारच्या दिवशी 2023 मध्ये साजरा केला जाणार आहे.

दसरा हा सण का साजरा करतात

दसरा हा सण साजरा करण्याची अनेक कारणे आपणास पाहावयास मिळतात. ह्याच दिवशी सीता मातेचे अपहरण करणारा दहा तोंडाचा राक्षस,लंकेचा राजा दशानन,रावण ह्याचा वध करून रामाने रावणाच्या तावडीतुन सीतेची सुटका केली होती. म्हणुन ह्या दिवशी वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याचा विजय म्हणुन आपण आनंद साजरा करत असतो.

याचसोबत देवी दुर्गेचे रूप असलेली देवी कात्यायनी हिने देखील एका क्रुर राक्षसाचा म्हणजेच महिषासुर ह्याच्यावर विजय प्राप्त करून त्याचा वध केला होता.

म्हणजेच इथेही वाईटावर चांगल्याने,असत्यावर सत्याने विजय प्राप्त केला होता.

याचसोबत अजुनही अनेक विशेष प्रसंग ह्या दिवशी घडले होते की देवी सतीने ह्या दिवशी आगीमध्ये  आत्मदहन केले होते.तसेच पांडवांना ह्याच दिवशी आपल्या पापाचे प्रायश्चित करण्यासाठी वनवासासाठी जावे लागले होते.

दसरा हा सण कसा साजरा केला जातो?

दसरा ह्या सणाला जागोजागी रामलीलेचे आयोजन केले जात असते.ज्यात राम आणि रावण यांच्यात झालेल्या युदधाला नाटकाच्या माध्यमातुन दाखवले जाते.तसेच दसरा ह्या सणाच्या दिवशी जागोजागी रावणाच्या पुतळयांचे दहन केले जात असते.आणि असे म्हणतात की रावणाचे दहन करून ह्यादिवशी आपण आपल्यातील रावणाचे दहन करत असतो.संध्याकाळच्या वेळेस एकमेकांना आपटयाचे पाने देऊन आपण एकमेकांना दसरा ह्या सणाच्या शुभेच्छा देखील देत असतो.देवी सरस्वतीचे,शस्त्रांचे,शमी,अपराजिता पुजन देखील आपण करत असतो.

दसरा ह्या सणाचे महत्व तसेच वैशिष्टय काय आहे?

 • दसरा हा सण वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याचा विजय मिळविण्याचा दिवस आहे.
 • ह्याच दिवशी प्रभु रामचंद्र यांनी सीतेचे अपहरण करणारा राक्षस रावणावर विजय प्राप्त करून त्याचा वध केला होता.
 • देवी दुर्गेने असुर महिषासुराशी दहा दिवस युदध करून ह्या दिवशी त्याच्यावर विजय प्राप्त करत त्याचा वध केला होता.
 • ह्याच दिवशी देवी सतीने आगीत आत्मदहन केले होते.
 • ह्याच दिवशी पांडवांना वनवासासाठी जावे लागले होते.
 • ह्याच दिवशी वर्षा त्रतुसोबत चातुर्मासाची देखील समाप्ती होत असते.

दसरा सण साजरा करण्याच्या विविध विभागातील पारंपारीक पदधती कोणकोणत्या आहेत?

दसरा हा सण फक्त महाराष्टातच नव्हे तर संपुर्ण भारतात साजरा केला जाणारा सण आहे. प्रत्येक विभागाच्या पारंपारीक पदधतीनुसार हा सण सगळीकडे साजरा केला जात असतो.एवढाच छोटासा फरक येथे आपणास पाहावयास मिळत असतो.

चला तर मग जाणुन घेऊ की कोणत्या विभागात हा सण कशा पदधतीने साजरा केला जातो.

1)उत्तर भारतात : उत्तर भारतात दसरा ह्या सणाच्या दहा दिवस अगोदरच रामलीलेचे प्रदर्शन हे सुरू केले जात असते.आणि ह्या रामलीलेच्या प्रदर्शनाचे आयोजन हे तेथील आजुबाजुच्या गावातील,शहरातील धार्मिक,तसेच मोठमोठे व्यावसायिक लोक करत असतात.

2) दक्षिण भारत : दक्षिण भारतातील तामिळनाडु ह्या भागात दसरा हा सण तसेच उत्सव साजरा करण्यास दसरा ह्या सणाच्या नऊ दिवस आधीच येथील लोक सुरूवात करत असतात.ह्या नऊ दिवसात येथील लोक तीन देवी लक्ष्मी,सरस्वती,दुर्गा ह्या तीन मुख्य देवतांची उपासना करीत असतात.

3) पुर्व भारत : पुर्व भारतात दसरा हा सण देवी दुर्गेने महिषासुरासारख्या नराधम राक्षसावर विजय प्राप्त करून त्याचा वध केला म्हणुन साजरा केला जात असतो.असे म्हणतात की महिषासुर ह्या राक्षसाने पृथ्वी तसेच स्वर्ग दोघांवर आक्रमण करून दोघांवर ताबा मिळवला होता.

4) पश्चिम भारत : पश्चिम भारतात सर्व लोक दसरा ह्या सणाला आपटयाची पाने सोन म्हणुन वाटत असतात. देवी सरस्वतीची पुजा करतात, शस्त्रांची तसेच शमीची सुदधा पुजा ह्या दिवशी करतात.

दसरा तसेच विजयादशमीला पुजेचा शुभ मुहुर्त कोणता आहे?

दशमी तिथीची सुरूवात 4 आँक्टोंबरला दुपारी 2 वाजुन 20 मिनिटांनी होणार आहे.

5 आँक्टोंबर रोजी दुपारच्या वेळेस 12 वाजुन 2 मिनिटांनी दशमी तिथीची समाप्ती होणार आहे.

ह्या वर्षी विजय मुहुर्ताची सुरुवात ही दुपारी 2 वाजुन 1 मिनिटाला होणार आहे. आणि हा विजय मुहुर्त दुपारी 2 वाजुन 48 मिनिटांपर्यत चालणार आहे.

अपुर्णा पुजा ही दुपारच्या वेळेसच 1 वाजुन 13 मिनिटांनी सुरू केली जाणार आहे. आणि ही अपर्णा  पुजा 3.36 ला समाप्त होणार आहे.

दसरा तसेच विजया दशमीचा पुजा विधी काय आहे ?

 • ह्या दिवशी आपण लवकर उठायला हवे तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांनी देखील लवकर उठावे आणि सगळयांना अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे.
 • सर्वात आधी सर्व शस्त्र नीट व्यवस्थित पुसुन स्वच्छ करून घ्यावी आणि मग ती सर्व पुजेसाठी एका ठिकाणी जमा करावी.
 • त्यानंतर सर्व शस्त्रांवर गंगाजलाचा शिडकाव करावा ह्याने सर्व शस्त्रे पवित्र होत असतात.
 • मग सर्व शस्त्रांना हळद,कुंकु लावावे आणि त्यांना फुले अर्पण करावीत.आणि फुले अपर्ण करण्याबरोबरच शस्त्रांवर आपटयाची पाने सुदधा आपण अपर्ण करायला हवे.

दसरा तसेच विजयादशमीला करावयाच्या पुजेचे साहित्य कोणकोणते आहे?

विजयादशमीला तसेच दसरा ह्या सणाला पुजा करण्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे :

 • गायीचे शेण 
 • धुप
 • दिवा 
 • सुपारी 
 • दही
 • अक्षता 
 • पीठ 

दसरा ह्या सणाला आपटयाची पाने सोन म्हणुन का वाटतात?

दसरा ह्या सणाला आपटयाची पाने वाटण्यामागे काय कारण आहे हे समजुन घेण्यासाठी आपल्याला आधी त्याची कथा जाणुन जाणुन घेणे गरजेचे आहे.

फार पुर्वीची गोष्ट आहे की वरदतंतु नावाचे एक त्रषीमुनी होते.आणि कौस्या नावाचा त्यांचा एक शिष्य होता. कौस्याने चौदा पदधतीच्या विदयेत प्रावीण्य मिळवले होते.

आणि मग आपण प्राप्त केलेल्या विदयेच्या बदल्यात आपण आपल्या गुरूला गुरूदक्षिणा द्यावी असे त्याला वाटु लागले.आणि मग कौस्या आपल्या गुरूकडे जातो आणि त्यांना विचारतो की तुम्हाला माझ्याकडुन काय गुरूदक्षिणा हवी आहे?तेव्हा त्याचे गुरू त्याला सांगतात की तु जी विद्या शिकली आहे तिचा वापर तु इतरांच्या हितासाठी,कल्याणासाठी नेहमी कर हीच माझी गुरूदक्षिणा असेल.

पण कौस्या ऐकायलाच तयार नव्हता मग त्याचा गुरूदक्षिणेचा हटट तसेच नाद पुरा करण्यासाठी त्याचे गुरू वरदतंतु कौस्याकडून चौदा कोटी सुवर्ण मुद्रांची मागणी करतात.

मग आपल्या गुरूला एवढी मोठी गुरूदक्षिणा आपण देऊ शकत नाही म्हणुन कौस्या प्रभु राम यांच्याकडे मदत मागतो.मग प्रभु श्रीराम त्याला सांगतात की गावाच्या बाहेर एक आपटयाचे झाड आहे तु तिथे जाऊन उभा राहा.आणि मग प्रभु श्रीराम धनाचे दैवत कुबेर यांना आवाहन केले आणि आपटयाच्या झाडाच्या पानांचे सुवर्ण मुद्रेत रूपांतर करण्यास सांगितले.आणि मग त्या झाडाची जेवढी पाने खाली पडतात त्यांचे सोन्यात परिवर्तन होते आणि मग कौस्या ते सोने घेऊन आपल्या गुरुला दक्षिणा स्वरुप देत असतो.

तेव्हापासुन दसरा ह्या सणाला आपटयाची पाने सोन म्हणुन वाटली जातात.

FAQ On Dussehra Information In Marathi

दसरा किती तारखेला आहे?

मंगळवार, 24 ऑक्टोबर.

2023 मध्ये दसरा किती तारखेला आहे

2023 मध्ये दसरा 24 ऑक्टोबर, बुधवार ला आहे.

अंतिम निष्कर्ष :

अशा प्रकारे आज आपण दसरा किंवा विजयादशमी सणा विषयी संपूर्ण माहिती मराठी मध्ये जाणुन घेतले आहे. आशा आहे की आम्ही दिलेल्या दसरा (Dasara) किंवा विजयादशमी (Vijayadashami) उत्सव विषयी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला Vijayadashami Dasara (Dussehra) Information in Marathi या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *