Home » Jobs & Education » News Writing » वृक्षारोपण बातमी लेखन मराठी | Vriksharopan Batmi Lekhan In Marathi

वृक्षारोपण बातमी लेखन मराठी | Vriksharopan Batmi Lekhan In Marathi

वृक्षारोपण बातमी लेखन मराठी, वृक्षारोपण कार्यक्रम वृतांत लेखन ( Vriksharopan Batmi Lekhan In Marathi, Tree Plantation News Writing In Marathi)

विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयातील बातमी लेखन प्रकारातील ‘वृक्षारोपण विषयावर बातमी लेखन मराठीत’ कसे लिहायचे ते पाहणार आहोत.

परीक्षेमध्ये आपणास आपल्या जवळच्या परिसरात किंवा तुमच्या शाळेत वसुंधरा दिनादिवशी साजरा केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमा बद्दल बातमी लेखन करण्यास सांगितले जाऊ शकते. त्या करिता कशा प्रकारे सर्व बाबी विचारात घेऊन बातमी लेखन केले पाहिजे ते पाहूया.

वृक्षारोपण कार्यक्रम बातमी लेखन | Vriksharopan Batmi Lekhan In Marathi

लोकमान्य टिळक हायस्कूल येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा

आमच्या वार्ताहराकडून

पुणे : दिनांक २३ एप्रिल

नुकत्याच २२ एप्रिल रोजी झालेल्या ‘जागतिक वसुंधरा दिनाचे’ औचित्य राखून पुणे येथील लोकमान्य टिळक हायस्कूल येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वनाधिकारी मा. विलास सोनवणे साहेब उपस्थित होते व त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विविध उपक्रम सुध्दा राबविण्यात आले.

या दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकवर्ग हजर होता. शाळेमार्फत झाडांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. शाळेच्या सभागृहात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय विलास सोनवणे सरांनी भूषवले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापक प्रा. गिरीश प्रधान यांनी अध्यक्षांचे पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यार्थ्यांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” अभंगाचे गायन केले. अध्यक्षांनी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आपले विचार मांडले. “झाडे लावा झाडे जगवा, हरिततृणांनी धरती नटवा” असा बहुमूल्य संदेश सर्वांना दिला. वृक्षांचे संवर्धन व संरक्षण का करणे गरजेचे आहे हे पटवून सांगितले आणि ‘बीज गोळे’या विषयी माहिती दिली. “वृक्षारोपण करणे जेवढे महत्वाचे आहे त्याहीपेक्षा वृक्षसंगोपण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे”,असे विचार त्यांनी मांडले. भाषणानंतर सर्वांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. यानंतर मुख्य वृक्षारोपण कार्यक्रम जवळील मैदानाबाजूला करण्यात आला. यात विद्यार्थी व पालकही सहभागी झाले. शाळेने याआधीच वनविभागाकडून मागविलेल्या झाडांची रोपे वृक्षारोपणासाठी वापरण्यात आली. यादरम्यान सावली देणारी फळझाडे जसे की आंबा, चिकू, पेरू व नारळाची रोपे लावली. सर्वांचे वृक्षारोपण करताना छायाचित्रे काढले गेले. शेवटी शिक्षिका लोखंडे मॅडम यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

आशा आहे की आम्ही दिलेल्या या वृक्षारोपण बातमी लेखन मराठी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली बातमी लेखन आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या वृक्षारोपण बातमी लेखन मराठी माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी बातमी लेखन हवा असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *