महापरिनिर्वाण दिन विनम्र अभिवादन मराठी संदेश

समाजपरिवर्तनाचे शस्त्र मानून, ज्यांनी शिक्षणाचा केला प्रसार.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते हे थोर विचार.. महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

पोटाची भूक तर भागवावीच, पण एक पाऊल पुढे टाकून माणसाने, शिक्षण घेऊन बुद्धीची भूकही भागवावी..

जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो..

शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे.. जन्मताच गरीबी येते ही कुणाची चूक आहे.. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे… घासातील घास दुसऱ्याला देणे, ही मराठी माणसाची संस्कृती आहे.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!

कोणालाही जमणार नाही, अशी क्रांती करून दावली.. जातीयवाद्याला देऊन टक्कर, चवदार ओंजळ भरून दावली.. निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आग विझवते, पण माझ्या भिमाने तर पाण्यालाच आग लावली.. जय भीम!

तुमच्याकडे २ रुपये असतील, तर १ रुपयाची भाकरी घ्या, आणि १ रुपयाचे पुस्तक.. भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल, तर पुस्तक ‘जगावे कसे’ हे शिकवेल.. – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नाही, तर.. बुध्दीला सत्याकडे, भावनेला माणूसकीकडे, आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण..

जसे, जेवल्यावर होणारे समाधान तात्पुरते असते.. याउलट शिक्षणामुळे मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते..  -डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

Woman Reading
Arrow

अधिक माहिती वाचण्यासाठी  Learn More  वर क्लिक करा