Home » People & Society » Information » कांदा चिरताना आपल्या डोळयांतुन पाणी येण्याची कारणे आणि त्यावरील उपाय

कांदा चिरताना आपल्या डोळयांतुन पाणी येण्याची कारणे आणि त्यावरील उपाय

कांदा हा एक असा पदार्थ आहे ज्याचा वापर आपण रोज भाजी बनवण्यासाठी म्हणजेच भाजीत टाकण्यासाठी तसेच खिचडीत टाकण्यासाठी अशा विविध कारणांसाठी आपण करत असतो.

पण कांदा चिरत असताना नेहमी आपल्या तसेच आपल्या आजुबाजुला बसलेल्या व्यक्तींच्याही डोळयातुन पाणी का येत असते? तसेच त्यांना डोळयांना तिखट का लागत असते? हा प्रश्न पडुनही आपल्याला त्याचे उत्तर योग्य असे कोणाकडुनही आपल्याला मिळत नसते.

कारण आपण घरातील मोठया लोकांना विचारले तर आपल्याला एकच उत्तर ऐकायला मिळत असते की तो कांदयाचा नैसर्गिक गुणधर्म आहे. तसेच त्याच्यात एक वायु असतो जो वातावरणात पसरल्यावर आपल्या डोळयांत तो जातो म्हणुन कांदा चिरताना आपल्या डोळयातुन पाणी येत असते. म्हणजेच योग्य असे मुळ शास्त्रीय कारण काय आहे हे आपल्याला कोणी सांगतच नसते. असा कोणता वायू असतो जो आपल्या डोळयांत गेल्यावर आपल्या डोळयांत पाणी येत असते? अणि ते जाणुन घेण्याचा आपण प्रयत्न देखील करत नसतो.

म्हणुन आज आपण ह्याच महत्वाच्या विषयावर आजचा लेख घेणार आहोत की आपण कांदा चिरत असताना आपल्या तसेच आपल्या अवतीभोवती बसलेल्या लोकांच्या डोळयांत पाणी का येत असते? अणि कांदा चिरताना आपल्या डोळयातुन पाणी येऊ नये म्हणुन आपण काय उपाय करायला हवेत याविषयी जाणुन देखील घेणार आहोत.

कांदा चिरताना डोळ्यात पाणी का येते? त्याची कारणे 

कांदा हा एक असा पदार्थ तसेच रसायन आहे ज्याचे मुळ नाव साईन प्रोपेंशिअल एस आँक्साईड असे आहे. कांदा हे एक असे रसायन आहे जे आपल्या डोळयातील lacrimal gland ला उत्तेजित करत असते.

ज्याच्यामुळे आपण कांदा चिरत असताना आपल्या डोळयातुन आपोआप पाणी निघत असते.

कारण जेव्हा आपण कांदा चिरत असतो तेव्हा त्याच्यातुन lactrymentary factor synthes अँन्जाईम बाहेर निघत असतो. अणि हा अँन्जाईम कांद्यामधील अमिनो अँसिडला सल्पँनीक अँसिडमध्ये रूपांतरीत करत असते. अणि सोबतच सल्पँनीक अँसिड साईन प्रोपेंशिअल एस आँक्साईडमध्ये रुपांतरीत होत असतो.

अणि जेव्हा हा अँन्जाईम प्रोपेंशिअल एस आँक्साईड हवेच्या माध्यमातुन आपल्या संपर्कात येत असतो. तेव्हा याच्यामुळे आपल्या डोळयांतील lachrymal gland मध्ये त्रास होत असतो. अणि याच्याचमुळे आपल्या डोळयांला कडु लागत असते, डोळयांमध्ये जळजळ तसेच आगीन होत असते. अणि आपल्या डोळयांतुन पाणी येत असते.

कांदा चिरताना आपल्या डोळयातुन पाणी येऊ नये म्हणुन आपण काय उपाय करू शकतो?

  • कांदा चिरताना आपल्या डोळयातुन पाणी येऊ नये म्हणुन आपण कांदा चिरण्याअगोदर कांद्याचे सालटे काढुन तो काही काळ आपण पाण्यामध्ये भिजवत ठेवायला हवा याने कांदा चिरत असताना आपल्या डोळयांत पाणी येत नसते.
  • कांदा कापताना जर आपल्या डोळयात पाणी येत असेल तर आपण कांदा कापायला घेण्यापुर्वी थोडा वेळ तो शीतकपाटात म्हणजेच रेफ्रीजरेटरमध्ये ठेवायला हवे याने देखील कांदा चिरताना आपल्या डोळयातुन पाणी येत नसते.
  • कांदा कापताना डोळयात पाणी येऊ न देण्यासाठी आपण आपल्या बाजुलाच एखादा दिवा किंवा अगरबत्ती लावू शकतो. म्हणजे जेव्हा आपण कांदा कापायला लागु तेव्हा त्याच्यातुन बाहेर पडेल तो वायु तसेच गँस हा त्या मेणबत्तीकडे जातो याने आपल्या डोळयात पाणी येत नसते.

अंतिम निष्कर्ष :अशाप्रकारे आज आपण कांदा चिरताना आपल्या डोळयात पाणी का येते? तसेच ते येऊ नये यासाठी आपण काय उपाय करायला हवेत हे जाणुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.

तरी सदर लेख आवडल्यास आपल्या जास्तीत जास्त मैत्रीणींपर्यत गृहिणींपर्यत पोहचवा जेणेकरून त्यांनाही ह्या माहीतीचा लाभ उठवता येईल. अणि कांदा चिरताना त्यांच्या डोळयांत पाणी येऊ नये तसेच त्यांच्या डोळयांना त्रास होऊ नये याची काळजी त्यांना देखील घेता येईल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?

कांदा कापताना syn-Propanethial-S-oxide वायू बाहेर पडतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *